स्विकार भाग 34

Story Of Newly Married Couple


स्विकार भाग ३४

क्रमश : भाग ३३
ना कसली चिंता , ना कसले टेन्शन , खूप छान टाईम ते स्पेंड करत होते .. एकमेकांना होणारा हलकासा स्पर्श दोघांनाही बेचैन करत होता .. कुछ तो हो रहा है .. हे कळत होते दोघांनाही .. पाण्यात खेळता खेळता श्लोक ने तिचा चेहरा हातात घेतला ..
श्लोक " कीर्ती .. मला एक सांगायचंय .. ऐकते का ?"
कीर्ती ला त्याच्या स्पर्शाने आणि नजरेने च कसेतरी होत होते .. एकदम शांत झाली आणि ती पण त्याच्या ड़ोळ्यांत हरवली
श्लोक " कीर्ती .. आय लव्ह यु .. "
कीर्ती ने हे वाक्य ऐकताच .. तिचा चेहरा त्याच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न करू लागली
श्लोक “ ऐक ना .. कीर्ती ,, मला सांग ना ,, नक्की तुझ्या मनात माझ्या बद्दल काय भावना आहेत .. तुला मी लाईफ पार्टनर म्हणून हवाय कि नाही ?"
कीर्ती " चल जाऊ रूम वर .. खूप वेळ झाला आपण पाण्यात आहोत "
श्लोक “का मला अव्हॉइड करतेस तू”
श्लोक " माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस .. "
कीर्ती " श्लोक , मी काल बहुतेक तुला सांगितले ना ... "
श्लोक " मला काही फरक पडत नाही .. .. मला तू हवी आहेस .. माझी म्हणून .. मना पासून.. माझ्या सुख दुःखात माझा साथीदार म्हणून ... तू आहेस तशीच .. स्टेट्स वगैरे काही नसते ग .. परिस्थिती बदलत असते .. आपले माणूस आपल्या जवळ असणे हे महत्वाचे असते .. आणि तुला मी म्हटले ना .. कि मी तुला लग्नच्या आधीच पसंत केले होते म्हणून.. मी वेळ आली कि सांगेन तुला ते सर्व .. .. बोलता बोलता तो कीर्तीच्या खूप जवळ आला होता .. इतका कि त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले होते .. आता त्याच्या डोळ्यात बघायची हिम्मत होई ना .. तिने डोळे घट्ट मिटले ..
खरंतर या क्षणी त्याला तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा असे वाटतं होते पण स्वतःची हक्काची बायको असूनही त्याला करता येत नव्हते..तिला वेळ हवाय असे तिने स्पष्ट त्याला सांगितले होते पण या सोनेरी क्षणांचे काय ते हातातून निसटून जात होते त्याचे दुःख जास्त वाटतं होते त्याला ...
कीर्ती " श्लोक .. प्रिया .. "
श्लोक ने तिच्या ओठांवर बोट ठेवले ..
श्लोक " शु.... मी काय सांगतो ते ऐक .. मला तू घरी जाई पर्यंत विचार करून सांग कि तूला माझ्या बद्दल नक्की काय फीलिंग्स आहेत .. तुझ्या फीलिंग्स माझ्या साठी महत्वाच्या आहेत .. प्रिया .. माझे आई बाबा .. तुझ्या माहेरची आर्थिक परिस्थिती .. तुझा फोबिया .. तुझ्या आयुष्यात घडले ली सो कॉल्ड घटना सगळे एका साईडला ठेव... मी किती श्रीमंत .. मी किती हँडसम हे सगळे बाजूला ठेव... फक्त श्लोक आणि कीर्ती या दोघांचा विचार कर .. कीर्तीला श्लोक मध्ये आपला जीवन साथी दिसतोय का ? हे मला पाहिजे ... “

कीर्ती त्याच्या डोळ्यांत बराच वेळ बघत होती .. थोडासा त्रासिक दिसत होता तो .. आपली बायको आपल्याला नवरा मानते कि नाही .. तिला मी तिच्या आयुष्यात हवाय कि नकोय ? इतक्या साध्या प्रश्नाचे उत्तर त्याला सापडत नव्हते .. आणि तो तिच्या डोळ्यांत ते उत्तर सापडतंय का बघत होता आणि त्याचा त्याला त्रास होत होता. ती कोणत्याही ठाम निर्णयावर पोहचत नाहीये हि गोष्ट त्याला प्रकर्षाने जाणवत होती.
तर गोव्यामध्ये खूप धम्माल मस्ती आणि वैचारिक देवाण घेवाण करून दोघे पुन्हा त्याच्या घरी आले .
पुढे श्लोक ने मुद्दामूनच काही खास विषय काढलाच नाही .. अजूनही तिला काय मागे खेचतंय . "व्हॉट इझ दयाट होल्डिंग हर बँक "हा विचार मात्र त्याला सारखा सतावत होता
एक दिवस सकाळी श्लोक ला कीर्ती च्या बाबांचा फोन आला ..
कीर्तीचे बाबा " नमस्कार जावई बापू .. तुमच्याशी आता बोलू शकतो का ?"
श्लोक " हा बोला ना काका .. "
कीर्तीचे बाबा" नाही म्हणजे कीर्ती चांगलीच रुळली आहे वाटतं .. हल्ली आठ दिवसात तिने अजिबातच फोन केला नाही .. म्हणून जरा काळजी वाटली .. नाही म्हणजे तब्बेत वगैरे सगळे ओके आहे ना दोघांची ?"
श्लोक " हो .. काका .. एकदम ओके आहे .. ती पण आणि मी पण .. काही काळजी करू नका .. मी सांगतो तिला आज कॉल करायला .. किंवा रात्री सोबतच करतो "
कीर्तीचे बाबा" तसे माझे एक काम होते .. म्हणजे ते लग्नाला आता जवळ जवळ ५ महिने होऊन गेले .. तुम्ही दोघे एकदा पण आले नाही इकडे .. एकदा चक्कर टाकलीत तर बरं होईल .. "
श्लोक " हो चालेल ना मी कीर्तीशी बोलून प्लॅन करतो मग तसा ... आणि तुम्ही पण इकडे आलात रहायला तरी चालेल .. आम्हालाही थोडा चेंज होईल "
कीर्तीचे बाबा" मी आलो असतो हो पोरीच्या ओढीने .. पण कीर्तीची आईला नाही जमणार .. तिकडे शहरात .. आम्ही गावची माणसे "
श्लोक " असे काही नसते काका .. इकडे पण माणसचं असतात .. फार काही वेगळे नसते “
श्लोक च्या मनात आले हिच्या बाबांची विचारसरणी पण अशीच आहे .. सगळ्यांचा ब्रेन वॉश करायला लागणार आहे मला .. आणि मनात हसला
श्लोक " ठीक आहे मग मी शनिवार रविवार चा प्लॅन करतो .. म्हणजे कीर्तीला एक दिवस रहायला पण मिळेल .. "
कीर्तीचे बाबा खुश होऊन " चालेल .. या या .. .. आणि एक ... विचारू का ?"
श्लोक " बोला ना काका .."
कीर्तीचे बाबा" ते म्हणजे खाण्यात काय आवडते तुम्हांला .. म्हणजे तशी तयारी करायला "
श्लोक " जे तुम्ही जेवता तेच मी जेवतो .. मला कारलं आणि पालेभाजी सोडून कुठलीही भाजी आवडते "
कीर्तीचे बाबा " ठीक आहे मग .. या मग आम्ही वाट बघतोय "
श्लोक मनात विचार करू लागला .. कि या लोकांना लवकरात लवकर माझ्यात मिक्स करून घ्यावे लागणार आहे नाहीतर मला त्यांच्यात मिक्स व्हावे लागेल
असा विचार करून श्लोक ने मनात काहीतरी प्लॅन बनवला ..
रात्री
श्लोक " कीर्ती .. या वीक एन्ड ला माझी एक मिटिंग आहे तर मला आऊट ऑफ सिटी जावे लागणार आहे .. मला रात्र हॉटेल ला काढायला लागेल .. तूला यायला आवडेल का माझ्या बरोबर ? का तू इथेच थांबशील एकटी ? मी शनिवारी सकाळी जाईन येई पर्यंत रविवार संध्याकाळ किंवा रात्र पण होऊ शकते "
कीर्ती " मी एकटी इकडे थांबून काय करू ? मी पण येईन तुझ्या बरोबर "
श्लोक " नाही म्हणजे माझ्या बरोबर तुला बोअर झाले तर उगाच .. तुला पाहिजे तर नेहा ला बोलावतो तुझ्या सोबत .. नीट विचार करून सांग "
कीर्ती " श्लोक .. असे का बोलतोय .. मी कधी म्हटले कि मला बोअर होतयं तुझ्या बरोबर "
श्लोक " मग आवडतंय का हे पण नाही सांगितले ना तू .. मग मी काय समजणार ? "
श्लोक " मी काय विचारले तुला हे लक्षात नाही का ? .. गोव्या वरून येऊन एक महिना उलटून गेला तरी पण माझ्या प्रश्नाचे उत्तर तू देत नाहीयेस .. मला असे लटकवत ठेवायला तुला काही वाटत नाही का ? अजून किती वेळ हवाय तुला ? मला बाकीचे निर्णय घ्यायचेत”
कीर्ती " म्हणजे ? मला कळले नाही "
श्लोक " म्हणजे .. आता तुला माझ्या बरोबर मोकळं वाटतच नसेल .. तर हे ओझ्या सारखे नाते आपण किती दिवस रेटणार ना .. काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे ना "
कीर्ती " म्हणजे .. कसला निर्णय ?"
श्लोक " म्हणजे आता पर्यंत तुझे काहीच उत्तर आले नाही म्हणजे तुला माझ्या बद्दल काहीच फीलिंग्स नाहीयेत हे नक्की .. आता लग्न तर झालेय .. मग एकत्र कसे राहायचे .. तुला पाहिजे तर वरची एक रूम रिकामी आहे तिथे तू शिफ्ट हो .. मी इकडेच राहीन .. मला या रूम मध्ये बरे वाटते .. तसा काहीतरी मार्ग काढू "
कीर्ती " मी असे कुठे म्हणले "
श्लोक " मग नक्की काय म्हणणं आहे तुझं ? ते तरी सांग ?"
कीर्ती " म्हणजे आपण कशाला आपल्या नात्याला काही नावं द्यायचे .. दोघे एकमेकांसोबत आनंदी आहोत .. खुश आहोत .. एकमेकांची काळजी घेतोय .. मग कशाला कोणत्याही नात्याचा शिक्का त्यावर मारायचा .. चालू आहे ते छान चालू आहे कि .. नको ते प्रेमाचे बंधन आणि नको ते लग्नाचे बंधन "
श्लोक " म्हणजे .. लिव्ह इन् सारखे का ? हे बरं आहे तुझे .. एक पाऊल पुढे विचार आहे .. पण आता लग्न तर करून बसलोय ना आपण "
कीर्ती " तसे नाही रे "
श्लोक " कीर्ती ..
Relationship is not about you or me. It is about us. Where we both individuals accept each other, respect each other . serve each other and make each other feel happy and important ..
आणि हेच मी तुला गोव्या पासून सांगाय चा प्रयत्न करतोय .. एनी वेज मी माझ्या कडून कित्येकदा तुला स्प्ष्टपणे सांगितलंय आणि पुढाकार पण घेतलाय या नात्याला नाव द्यायला .. नाहीतर हे नातं नावापुरतेच राहून जाईल म्हणून .. पण आता नाही ..मी तुला खूप वेळ दिला .. तू माझा स्वीकार करावा म्हणून .. पण तू अजूनही तिथेच आहेस .. एकही पाउल पुढे टाकायला तयार नाहीयेस .. तुझी मर्जी .. मी माझ्या कर्तव्यात कधीच कमी पडणार नाही .. त्यातून काही राहून गेले तर तू मला सांगशील .... बोलता बोलता त्याच्या साईडचे लाईट्स ऑफ करून श्लोक झोपून गेला "
कीर्ती ला आज त्याने चांगलेच सुनावले होते .. आणि त्याच्या दृष्टीने बरोबरच होते .. ते ..
कीर्ती " श्लोक तू मला सांगणार होतास ना ते तू मला लग्न आधी पासून कसा ओळखतॊस ते "
श्लोक " मला जे बोलायचे होते ते झालंय बोलून .. आता मी काहीही सांगणार नाही .. कारण तू माझ्या कडून सगळे काढून घेणार मग माझ्या याबद्दल निर्णय देणार इतकि तर नक्कीच वाईट वेळ माझ्यावर आलेली नाहीये .. हे तुलाही माहितेय आणि मलाही .. आणि पुन्हा एकदा सांगतो आपले रिलेशन जे काहीपण असायचं ते असुदे .. मी तुला डिवोर्स वगैरे देणार नाहीये .. कारण मला माहितेय माझा निर्णय चुकीचा नाहीये .. तुला चुकीचा वाटतोय तर तू वर शिफ्ट होऊ शकतेस ..आजही .. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये "
कीर्ती रडवेली होऊन " इतका तुटक का वागतोय तू माझ्याशी ?"
श्लोक " ज्या व्यक्तीला माझ्यात इंटरेस्ट नाहीये त्या अपरिचित व्यक्तीशी तरी मी असेच वागतो "
कीर्ती " आता मी अपरिचित झाले का लगेच ?"
श्लोक " गुड नाईट .. "
कीर्ती ची चलबीचल वाढली होती .. आता हा चिडला ... बहुदा मी जास्तच ताणले का ? पण मी तरी काय करू ? याला कसे सांगु कि माझे किती प्रेम आहे याच्यावर .. त्याला कळत नाही का माझ्या कडे बघून ..

🎭 Series Post

View all