प्रिये!

Sweetheart! I miss you.

प्रिये!मला तुझी खूप आठवण येते!

जेंव्हा ती झाली आपली पहिलीच भेट,

तेंव्हाच माझं मन तुझ्याकडे वळलं.

जिंकायला चाललो होतो समर पण,

आपलीच हार होणार असं कळलं.

अजूनही ती चूक मनामध्ये सलते.

प्रिये!मला तुझी खूप आठवण येते! ||१||

तुझं मला कधी-कधी चोरून भेटणं,

मला तर ती वाटायची निखळ मैत्री.

म्हणून होत न्हवती माझी हिंमत की,

करून घ्यावी आपल्या मनाची खात्री.

आता मात्र माझं मन फुटून रडते,

प्रिये!मला तुझी खूप आठवण येते! ||२||

का ऐकवलीस तुझी खोटी प्रेम कथा?

प्रेमाची परीक्षा अशी सुद्धा घेता येते?

तुझा तरी म्हणा काय दोष आहे त्यात,

कोण जाणे दैव ही काय खेळ खेळत.

ह्या वाटेकडे आता मन नाही वळते,

प्रिये!मला तुझी खूप आठवण येते! ।।३।।