स्वीटहार्ट भाग 4

सामाजिक
"स्वीटहार्ट"
आणि तू प्रेग्नेंट होती.....त्यानेच तुझ्या भाऊजीचा इव्हेंट केला....एकदा त्याने त्यांच्या ऑफिसचा सुद्धा इव्हेंट केला.... तेव्हाही तू गरोदरच होती.... मग पुढे काय झाले ? त्याला माहित नाही ...म्हणून मग मी अमरावतीला आलो....चौकशी केली तेव्हा कळले तु फक्त आठच माहिण्यासाठी पुण्याला गेली होती....मला खूप गडबड वाटली....मग मी तुझ्या बाबांना बोललो लग्नाची बोलणी करायची आहे ...एकदा नागपूर ला या....बाबा आले....मी त्यांना डायरेक्ट प्रश्न केला.....बाबा निलूच बाळ कुठे आहे....? सुरवातीला कोणत बाळ...तुम्ही काय बोलता ..?काहीच समजत नाही म्हणाले....बाबा खरं काय ते सांगा....?काहीही झालं तरी माझा निलूशी लग्न करण्याचा निर्धार पक्का आहे....फक्त तुम्ही खरं काय ते सांगा...मग बाबा सांगू लागले...आम्ही निलूला abortion कर म्हणून सांगत होतो....पण ही ऐकायला तयार नव्हती...जबरदस्ती केली तर आम्हालाच आत्महत्या करायची धमकी दिली.....मग मुलगी आणि जावई यांच्या मदतीने ...मी ती झालेली मुलगी अनाथ आश्रमात नेऊन दिली....आणि एक मेलेली मुलगी ....निलूला तिचे बाळ म्हणून दाखवली...त्याच्यावर तू विश्वास ठेवला...मी मग बाबां सोबत आश्रमात जाऊन ....ती मुलगी पाहून आलो...नंतर पुन्हा जाऊन तिला नागपूरच्या आश्रमात दाखल केले..तिला विचारले तुझे नाव काय ....तर... ए पोरी....सांगितलं ...मग मी तिचे "स्वीटहार्ट".. असे नामकरण केले....कारण ती माझ्या "स्वीटहार्ट".. ची निशाणी होती....जर तुझ्या बाबांनी मला हे नाही सांगितले तर ...मी तुला खरं काय ते सांगणार अशी धमकी दिली होती....म्हणून मग त्यानीं हे सांगितले....कौस्तूभ ....तुला हे लग्नाच्या आधी माहित होते....मग आधीच का नाही बोलला .अग वेडाबाई ...मी जर तुला हे आधी सांगितले असते ....तर तू माझ्यासोबत लग्न केले असते का...?बघ आज किती छान दिवस आहे...तुझ्या आणि माझ्या स्वीट हार्ट आज तिसरा वाढदिवस आहे....मी गाडीत केक आणि भरपूर खेळणी आणलीत....इतक्यात गाडी आश्रमाच्या दाराजवळ पोहचली....एक घाऱ्या डोळ्यांची, कुरळ्या केसांची..गोरीगोरी पान मुलगी आमच्या पुढ्यात उभी राहिली....कौस्तुभ ला हस्तान्दोलन करत म्हणाली ....हाय स्वीटहार्ट ....मी तिच्याकडे देहभान विसरून पाहतच राहीले.... कौस्तुभ नेच मला भानावर आणले....स्वीट हार्ट आज तुझा बर्थडे बरोबर....होय स्वीटहार्ट....याच दिवशी मला आश्रमात आणून ठेवले...मग मी आज तुला एक स्पेसिअल गिफ्ट देणार आहे...डोळे मिट पाहू....तिने डोळे मिटले.....कौस्तुभने मला तिच्या पुढ्यात उभे केले....म्हणाला चल उघड डोळे आता....तिने डोळे उघडले...म्हणाली कुठे आहे माझे स्पेसिअल गिफ्ट....माझा हात तिच्या हातात दिला .....म्हणाला हे तुझे स्पेसिअल गिफ्ट....तुझी आई....'खरी आई ..स्वीटहार्ट ..' होय राजा अगदी खरी.....आणि तिने आईला... आई म्हणत गच्च मिठी मारली.....निलिमाच्या डोळ्याला अश्रू च्या धारा लागल्या होत्या....आपल्या डोळ्यातील महापुराने ....आज तिने आपल्या लेकीला न्हाऊ घातले होते.....ती चिमुकली कौस्तूभ कडे पाहून ... म्हणाली... स्वीट हार्ट ...तू खूप चांगला आहेस ...शेवटी बोलल्या प्रमाणे..मला माझ्या बर्थडे चे "आई"....हे गिफ्ट दिलेस.....love you .....स्वीटहार्ट...love you too .........स्वीटहार्ट...
समाप्त....
सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण

🎭 Series Post

View all