स्वीट हार्ट

सामाजिक
"स्वीटहार्ट" ....भाग 3
मग रोज फोन करायचा...बोलतांना खूप जपून बोलायचं...प्रत्येक वेळी जाणवायचे....माझ्याबद्दलची काळजी...जुन्या आठवणीतून बाहेर काढायचा आटोकाट प्रयत्न करायचा.... लवकरच चांगल्या मुहूर्तावर आमचे लग्न लागले....अगदी साधेपणाने...हनीमून साठी उटी ला घेऊन गेला...आमचा नवा संसार सुरु झाला.....हळूहळू मी संदीपच्या प्रेमाच्या कोषातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होती....तोही सगळे माझ्या मर्जीनेच करत होता....एखादा महिना झाला असेल....हा ऑफिस मधून घरी आला....कॉटवर बॅग टाकून हातपाय धुवायला गेला....मी काहीतरी विचारायचे म्हणून बेडरूम जवळ आली ....हा कोणाला तरी स्वीटहार्ट , स्वीटहार्ट करत होता....मी जरा अजूनच लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न केला ....हा म्हणाला उद्या नक्की येतो भेटायला ....सॉरी गडबडीत नाही जमले.....बरं तुझ्यासाठी काय आणू.....पुढची लिस्ट एकूण मी अचंबितच झाले....हेअर पिन, बांगड्या, केक, आणि chocolate....शेवटचे वाक्य तर काळजाला छेदच करून गेले....bye स्वीटहार्ट....आणि फोन ओठाला लावून एक दीर्घ चुंबन घेतले....मी तर जागच्या जागी थरथर कापायला लागली....पायाखालची जमीन सरकून भूमातेने पोटात घ्यावे ...असे वाटत होते...कसेबसे स्वतःला सावरले....आणि जेवणाचे ताट वाढायला घेतले...फ्रेश होऊन तो जेवायला आला.....जणू काही घडलेच नाही अस्या अविर्भावात....मस्त गप्पा मारत होता...मी कशीबशी जेवले....हे मात्र त्याच्या नजरेतून सुटले नाही....झोपायला गेल्यावर पहिला प्रश्न केला ....निलु तुला बरं वाटत नाही का....?जेवणात अजिबात लक्ष नव्हतं तुझं....काय झालं...?कोणी काही बोललं का....? काय सांगणार....आईची आठवण आली...अशी थाप मारून गप्प बसले....तर म्हणतो कसा...जातेस का मग आईला भेटायला....?सांगू का ड्राइवर ला...?उद्याच जा...हवं तर.....मला तर आता खूपच राग आला....मनात विचार आला...मग काय स्वीटहार्ट ला भेटायला रान मोकळे....असं वाटलं त्याला खडसावून विचारावं.... अरे तुला असं फसवायचंच होत ....तर का लग्न केल माझ्यासोबत...?.का केलीस माझी अशी प्रतारणा....?पण दुसऱ्या कुशीवर तोंड करून झोपी गेले....आज पुन्हा शुक्रवार होता....रोजच्या प्रमाणे आला....बेडरूम मध्ये गेला....फोन वाजला पुन्हा तेच स्वीटहार्ट....आज मनाचा पक्का निर्धारच केला.....काही झालं तरी चालेल ...पण या स्वीटहार्ट चा सोक्षमोक्ष लावायचा....पण हा आज जरा जास्तच खुश होता....दोन दिवसासाठी त्याचा लहान भाऊ आला होता...मग मीच गप्प बसले....आता हा या महिन्याचा शेवटचा शुक्रवार....तो आला... बेडरूम मध्ये गेला ....आणि काही कामासाठी पुन्हा हॉल मध्ये आला...मी तेवढ्या वेळात बॅगेतला मोबाईल काढला....सायलेंट मोड वर केला....हा हातपाय धुवायला बाथरूम मध्ये गेला...मी मोबाईल हातात धरून फोन ची वाट पाहू लागली.....तेवढ्यात रींग वाजली.....मी हळूच मोबाईल घेऊन बाल्कनीत गेले...पलीकडून एका लहान मुलीचा आवाज होता....हाय स्वीटहार्ट.....मी दचकलेच ....बापरे !म्हणजे याला एक मुलगी पण आहे....अरे देवा...!घोर फसवणूक झाली माझी...!तिकडून पुन्हा त्या मुलीचा आवाज ....स्वीटहार्ट तू मला कधी घेऊन जाणार तुझ्या घरी....दरदरुन घाम फुटला मला.....पुन्हा म्हणाली स्वीटहार्ट ....तू बोलत का नाहीस.....? मी घाबरून फ़ोन कट करून....सायलेंट मोड काढून बेडरूम मध्ये आणून ठेवला.....पुन्हा फोन वाजला ....कौतुभ ने उचलला...तिचा प्रश्न स्वीटहार्ट ...मी आधी फोन केला.... तर तू बोलत का नव्हता......नाही ग मोबाईल ची रींग वाजलीच नाही....मी तर आताच फोन उचलतो....त्याने उद्या भेटायचा वादा करून फोन ठेऊन दिला...जेवायला बसलो....जेवण आटोपली झोपायला गेल्यावर मी विषयच काढला....कौतुभ मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ...अग बोल ना...?त्यासाठी परमिशनची काय गरज आहे...? बिनधास्त बोल.....काय निर्लज्ज माणूस हा....? रागच आला....मग मी विचारायला सुरवात केली....कौतुभ खरखर सांग....ही स्वीटहार्ट....कोण?....ती लहान मुलगी कोण....? अग अनाथ आश्रमातली मुलगी आहे ती...लहान आहे...तीन वर्षांनी होईल उद्या....अरे पण तुझा काय समंध....?आणि तू कधी बोलला नाहीस...? अग त्यात सांगण्यासारखे असते तर नक्की सांगितले असते....कौतुभ ...तू माझ्यापासून काहीतरी लपवतो.... तुझं काही लफडबिफड होत का...?अगदी खरं खरं सांग....नाही ग बाई खरच असं काही नाही.....हे बघ कौतुभ....आज जर तू मला त्या मुली बद्दल खरं खरं नाही सांगितलं तर.....तर काय निलू....?यापुढे मी तुझ्यासोबत नाही राहू शकणार....प्लीज काय ते खरं सांग.....? ठीक आहे निलू ....मी तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देतो .....पण आज नाही... उद्या....एक मात्र नक्की ...तुझा कौस्तुभ तुला कधीच फसवणार नाही....विश्वास ठेव....निश्चित झोप....आणि एक दीर्घ चुंबन घेत.. मिठीत घेऊन झोपी गेला....
सकाळी जातांना सांगून गेला... निलू बरोबर सहा वाजता तू तयार राहा....मला जरा महत्वाचे काम आहे...ते करून येतो....बाकी गाडीत बोलूच....बाय करून निघून गेला....आज का कोण जाणे ....? घड्याळ पण हळूहळू फिरते असे वाटत होत...एक एक क्षण एकेका युगासारखा वाटत होता....सहा वाजले...मी आवरून तयारच होते....लगेच निघालो....तो बोलू लागला.....तुला आठवते निलू...आपलं लग्न ठरलं होतं...हो रे सगळे आठवते.....बोल तू पुढे....मग मी आपला दोघांचा फोटो काढला होता...हो तेही आठवते.....तोच फोटो मी माझ्या पुण्याच्या मित्राला पाठवला.....फोटो पाहताच.. तो मला काही न बोलता.....सरळ नागपूर ला आला....आणि त्याने जे काय सांगितले त्याने धक्काच बसला....असं काय सांगितले त्याने...तो सांगू लागला ...तुझ्या बहिणीच्या मिस्टरांना अवॉर्ड मिळाले...होते ...होना... हो...मग तेव्हा याने तुला त्याच्या सोबत पहिले....तेव्हा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र होत...
क्रमशः....
सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण

🎭 Series Post

View all