स्वीटहार्ट

सामाजिक
"स्वीट हार्ट".. भाग 2
शुद्धीवर आले तर ....मी दवाखान्यात ऍडमिट होते....हात फ्रॅक्चर होता....ऑप्रेशन झाले होते....संदीप ....संदीप ...करून मी जोरात किंचाळले...... पुन्हा बेशुद्ध झाले...अर्ध्या तासाने पुंन्हा शुद्धीवर आले.....संदीप बद्ल विचारले तर.....तो दुसऱ्या रूम मध्ये आहे म्हणून सांगितले.....मला त्याला भेटायचे होते....तुला खूप लागले
आहे...त्यामुळे आराम कर...तो ठीक आहे... आणि मी पुन्हा अर्धवट ...निद्रेच्या अधीन झाले...
दोन दिवस झाले...आता मला थोडे बरे वाटत होते...उभी राहण्यापूरते बळ माझ्यात नक्कीच आले होते....मी आज हट्टच केला....आज जर मला संदीप ला भेटू दिले नाही तर...पाण्याचा थेंब सुद्धा मी घेणार नाही...आई , बाबांनी खूप समजावले...ताई आणि भाऊजी पण आले होते...पुण्यावरून...पण मी कोणाचेही एकूण घ्यायला तयार नव्हते...आई , बाबा, ताई आणि भाऊजी बाहेर बसले होते...डॉक्टर राऊंड ला येणार होते...मी डोळे मिटून पडली होती...दोन सिस्टर आत आल्या...माझे मिटलेले डोळे पाहून...त्यानां वाटले मी गाढ झोपली असावी...त्या आपापसात बोलत होत्या...फार वाईट झाले या मुलीचे....?साखरपुडा होऊन महिना सुद्धा झाला नव्हता...गाडीचा अपघात होऊन तिचा भावी नवरा ...जाग्यावरच गतप्राण झाला...अजून तिला काही सांगितले नाही...पण तिची होणारी सासू हिच्या नावाने शंखनाद करत होती...पांढऱ्या पायाची....!अपशगुनी...!काय... काय..बोलत होती...खूप वाईट झाले बिच्चारीच्या बाबतीत...आणि मी जोरात संदीप म्हणून ओरडले...पलंगावर उठून बसत...धावतच सुटले...कुठे आहे माझा संदीप...प्लीज ...मला माझा संदीपला एकदा डोळ्याने पाहू द्या...आणि पुन्हा बेहोष झाले...
दोन दिवसाने मला सुट्टी मिळणार होती...मी देवाला मनोमन म्हणत होते...तुला न्यायचेच होते तर आम्हाला दोघांना पण सोबत न्यायचे होते...का मला एकटीला ठेऊन गेला...?कशी जगू मी माझ्या संदीप शिवाय...?झाली सुट्टी एकदाची... 45 दिवसाने हाताचे प्लास्टर काढले... हात बरा झाला होता...बाकीच्या जखमा पण भरत आल्या होत्या...पण संदीप शिवाय ...माझ्या मनाची जखम भळभळून वाहात होती...एक दिवस सकाळी अचानक मला मळमळ वाटायला लागले...उलटीच झाली...औषध गोळ्यांमुळे असेल असे वाटले...दोन महीने झाले पिरियड आला नव्हता...तसाही माझा रेग्युलर नव्हता...आणि या दुखान्यामुळे त्याचे विस्मरनच झाले...मग मला तो दिवस आठवला आणि अंगावर सरसरून काटाच आला...
मनाचा हिय्या करून आईला हे सांगितले...सोबत हेही सांगितले ...काही झाले तरी मी abortion करणार नाही...संदीपच्या आणि माझ्या प्रेमाची निशाणी...मी हे बाळ वाढवणारच...जर माझ्यावर जबरदस्ती केली....तर मीच माझ्या जीवाचे काहीतरी बरेवाईट करून घेईन...रात्री बाबा घरी आले...आईने बाबांना हे सांगितले...खूप शांत होते ते....काहीच बोलले नाही...दोन दिवसाने म्हणाले...तुला बाळ वाढवायचे आहे न...हो बाबा...चल मग आपण पुण्याला जाऊ ताईकडे... मी संदेश रावांना पूर्ण कल्पना दिली आहे...आणि आम्ही पुण्याला आलो...माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आलं... भाऊजींनी त्यांच्या ओळखीने मला जॉब शोधला...नवरा सैन्यात आहे...असं सांगून माझी नोकरी सुरु झाली...एथावकाश ...नववा महीना सरत आला...ताईने बाबांना व आईला आधीच बोलावून घेतले होते...माझ्या गरोदर पणाबद्दल फक्त ताई , भाऊजी, आई ,बाबा आणि मी ....याशिवाय नातेवाईकांमध्ये कोणाला
काहीच माहित नव्हतं...अचानक पोटात दुखायला लागलं... ऍडमिट केलं...कळावर कळा येत होत्या...आणि दोनच तासात बाळंतीण झाले...डॉक्टरांनी मुलगी झाली ....पण आम्ही तिला वाचवू शकलो नाही...असे सांगितले...संदीपच्या आणि माझ्या प्रेमाची... शेवटची निशाणी... देवाने...हिरावून घेतली होती...खूप रडले मी...पण नियती पुढे कोणाचे काहीच चालत नाही...नियती माझ्याही सहनशक्तीचा अंत पाहत होती...
घरी आलो...कशातच मन लागत नव्हते...इकडे मुलीची आठवण तिकडे संदीपची... शेवटी मी अमरावतीला ...आई बाबांसोबत येण्याचा निर्णय घेतला...तसेही कंपनी मला डिलिव्हरी नंतर...अमरावतीलाच पाठवणार होते...पगार थोडा पुण्याच्या मानाने कमी होता...पण मला चालणार होत...आणि पुन्हा आई ,बाबा आणि मी अमरावतीला आलो...पंधरा दिवस आराम करून ...जॉब करायला सुरुवात केली होती...संदीपचे आईबाबा ते घरं कायमच विकून मुंबईला शिफ्ट झाले म्हणे....
हळूहळू सावरले मी स्वतःला...कामात रमवून घेतले...आणि जवजवळ अडीच वर्षाने...आज बाबांनी पुंन्हा लग्नाचा विषय काढला...
चार पाच दिवसाने आत्याचा पुन्हा फोन आला...दादा मला खूप बरे नाही ...तुम्ही तिघेही या...झालं शुक्रवारी ऑफिस करून निघालो आम्ही...आत्या मस्त जेवण बनवत होती...मी आत्याला म्हणाले काय ग आत्या ...?तुला बरं नव्हतं न...?जेवण बनवायचा उल्हास बरा आला मग...म्हणाली तुम्हा सर्वांची खूप आठवण आली होती...आणि तू काही आत्याला भेटायला येत नाही...मग बोलले थोडं खोटं... आजारी आहे म्हंटल तर कशी आली पटकन...आणि दुसरं आणि मुद्याचं बरका निलु... काय आता...?तुला उद्या कौस्तुभला भेटायचे आहे...आत्या काय हे...?हे बघ बाळा ...तुझ्यावर कोणतीच जबरदस्ती नाही...तू त्याला भेट...दोघांचे मन जुळले तरच पुढचे बोलणे...अन्यथा नाही...तुझ्या इच्छेविरुद्ध तर नाहीच नाही...उद्या सकाळी दहा वाजता तू त्याला भेटणार आहे...आणि हो त्याला सगळं खरं सांगून टाक... मनात आले...काय खरं सांगू आत्या ....?बाबांनी तर बाळाविषयी काहीच सांगायचे नाही म्हणून...डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावली ग...बाकी तर तू सांगितलेच आहे.....बोलता बोलता जेवण झाली...उद्याच्या पहाटेची वाट पाहत झोपी गेलो...बरोबर दहा वाजता कौस्तुभ मला घ्यायला आला....kfc मध्ये जाऊन...कॉफी घेतली ...त्याला मी माझ्याबद्दल ...बाळ सोडून ...सगळे सांगितले....खूप उमदे व्यक्तिमत्व होते त्याचे...स्वभाव पण खूप चांगला....त्याला नकार द्यायला काहीच कारण नव्हते....मॉल मध्ये फिरून , थोडी शॉपिंग करून एक वाजता त्याच्या घरी आलो....घरी गेल्यागेल्या तो बोलला आई, बाबा मला नीलिमा पसंद आहे...आता निर्णय तिला घेऊ देऊ या....आणि मग आम्ही दोघे आत्या कडे आलो...तिथेही याने आपला जाहीर होकार कळवला.....आता विचार करायची माझी पाळी होती...आई ,बाबा,आत्या ने खूप फोर्स केला....ताई आणि भाऊजी याचे म्हणणे तेच पडले...शेवटी माझाही होकार देऊन आम्ही घरी आलो...मी फक्त एकच अट घातली ....लग्न अगदी साधेपणाने....आणि साखरपुडा सुद्धा लग्नाच्या आधल्या दिवशी... कबुल झाला तो....सोबत फोटो काढला त्याने...म्हणाला मित्रांना दाखवायला काढतो....
क्रमशः......
सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण

🎭 Series Post

View all