"स्वीटहार्ट"

सामाजिक
"स्वीटहार्ट".......भाग 1
निलू ये निलू...आले... आले...काय बाबा....?एक ग्लास पाणी दे...आणि मस्त आल्याचा चहा कर....प्रवासाने डोकं जॅम जड झालं बघ...निलू आई दिसत नाही कुठे... बाहेर गेली का...? हो बाबा... आरती काकूंसोबत मार्केट ला गेली....येईलच एवढ्यात....म्हणालीच होती...लवकर येते ....बाबा यायच्या आधी....पण बाबा तुम्ही लवकर कसे काय आलात...?अग मीटिंग लवकर संपली......थोडं खाऊन लगेच निघालो.....बरं तू चहा ठवते का..? का आई आल्यावर....?तसा जरा पडतो मग मी....बाबा करा तुम्ही आराम...बाम लावून देऊ का....डोक्याला...? बरं वाटेल...आणि बाम लावायला घेतला....निलू...काय बाबा...?बाळा तुझ्याशी थोडं बोलायचं होत...बोला न बाबा ....बाबा मला नाहीत आहे...तुम्हाला काय बोलायचे ते....?नका न बाबा पुन्हा पुन्हा तो विषय काढू....आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास होतो त्याचा.....कळते न बाळा तुला....मग का असा वेडेपणा करते.....? निलू आत्याच्या शेजारी नवीन कुटूंब राहायला आले....काल आत्या सांगत होती.....आपल्याच जातीच स्थळ आहे....आत्याशी त्यांचा छान घरोबा झाला आहे....मुलगा नागपूरलाच PWD मध्ये इंजिनीअर आहे....दोन भाऊ ...एक बहीण.... बहिणीचे लग्न झाले....भाऊ MBA करतो...पुण्याला...आई ,वडील दोघेही शिक्षक आहे....बोलताबोलता तुझा विषय काढला......तुझ्या आणि संदीप बद्दल सगळे सांगितले....खूप वाईट झाले म्हणाले.....म्हणाले इतक्या सुंदर आणि घरंदाज मुलीसोबत कोणीही लग्न करेल....आणि साखरपुडा होऊन त्याचा अपघात झाला... त्यात तो गेला ....त्यात तिचा काय दोष....? तुझा फोटो दाखवला आत्याने....खूप आवडला त्यांना....तुमच्या भाचीला भेटायला आवडेल....असं म्हणाला तो मुलगा आत्याला....परवा आत्याकडे मुक्काम केला तेव्हा सांगत होती ती.....दुरूनच मीही पाहिला बर मुलगा....खरंच handsome आहे हो...एखाद्या राजकुमारा सारखा.....कौस्तुभ नाव त्याचे.... कौस्तुभ रानडे....आत्या तर मागेच लागली.....चांगलं स्थळ हातातून जायला नको म्हणून.......ठिक आहे बाबा विचार करून सांगते...असं म्हणून ...मी तो विषय तिथेच थांबवला...
तेवढ्यात आई पण आली.......चहा घेऊन .....रात्रीच्या जेवणाची तयारी करायला गेली....मी रुम मध्ये जाऊन....सरांनी सांगितलेले ऑफिसचे काम करत बसले.....बाबांनी पुन्हा आज लग्नाचा विषय काढला.... आणि मला संदीपच्या पहिल्या भेटीपासून सगळे.... डोळ्यासमोर जसेच्या तसे दिसायला लागले.....संदीपचा बंगला सिद्धिविनायक कॉलनीत ....रोड ला लागूनच होता.....माझा तो रोजचाच रस्ता...रोज सकाळी कॉलेजमध्ये जातांना येतांना तो दिसायचा....तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता....बी.कॉम करून त्याला बँककिंगच्या परीक्षा द्यायच्या होत्या....त्याचा तो क्लास मात्र आमच्या घराकडे होता...संध्याकाळी रोज यायचा क्लास ला....मी त्याला लपून नकळत बघायची....आता त्याला पाहण्याचा मला छंदच जडला.....त्याच्या येण्याच्या वेळेला माझा नित्यक्रम चालू....मग दोन दिवस तो....त्याच्याही दारावर दिसला नाही....आणि क्लासला सुद्धा आला नाही ...खूप बेचेन झाले मी....काय करावे....?थाप मारून घरी जावे.... तर मला त्याचे नावही माहित नाही....त्याच्या गेटजवळ जरावेळ घुटमळले..... आतून सर्व शांत शांत वाटत होत....भांड्याचा मात्र आवाज येत होता.....कुठेतरी बाहेरगावी गेला असावा हा....असा विचार करून मी मागे वळले....समोर हा....बापरे...! पार गोंधळून गेले मी.....तो भुवया उंचावून...खूण करत होता....जणू विचारत होता ...काय..? कसं ..काय ....? कसं काय येणं केलं...? त्याने न विचारताच मी सांगू लागले ...काही नाही ...खरंच काही नाही....आणि मी जायला लागले....हातच धरला माझा...घट्ट....जणू कधीही न सोडण्यासाठी....मी हाताला सोडवण्याचा प्रयत्न करत होते...पण मनातून मात्र सुखावले होते....नाव काय तुमचे.....? मी लटक्या रागानेच म्हणाले ....तुम्ही कोण विचारणारे.....? आणि काय संमध...? अच्छा असं आहे तर.. !सॉरी हं...!माझा काहीतरी गैरसमज झाला....!खरंच ..!रिअली सॉरी..
मला उगाच वाटत होत.....काय वाटत होत तुम्हाला....?आणि ओ मिस्टर ! तुमच्या वाटण्याशी मला काही घेणेदेणे नाही....सोडा माझा हात...तर तो हात पुन्हा घट्ट धरत म्हणाला...मला वाटलं .....दारावरून जातायेता मला दृष्टीक्षेप देणारी...चोरट्या नजरेने...रोखून पाहणारी....आणि मी तिच्या घरावरून क्लासला जातांना ...मला लपून पाहणारी मुलगी... तुम्हीच आहात.... खरं सांगू मीही तिच्या प्रेमात पडलो....अगदी तुमच्या सारखीच दिसते ती....true copy.... असं म्हणत त्याने हात सोडला....सॉरी ..पुन्हा अशी चूक नाही होणार......आणि कानाला हात लावले....मी ही तोऱ्यातच म्हणाले....its oke.... आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले.....आज मला हे समजून चुकले कि... तोही माझ्यावर प्रेम करतो....त्यानेही मनोमन ओळखली असावी माझी भावना....मनातून प्रेम करणाऱ्याला एकमेकांचे अंतःकरण कळते म्हणतात....खरेच असावे....असाच चोरटा दृष्टीक्षेप...घायाळ नजरेने त्याने मला ...मी त्याला पाहाणे....चालू होते...त्या दिवसापासून त्याने पुन्हा कधी माझ्याशी बोलायचा प्रयत्न देखील केला नाही....फक्त नजरभेट.... तीही चोरटी......
त्याचा बी .कॉम. चा निकाल लागला कॉलेज मध्ये दुसरा आला....बँकेची परीक्षा सुद्धा पास झाला.....मी त्या दिवशी अशीच त्याच्या दारावरून जात होती....मला बघून मुद्दाम आईला म्हणाला.....आई माझा बँकेच्या परीक्षेचा निकाल लागला ग...उत्तम मार्काने पास झालो....चार तारखेला इंटरव्ह्यू साठी बोलावले...म्हणजे परवाच .....आई ऐकते आहेस न....हो हो एकते रे....आणि तू परवाच बोलला मला....अरे मी तर त्यादिवशी तुझ्या आवडीचा जेवणाचा बेत पण केला होता ....हो ग !विसरलोच मी...अग माझ्या लक्षातच नाही बघ....
कॉलेज मध्ये दुसरा आला....बँकिंगची परीक्षा पास झाला....आता इंटरव्ह्यू.....मी मनाशी पक्का हिय्या केला.... याला कसेही करून अभिनंदन.....आणि बेस्ट ऑफ लक करायचेच .....पण कसे...एक एक आयडिया डोक्यात येत होत्या... पण प्रत्यक्षात अमलात आणायच्या कश्या.....? डोक्याचा भुगा होत होता....शेवटी एक कल्पना सुचली.....एक छान गुलाबी पेपर घेतला....त्यावर स्केच पेनने मस्त सुवाच्य अक्षरात......अभिनंदन....!? सुंदर गुलाबाचे फुल काढले....आणि इंटरव्ह्यू साठी खूप खूप शुभेच्छा ......खाली नाव आणि मोबाईल no लिहून ...एका लिफाफ्यात तो कागद टाकला....एक बारीकसा दगड पण घातला....जेणे करून पाकीट फेकल्यानंतर त्याच्या परंत पोहचावे....तो बाहेरच घुटमळत होता...जणू मी त्याला आज विश करणार ... समजले असावे...मी इकडे तिकडे पहिले.....लिफापा त्याच्या गेट मध्ये फेकला.....आणि झपाझप चालायला लागले......हळूच मागे वळून पाहिले...त्याने लिफापा अलगद उचलून ओठाला लावला होता...त्याने ओठाला लिफापा लावला.....पण का कोण जाणे....एक हलकासा रोमांच माझ्या अंगावर आला....जणू काही मलाच......आणि माझे मलाच हसू आले....
रात्री मी दिलेल्या मोबाईल no वर आधी समस...हाय नीलिमा ! मी संदीप ...कशी आहेस...रिप्लाय ची वाट न पाहताच कॉल केला....माझे नाव नीलिमा मी चिट्टीवर लिहूनच पाठवले होते....मला वाटलेच तो नक्की कॉल करणार....आणि मोबाईल ची रींग वाजली....पटकन फोन उचलला ....हॅलो...! मी संदीप....! हॅलो मी नीलिमा.....कशी आहेस....मजेत....तुझ्या शुभेच्छा मिळाल्या.....खूप खूप धन्यवाद....thank you.... आणि all the best.... इंटरव्ह्यू साठी....कुठे आहे इंटरव्ह्यू....नागपूरला....उद्याच जाणार आहे....मित्र असतो तिथे.....त्याच्याकडे थांबेन....तुझा काय प्रोग्रॅम आहे सुट्ट्यांमध्ये....?अजून नाही ठरवले....आत्याकडे नागपूर ला जाऊ...पुढल्या आठवड्यात ...ते बाकी फिक्स आहे....नीलिमा एक विचारू ....विचारणा संदीप ...मी खरंच तुला आवडतो का ग....?हे रे काय विचारणे झाले....तस नाही ग.....आज पहिल्यांदा आपण फोन वर बोलतोय.....या आधी नजरेतून बोलत होतोच संदीप....मला तर वाटत प्रत्यक्ष न बोलताही मूक , नजरेतील संवाद खूप काही बोलून जातो....हेही खरंच ग....पहिल्यांदा तुझा हात हातात घेतल्यावर तुझी नजर....बरंच काही बोलून गेली....तुझा तो लटका राग....हात सोडवण्याची खोटीच धडपड....ते नखरेल लाजने....बापरे....! पुरता घायाळ झालो होतो मी.... ! आणि मग खऱ्या अर्थाने तुझ्या प्रेमात पडलो बघ....चल काहीतरीच तुझे....! ये नीलिमा तू आता पण लाजते आहेस न....दिसते मला मोबाईल मधून.....खरच लाजली कि खूप छान दिसतेस तू......बस बस ....! पुरे झालं कौतुक माझ....खूप उशीर झालाय ...झोप आता...हो ग साडेबारा वाजलेत....बाय मीनल...शुभ रात्री.... स्वीट हार्ट....same to you dear.... bye..... आणि फोन ठेवला....गोड स्वप्न पाहतच निद्रादेवीच्या अधीन झाले.....
आता आमचे फोनवर रोजच बोलणे होत होते......एक महिन्यात त्याला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये PO म्हणून जॉब लागला... घरूनच UP- DOWN करता येईल.....म्हणजे गावाजवळच पोस्टिंग मिळाली....बघता बघता त्याच्या नोकरीला दीड वर्ष होत आले.....आता आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात.... आकंठ बुडालो होतो....माझे पण ग्रॅजुएशन पूर्ण झाले होते....मी आता कॉम्पुटर चा क्लास आणि घरी बसून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते....त्याच्या घरी त्याच्या लग्नाचा विषय निघाला....पण घरी सांगायचे धाडस होत नव्हते.....कारण त्याची आई पक्की कर्मठ होती....जात- पात मानणारी....त्यामुळे या लग्नाला ती होकार देईल याची शक्यताच कमी....खूप टेंशन मध्ये होता तो....एकदा तो म्हणाला ....नीलिमा माझ्या घरचे या लग्नाला तयार होईल असे नाही वाटत....जातीचा पक्का पगडा आहे घरच्यांवर......शिवाय ....समाज काय म्हणेल....?ही भीती.....खरंच काय करावे काहीच सुचत नाही.....?ये नीलिमा..पळून जाऊन करूयात का आपण लग्न....?.हे बघ संदीप ....असा विचार सुद्धा डोक्यात आणू नको....माझ्या घरचे समजून घेतील मला....तुझ्या घरच्यांना कसे समजवायचे ते तू ठरव....पण हे लग्न होईल तर दोन्ही घरच्या संमतीने ....अन्यथा नाही.....तू ठरव कसे समजवायचे तुझ्या आईबाबांना.....मुख्य म्हणजे आईला....
हो नाही करता करता.... त्याच्या आईने एकदाचा दिला आमच्या लग्नाला होकार.....
मग रीती प्रमाणे.....मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला....एक मात्र त्याच्या बाबांनी समझदार पणा दाखवला......आईच्या बऱ्याच अपेक्षा असतांना त्यानीं ....काहीही देणे घेणे न करता लग्न करायचे कबुल केले.....सप्टेंबर ची 15 तारीख ठरली साखरपुड्याची....जोरात साखरपुडा झाला....आणि आता आम्ही अधिकृत फिरायला मोकळे झालो....त्यादिवशी आम्ही असेच फिरायला गेलो...ऑक्टोबर महीना होता....अधेमधे पाऊस पडतच होता.....संदीपने बाईक काढली...आणि अंबामातेचे दर्शन घेऊन शिवनेरी ला फिरायला गेलो...अचानक खूप अंधारून आलं....झाडाखाली हातात हात घालून....पुढील आयुष्याची स्वप्न पाहत होतो....अचानक गडगडाट झाला ....मी संदीपला घट्ट मिठीच मारली.....त्याने हळूच माझी हनुवटी वर करून....माझा भेदरलेल्या चेहरा पहिला.....आश्वासक नजरेने....अलगद त्याचे ओठ माझ्या ओठावर ठेवले.....मी त्याच्या छातीशी लपण्याचा प्रयत्न करू लागली.....अचानक दोन्ही हाताचा विळखा माझ्या भोवती पडला.....आणि चुंबनाचा वर्षाव करू लागला....मी सुद्धा देहभान हरपून...त्याच्याशी एकरूप झाले...निर्मनुष्य जागा ती.....प्रेम करता करता ....त्याचा आणि माझा ...दोघांचाही तोल गेला....आणि आमच्या हातून होऊ नये ती चूक झाली.....आमच्या प्रमाने तो पाऊसही आता शांत झाला होता....मला माझी चूक कळून चुकली.... आणि हमसून हमसून रडायला लागले.....त्याने मोठया महत्प्रयासाने मला समजावले....काही होणार नाही ....मी आहे ग..आणि तसेही आपले डिसेंबर मध्ये लग्न होणारच आहे.....तू नको काळजी करू...पुन्हा माझ्या माथ्यावर अलगद ओठ टेकवले....मी त्याला घट्ट मिठी मारली ....ही मिठी माझ्या वेगळ्याच संकेची होती....त्याने पुन्हा हनुवटी वर करून ....एक दीर्घ चुंबन घेतले....आणि पोटाशी घट्ट धरले...हळूहळू मी सावरले....आणि जायला निघालो.....थोडे पुढे जातोय तर....समोरून एक भरधाव ट्रक येत होता....त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि आमच्या गाडीला उडवले.....इतकेच आठवते....
क्रमशः.......
सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण

🎭 Series Post

View all