स्वयंपाक ( भाग 4 )

This is the fourth part of the marathi story swayampak. As we have seen till now that Tejashree manges to learn to cook well and after that she is now willing to learn other household works too which will make her an ideal housewife. She is trying he

रोहित घरी परतला होता. त्याने बघितलं तेजश्री घरी नव्हती. त्याच्याजवळ दुसरी चावी होती. त्या चावीने त्याने दार उघडले. तो बॅग बाजूला ठेऊन काही क्षण सोप्यावर बसला. नंतर फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये आला. नंतर पाणी पिण्यासाठी तो किचनमध्ये आला. त्याला पाणी पिता-पिता पुरणपोळीचा सुगंध आला. त्याने बघितलं किचन ओट्यावर एका ताटावर पेपर ठेवलेला होता. त्याने तो पेपर बाजूला केला. त्या ताटामध्ये दोन पुरणपोळ्या ठेवलेल्या होत्या. तो त्यांना बघून खुश झाला. त्याने दोन्ही पुरणपोळ्या संपवल्या.

नंतर तो हॉलमध्ये आला. हॉलमध्ये तेजश्री बसलेली होती.

तो म्हणाला, "अगं पुरणपोळ्या खूप छान झाल्या होत्या. पण आज अचानक पुरणपोळ्या कस्याकाय केल्या?"

ती म्हणाली, "मी नाही बनवल्या!"

तो म्हणाला, "मंग कुणी बनवल्या?"

ती म्हणाली, "अरे ते शेजारच्या काकूंनी बनवल्या होत्या. त्यांचा मुलगा सुयश चा वाढदिवस होता. तिथेच गेलेली होते मी."

तो म्हणाला, "अच्छा."

ती म्हणाली, "तुला खूप आवडतात का पुरणपोळ्या?"

तो म्हणाला, "हो."

ती म्हणाली, "बरं ठीक आहे. करते मी ट्राय."

तो म्हणाला, "हो. थँक्यू."

दुसऱ्या दिवशी ती सकाळीच उठली होती. तिची अंघोळ वगैरे झाली होती. तिने त्याच्यासाठी चहा-नाश्ता पण बनवला होता. तिला नवल वाटलं की हा अजून उठला का नाही! तब्येत वगैरे तर ठीक आहे ना? तिला काळजी वाटू लागली. तिने त्याला उठवलं.

तिने विचारलं, "तब्येत तर ठीक आहे ना?"

तो म्हणाला, "हो सगळं ठीक आहे. मला काय होणार?"

ती म्हणाली, "उठायला एवढा उशीर का?"

तो म्हणाला, "अगं आज सुट्टी आहे ना!"

तिने डोक्यावर हातच ठेवला. तो ओट्यावर ठेवलेला चहा-नाश्ता बघून हसू लागला. ती त्याच्याकडे रागाने बघू लागली.

तो म्हणाला, "अगं तुला थोडा ब्रेक हवा आहे. तू या गोष्टी खूपच सिरियसली घेतलेल्या आहेत. चल आज आपण मॉलमध्ये जाऊयात. तिथे आपण मूवी वगैरे बघूत."

ती म्हणाली, "हो. ठीक आहे."

नंतर त्याचं आवरल्यावर व चहा-नाश्ता झाल्यावर ते मॉलमध्ये गेले. थोडा वेळ बाहेर आल्यामुळे तिलाही जरा फ्रेश आणि रिलॅक्स वाटू लागलं. ते थोडा वेळ मॉलमध्ये फिरले. नंतर त्यांनी एक चित्रपट बघितला. छान विनोदी चित्रपट होता. दोघे खुश दिसत होते. नंतर त्यांनी दुपारचं जेवनही तेथेच केलं.

नंतर ते मॉल बघू लागले. मॉल बघता-बघता ती त्याला एका ज्वेलरीच्या दुकानात नेऊ लागली. त्याने तिला नकार देण्याचा प्रयत्न केला पण ती त्याला दुकानात घेऊनच गेली. तिथे ती हार बघू लागली. तिला एक हार खूप आवडला. त्याने किंमत बघितली. खूप महाग होता. तो थोडासा चिंतीत झाला.

तो म्हणाला, "हे बघ हार खूप चांगला आहे. आपण नक्की घेऊत पण काही दिवसांनी घेतला तर चालेल का? अगोदरच फ्लॅट चं डिपॉसिट आणि इतर वस्तूंमध्ये बराच खर्च झालेला आहे. माझी सेविंग पण तेवढी नाहीये."

ती म्हणाली, "बरं ठीक आहे."

ती थोडीशी नाराज झाली होती. तिला हार खूपच आवडला होता. ते दोघे घरी परतले. फ्रेश झाल्यावर तिला आठवलं की तिला पुरणपोळी ट्राय करायची होती. तिने पुरणपोळीचा व्हिडीओ वगैरे बघितला. नंतर ती तयारीला लागली. तिने डाळ गॅसवर चढवली होती.

ती कपडे आवरू लागली. कपडे आवरतांना तिला त्याचा तो शर्ट दिसला. त्या शर्टला तिने अजूनही बटन लावलेलं नव्हतं. तिने तो शर्ट बाजूला काढून ठेवला व ठरवलं की जेवण झाल्यावर ती बटन लावेन.

तिने नंतर छान पूरण तयार केलं. त्याच्या पोळ्या तयार केल्या. त्या गरम-गरम पोळ्यांवर साजूक तूप ओतून त्याला त्या वाढल्या. त्याने त्या आवडीने खाल्या.

तो म्हणाला, "छान झाल्या आहेत."

तसंतर तिला जाणवलं की त्या तेवढ्या पण छान झाल्या नव्हत्या. पण पहिल्या प्रयत्नाच्या मानाने छानच होत्या. तसंही त्याच्या आवडीचा पदार्थ होता म्हणून तो आवडीने खाणारच होता.

जेवण झाल्यावर त्याला जाणवलं की ती थोडीशी नाराजच होती. मॉलमध्ये तर ती आनंदी दिसत होती. त्याला प्रश्न पडला की हार न घेतल्यामुळे तर ती नाराज नसेल झाली ना? जेवढं अवघड गृहिणीचं काम असतं तितकंच अवघड कर्त्या पुरुषाचं पण असतं ना! सगळ्यांच्या गरजा भागवाव्या लागतात. भविष्यासाठी सुद्धा थोडे पैसे वाचवावे लागतात. सर्व कुटुंबियांचे हट्ट पुरवावे लागतात. एवढं सगळं ते बघत असतात. त्यात जर एखाद्या वेळेस एखाद्या कुटुंबियाला नकार दिल्यास कुटुंबीय त्यांच्यावरच नाराज होतात. त्यांची सगळ्यांना खुश ठेवण्याची इच्छा असतेच पण एखाद्या वेळी परिस्थितीच तशी असते. त्यांना थोडीच वाटतं की कुणी कुटुंबीय त्यांच्यावर नाराज व्हावा.

त्याला तिचा थोडा रागच आला आणि दुःख पण झालं. तिला स्वयंपाक जमत नव्हता, लवकर उठायला जमत नव्हतं. तरीपण त्याने तिला समजून घेतलं. मंग तिने पण त्याला समजून घ्यायला हवं होतं ना! जसं आपल्या घरी लग्न करून येणाऱ्या पत्नीला खुश ठेवणं पतीचं कर्तव्य असतं तसंच पतीची परिस्थिती समजून त्याला सुख, दुःखात साथ देणं हे पत्नीचं कर्तव्य नसतं का?. तो तिच्याशी शब्दही बोलला नाही. चुपचाप झोपी गेला.

पुढील भाग लवकरच.

आवडल्यास share नक्की करा तसेच खाली स्क्रोल करून मला ईरा ब्लॉगिंग वर follow नक्की करा.

©Akash Gadhave

🎭 Series Post

View all