स्वयंपाक (भाग 2)

This is part two of the series swayampak. This is a story of a newly married couple Rohit and Tejashree. As we saw in the previous part that Tejashree is learning to cook food. Now she wants to feed it to her husband. She wants to see his reactions.

रोहित घरी आला. तो थोडा थकलेला वाटत होता. तो फ्रेश होऊन सोप्यावर डोळे मिटवून बसला होता. तेजश्रीने बघितलं. ती त्याच्याजवळ येऊन बसली. नंतर ती त्याच्या पाठीमागे उभी राहिली व त्याचं डोकं दाबू लागली. त्याला खूप छान वाटलं.

ती म्हणाली, "डोकं खूप दुखत आहे का?"

तो म्हणाला, "नाही. फक्त थोडासा थकवा आहे त्यामुळे."

ती म्हणाली, "जेवायचं का?"

तो म्हणाला, "तू बनवला स्वयंपाक?"

तिने हसून मान हलविली.

तो म्हणाला, "अरे वा! चल लगेच वाढ."

ते जेवायला बसले. तिने दोन ताट घेतले. तिने सर्वप्रथम बटाट्याची भाजी वाढली. भाजीचा रंग तर चांगला दिसत होता. नंतर तिने पोळी वाढण्यासाठी दुरडीवरचं झाकन बाजूला केलं. ती स्तब्ध झाली. तो पोळीची वाट पाहू लागला.

तो म्हणाला, "अगं पोळी वाढ ना. मी तर खूप एक्साइटेड आहे तुझ्या हातचा स्वयंपाक चाखायला."

तिने हळूच हातात पोळी घेतली व हळूच त्याला वाढली. तिची नजर खाली होती. पोळीचा आकार वेगळाच होता.

तो म्हणाला, "अगं ठीक आहे. पहिला प्रयत्न आहे ना. तसंही आकाराशी काय करायचं आहे. चव चांगली हवी."

तिने होकारार्थी मान हलवली. त्याने पहिला घास घेतला. तिला त्याचे हावभाव बघायचे होते. ती त्याच्याकडेच बघत होती. त्याला ते जाणवलं.

तो म्हणाला, "पहिला प्रयत्न होता तरी छान झाली आहे भाजी."

तिने सुटकेचा श्वास सोडला. तिची मेहनत फळाला आली असं तिला वाटलं. नंतर तिने पहिला घास घेतला. तिच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद मावळला. तिला ठसकाच लागला होता. रोहित नजर लपवू लागला. ती नाराज झाली होती.

तो म्हणाला, "अगं थोडं तिखट जास्त झालं बाकी सगळं ठीक आहे. पोळ्या पण चांगल्या आहेत. तू नाराज नको होऊस. पहिल्या प्रयत्नात कुणाला सगळं जमतं?"

तिने मान हलवली. तो जेवू लागला. तिला जाणवत होतं की तो तिचं मन राखण्यासाठी जेवत होता.

ती म्हणाली, "जाऊदे. आज बाहेरूनच काहीतरी मागवूया. उद्या बघुत काय करायचं ते."

तो लगेच उठला. त्याने पिझ्झा ची ऑर्डर दिली. थोड्या वेळाने पिझ्झा आला होता. ती विचारात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट दिसत होतं. ती बराच वेळ विचारात होती. नंतर तो म्हणाल्यावर ती झोपली.

आजपण तिला उठायला उशीर झाला होता. त्याने स्वतःच पाणी गरम करून अंघोळ केली होती. तिने पटपट आवरण्याचा प्रयत्न केला. निदान त्याला चहा, नाश्ता तर बनवून द्यावा असा तिचा बेत होता. तिने चहा ठेवला होता. तिने त्याला चहा दिला. चहा पिताच त्याने वेगळंच तोंड केलं.

तो म्हणाला, "अगं साखर विसरलीस."

ती म्हणाली, "सॉरी. थांब मी साखर टाकून गरम करून देते."

तो म्हणाला, "जाऊदे. ठीक आहे. मला उशीर होतोय. जातो मी. काळजी घे."

ती म्हणाली, "दोन मिनिट थांब ना. कमीत कमी ब्रेड तर खाऊन जा."

ती ब्रेड ला जाम लावत होती. तो तोपर्यंत निघून गेला होता. तिने बघितलं की त्याने जेवण पण बाहेरून मागवलं होतं. निदान आपण त्याचा टिफिन तरी भरून द्यायला हवा होता, अशी खंत तिच्या मनात होती. ती प्रयत्न तर पुरेपूर करत होती पण नशीब तिची साथ देत नव्हतं. ती नाराज होऊन खाली बसली. गालावर हात ठेऊन स्वतःलाच वाईट समजू लागली. ती चांगली गृहिणी नाही का बनू शकणार कधी? असा विचार तिच्या मनात खेळू लागला.

तिने ठरवलं की आज काहीही झालं तरी स्वयंपाक चांगलाच झाला पाहिजे. तिने डोकं शांत ठेऊन काहीही गडबड न करता स्वयंपाक बनवला. स्वयंपाक चांगला झाल्याची खात्रीही तिने करून घेतली. निदान आता तरी काही वाईट व्हायला नको, अशी ती प्रार्थना करू लागली.

आज त्याने बऱ्यापैकी जेवण केलं. पोळ्यांचा आकार सोडून बाकी सर्व ठीक होतं. तरीपण तिला जाणवलं की तो पोटभर जेवला नव्हता. पण परिस्थिती कालच्या पेक्षा बरी होती, याचं तिला समाधान होतं.

तिने ठरवलं की सकाळी लवकर उठायचं आणि चहा, नाश्ता व स्वयंपाक सगळं नऊ वाजेच्या अगोदर तयार व्हायला हवं. ती लवकरच झोपी गेली. तिला जाग आली होती. तिने मोबाईल मध्ये बघितलं तर चार वाजले होते. तिला वाटलं थोडा वेळ झोपावं. ती थोडा वेळ झोपली व परत उठली. तेव्हा देखील पाचच वाजले होते. ती परत झोपी गेली. आता ती जागी झाली तर सव्वा नऊ वाजले होते. तो निघून गेला होता. तिचा चेहरा रडवेला झाला होता. तिला कळलेच नाही की असं कसं झालं? तिला परत तोच प्रश्न सतवू लागला की ती कधीच चांगली गृहिणी बनू शकणार नाही का?

भाग 3 लवकरच

आवडल्यास share नक्की करा तसेच मला ईरा ब्लॉग वर follow नक्की करा.

©Akash Gadhave

🎭 Series Post

View all