स्वयंपाक (भाग 1)

This is a story of a newly married couple. After marriage the husband Rohit realises that Tejshree don't know how to cook food. She expects that he will get angry on her but he doesn't instead he start laughing. He orders delicious food for them. Aft

तेजश्री व रोहितचं नवीनच लग्न झालं होतं. रोहित पुण्यामध्ये कामाला होता. त्यामुळे ते काही दिवसांनी लगेच पुण्यात आले. रोहितने अगोदरच येऊन त्यांच्यासाठी डबल रूम बुक केली होती. सर्व सामानासहित ते पोहोचले. सामान लावण्यात त्यांचा बराच वेळ गेला. रोहितला काही वस्तू खरेदी करायच्या होत्या. तसेच तेजश्रीला पण काही वस्तू हव्या होत्या. तिने त्याच्या हाती लिस्ट दिली. तो वस्तू आणण्यासाठी बाहेर पडला.

तो घरी परतला तेव्हा बराच उशीर झाला होता. त्याला खूप भूक लागली होती. तिलाही लागलीच असणार. सामान लावून दमले होते ना दोघे! ती सोफ्यावर बसून मोबाईल बघत होती. तो किचनमध्ये गेला. त्याने ग्लासमध्ये पाणी घेतलं. त्याला काही स्वयंपाकाचा वास येईना. त्याने चेक केलं. स्वयंपाक बनलेला नव्हता.

मागून तेजश्री येऊन म्हणाली, " दिलं असतं ना मी पाणी!"

तो म्हणाला, "पाण्याचं जाऊदे. पण स्वयंपाक?"

ती जमिनीकडे बघू लागली. तिला वाटलं आता नक्कीच तो ओरडणार तिच्यावर. तिने सगळं ऐकून घेण्याची मानसिकता बनवली होती. तिने डोळे गच्च बंद केले होते. थोडा वेळ किचनमध्ये शांतता होती. तिला पाठीवर त्याचा स्पर्श जाणवला. तिने वर बघितलं. तो हसत होता!

ती केविलवाण्या स्वरात म्हणाली, "हसू नको ना बरं. प्लिज. "

त्याला हसणं आवरेना. थोड्या वेळाने तो शांत झाला.

तो म्हणाला, "थांब. मी काहीतरी घेऊन येतो."

तो येईपर्यंत तिने ताट, ग्लास सगळं रेडी ठेवलं होतं. तो हातामध्ये पार्सल घेऊन आला होता. तिने ते उघडलं. त्यामध्ये पनीर मसाला, पोळ्या, श्रीखंड हे पदार्थ होते. अगदी गरम. त्या पदार्थांचा सुगंध हवेत दरवळू लागला. त्यांच्या सोबत कापलेला कांदा, लिंबू पण होतं. ती चमचा आणण्यासाठी किचनमध्ये गेली. तोपर्यंत तो वाढून घेत होता.

ती म्हणाली, "वाढते ना मी. थांब."

तो म्हणाला, "हो. तेवढ्याने काय होतं."

ती म्हणाली, "नाही. थांब तू."

दोघांना खूप भूक लागलेली होती. त्यांनी पोटभर जेवण केलं. नंतर तिने सगळं आवरलं. घरी दोघांचं बोलणं झालं. नंतर ते झोपले. पण तेजश्रीला बराच वेळ झोपच आली नाही. होतं असं कधीकधी.

उशिरा झोपल्यामुळे तिला उठायला पण उशीर झाला. उठल्यावर तिने बघितलं रोहितची अंघोळ पण झाली होती. ती घाईघाईत उठली.

तिने विचारलं, "उठवलं का नाही मला?"

तो म्हणाला, "अगं तू खूप गाढ झोपेत होतीस."

तिने घाईघाईत अंघोळ केली. तिचं आवरणं होईपर्यंत त्याने दोन कप चहा ठेवला पण होता. तिला स्वतः बद्दल वाईट वाटू लागलं. तो मोबाईलवर बोलत होता. थोड्या वेळाने तिने गॅस बंद केला. चहा कपामध्ये ओतला. तिने दोन्ही कप ट्रे मध्ये ठेवले. तो ट्रे तिने टेबलावर ठेवला व ती त्याच्या येण्याची वाट बघू लागली. त्याचं बोलणं संपवून तो तिच्यासमोर येऊन बसला. तिने कप त्याच्या हातात दिला व दुसरा कप स्वतः घेतला. तिने चहाचा घोट पिला. किती छान चहा बनवला होता त्याने! ती अवाक झाली होती. त्यात अद्रक, इलायची तर होतीच पण साखर आणि पत्तीही अगदी प्रमाणात होती.

तो म्हणाला, "आवडला की नाही चहा?"

ती म्हणाली, "खूप छान आहे. कुठून शिकलास?"

तो म्हणाला,"अगं काही नाही. त्यात काय शिकायसारखं. आईने शिकविला होता. "

तिला ते दिवस आठवले जेव्हा तिची आई तिला स्वयंपाक शिकण्याचा आग्रह करत होती.

तिची आई म्हणायची, "माझं बोलणं नसेल ऐकायचं तर नको ऐकू पण जेव्हा नवरा ओरडेल ना तेव्हा आठवेल तुला माझं बोलणं."

तिची काही चूक नव्हती. ती शिक्षणासाठी बाहेर राहायची. ती खूप कमी वेळ घरी राहिलेली. खूप कमी सुट्ट्या असायच्या आणि त्यामध्येही स्वयंपाक शिकणं तिला मान्य नव्हतं. तिला आता मात्र वाईट वाटू लागलं होतं. तिने ठरवलं की आता काहीही करून स्वयंपाक शिकायचाच. तिने तिच्या आईची, सासूबाईंची व युट्युबची देखील मदत घेण्याचं ठरवलं. ती स्वयंपाक अध्ययणासाठी सज्ज झाली.

तिने वही, पेन घेतला. आईला कॉल लावला. सगळी सामग्री व कृती लिहून घेतली. तसेच नेमकेपणासाठी युट्युब वर व्हिडीओ पण बघितला. आता वेळ होती प्रात्यक्षिकाची. तिने मन लावून बटाट्याची भाजी आणि पोळी बनविली. सकाळी बाहेरून जेवण मागवलं होतं. रात्री मागवावं लागणार नाही असं वाटत होतं. तिने स्वयंपाक तयार केलेला होता. ती त्याची वाट बघू लागली.

क्रमश

©Akash Gadhave 

🎭 Series Post

View all