स्वयंभू   १६   ( अंतिम )

----

स्वयंभू   १६   ( अंतिम )

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

अँड. स्वरा जज साहेबांकडे पाहत म्हणते," मिलॉर्ड, डॉ. अमर जाधव यांनी हे सर्व प्लॅन करून केलं आहे. सी. सी. टी. व्ही फुटेज चेक केलं तेव्हा लक्षात आलं की प्रशांतच्या मृत्यूच्या सकाळचं अवघ्या २० मिनिटांचा सी. सी. टी. व्ही फुटेज डिलीट केलं गेलेलं आहे. सकाळी ८ : १५ ते ८ : ३५ पर्यंतच फुटेज नाही मिळालं. कारण काय तर टेक्निकल प्रॉब्लेम. यांचा टेक्निकल प्रॉब्लेम फक्त २० मिनिटांचा होता. तो ही बरोबर प्रशांतचा मृत्यू झाला त्याचं दिवशी. असो पण म्हणतात ना सत्य सूर्यप्रकाशासारखं असतं लपून राहत नाही. 

डॉ. अमर यांनी प्रशांतला सकाळी ८ : १५ ते ८ : ३५ च्या दरम्यान ते औषध दिलं. त्यासाठी त्यांनी मुद्द्दाम आदल्या दिवशी डॉ. मंदार यांची ड्युटी रात्रीची ठेवली होती. जेणे करून दुसऱ्या दिवशी त्यांनी  ' झेड प्लस ' प्रशांतला दिल्यानंतर डॉ. मंदार राउंडला आले नाही पाहिजेत. नाहीतर कदाचित प्रशांतच्या तब्बेतीत झालेले बदल डॉ. मंदार यांच्या लक्षात आले असते.  एवढंच नाही तर मृताचा पोस्टमार्टम होऊ नये यासाठी सुद्धा डॉ. अमर यांनीच प्रयत्न केले आहेत. " 

डॉ. अमर , " काय पुरावा आहे ? मी ते औषध प्रशांतला दिलं किंवा मी प्रशांतचा पोस्टमार्टम होऊ दिला नाही याला काय पुरावा आहे ?" 

अँड. स्वरा," आहे, डॉ. अमर सर्व साक्षी पुरावे आहेत माझ्याकडे. फक्त काही वेळ थांबा. " 

अँड स्वरा जज साहेबांकडे चेहरा करून म्हणते," मिलॉर्ड , मला पुन्हा एकदा श्री. राजन यांना विटनेस बोच मध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात यावी. 

कोर्टात श्री. राजन यांच्या नावाचा पुकारा होतो. श्री राजन येऊन विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात. गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर स्वरा त्यांना  प्रश्न विचारायला सुरुवात करते.  

अँड. स्वरा," राजनजी, तुमचा तुमच्या मुलाचा पोस्टमार्टमला विरोध का होता ?" 

श्री. राजन," कारण मला माझ्या मुलाच्या शरीराचे अजून हाल करायचे नव्हते." 

अँड. स्वरा," बरं, मला सांगा तुम्ही नकार देण्याआधी कोणी तुमच्याजवळ बोललं होतं का ? मुलाचं पोस्टमार्टम करून का त्याच्या शरीराचे अजून हाल करताय ? तुमच्या घरचे सोडून हा ...." 

श्री. राजन," हो, माझ्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल मधले डॉक्टर्स पोस्टमार्टम करण्याविषयी बोलते होते. मी माझ्या दुःखात होतो. थोडयावेळाने तिथे काम करणारा एक वॉर्ड बॉय माझ्याजवळ येऊन म्हणाला की,' एकतर डॉक्टरांच्याच चुकीमुळे तुमचा मुलगा गेला, त्यात त्याचा पोस्टमार्टम करून अजून त्याच्या शरीराचे हाल करणार हे डॉक्टर. ' आणि त्यावेळी माझ्या मनात माझ्या मुलाचं पोस्टमार्टम न करण्याचं आलं. त्यात त्यांच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाचा मृत्यू झाला ते का खरे रिपोर्ट्स बनवतील ?" म्हणून मी पोस्टमार्टमला नकार दिला ." 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, एक गोष्ट तिथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे श्री. राजन यांच्या मनात पोस्टमार्टम न करण्याविषयी भरवण्यात आलं. कारण पोस्टमार्टमसाठी " मातृत्व " मध्ये डॉक्टर्स बाहेरून बोलवावे लागतात किंवा बॉडी बाहेर पोस्टमार्टमसाठी पाठवावी लागते. तिथे खरे रिपोर्ट समोर येण्याची शक्यता असल्यामुळे श्री. राजन यांच्या मनात चुकीचं भरवून पोस्टमार्टमच होऊ न देण्याचा प्लॅन होता. " 

अँड. पवार," अँड. स्वरा , तो वॉर्ड बॉय सहज म्हणूनही बोलला असेल. ती गोष्ट सुद्धा तुम्ही डॉ. अमर यांच्याशी का जोडताय ?

अँड. स्वरा एक कटाक्ष टाकत म्हणतात," अँड. पवार सर, तो वॉर्ड बॉय पोलिसांसमोर पोपटासारखं सर्व बोलला आहे. " 

स्वराचं बोलणं ऐकून अँड. पवार आणि डॉ. अमर यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. स्वरा वॉर्ड बॉयचा कबुलीजबाब स्वरा पुढे करते. स्वराने एवढ सगळं कधी केलं ? हे प्रतिपक्षाला कळतंच नव्हतं. तरीही अँड. पवार म्हणतात," पोलीस मारून खऱ्याच खोटं आणि खोट्याच खरं करूच शकतात. आणि हे सर्व ग्राह्य धरलं तरीही डॉ. अमर यांनी प्रशांतला औषध दिल आहे हे सिद्ध होतं नाही. 

अँड. स्वरा," होणार, ते सुद्धा नक्की सिद्ध होणार. " 

अँड. स्वराचा आत्मविश्वास पाहून सर्वांना टेन्शन आलं होतं. स्वरा पुढे होऊन म्हणते," मिलॉर्ड, मी एक पुरावा आणि एक साक्ष या कोर्टासमोर ठेवते , ज्यामुळे ' प्रशांतचा '  मृत्यू हा डॉ. मंदारच्या हलगर्जीपणामुळे नव्हे तर डॉ. अमर यांच्या औषधाच्या परीक्षणामुळे झाला आहे, हे लगेच स्पष्ट होईल. " 

स्वरा काही कागदपत्र पुढे करते आणि बोलायला सुरुवात करते," मिलॉर्ड, डॉ. अमर यांनी जेव्हा हे औषध बनवलं, तेव्हा प्राणी परीक्षणासाठी, त्याच्या प्रयोगासाठी त्या औषधाची सविस्तर माहिती ही संस्थेला द्यावी लागते.  त्यावेळी डॉ. अमर यांनी संस्थेला दिलेली कागदपत्र म्हणजेच औषध कसं बनवलं ? त्यात काय काय इन्ग्रेडियंस आहेत ? या सर्वांची माहिती आहे. खरंतर ही माहिती संस्था देत नाही पण एवढी मोठी केस उभी आहे. एका आयुष्याचा आणि त्याच्या डॉक्टरी करिअरचा प्रश्न पाहता त्यांनी आम्हाला लीगल प्रोसिजर पूर्ण करून डॉक्टर अमर यांच्या औषध ' झेड प्लस ' ची फाईल दिली. 

एक्सपर्ट डॉक्टर्सच्या निगराणी खाली ' प्रशांतच्या ' शरीरात सापडलेलं औषध आणि डॉ. अमर यांच्या औषधाची तुलना करता हे तेच औषध असल्याचे लक्षात आले. हा झाला एक पुरावा आणि आता मी कोर्टात एक साक्षीदार उभा करणार आहे, ज्याने स्वतःच्या डोळ्यांनी डॉ. अमर यांना ' प्रशांतला' औषध देताना पाहिलं आहे." आता मात्र स्वराचं बोलणं ऐकून डॉ. अमर यांची गाळण उडाली होती.  

अँड. स्वरा," मिलॉर्ड, मला कु. संजीव ह्याला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात यावी." 

जज," परवानगी आहे. " 

कोर्टात कु. संजीव ह्याच्या नावाचा पुकारा होतो. कु. संजीव विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा  राहतो  आणि सांगितल्याप्रमाणे  गीतेवर हात ठेवून शपथ घेतो.  स्वरा त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करते.  

अँड. स्वरा," तर संजीव, सर्वात आधी कोर्टाला तुझा परिचय दे." 

सोनल," माझं नाव, संजीव काळे आहे. माझं वय १५ वर्षे आहे. " 

अँड. स्वरा," संजीव , आता कोर्टासमोर तू जे पाहिलास, म्हणजे ज्या दिवशी ' प्रशांतचा' मृत्यू झाला त्या दिवशी जे काही पाहिलंस ते न घाबरता सांग." 

संजीव," प्रशांत ऍडमिट झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. माझा ताप उतरत नव्हता म्हणून मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं. प्रशांत आणि मी एकाच वयाचे असल्यामुळे आमची मैत्री झाली. प्रशांतचा एक बेड सोडून माझा बेड होता. आमच्या छान गप्पा व्हायच्या. त्याला कधी कधी जास्त त्रास व्हायचा. त्या दिवशी डॉ. मंदार सकाळी लवकर येऊन गेले राउंडला. त्यामुळे मला पुन्हा झोप लागली नाही. त्यानंतर साफसफाईसाठी पेशंट सोडून इतर सर्वांना बाहेर जावं लागतं. मी प्रशांतकडे पाठ करून झोपलो होतो. समोर भिंतीवर आरसा आहे त्यातून मात्र मागेच सर्व स्पष्ट दिसत. मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात डॉ. अमर ' प्रशांत' जवळ आले. मी फिरून मागे पाहिलं नाही. आळस आल्यामुळे तसाच पडून होतो आणि आरशातून सर्व पाहत होतो. डॉ. अमर यांनी आधी ' प्रशांतला तपासलं आणि नंतर एक औषध काढून त्याला लगेच घ्यायला सांगितलं. डॉक्टर आहेत ते म्हणल्यावर त्याने सुद्धा लगेच ते औषध घेतलं. डॉ. अमर यांनी प्रशांतला दिलेल्या औषधाची बाटली लगेच स्वतःच्या खिश्यात ठेवली आणि प्रशांतला ' आता आराम कर' असं म्हणून ते गेले. त्यानंतर प्रशांत शांत झोपला. 

२ तासांनी प्रशांत गंभीर झाला. डॉक्टरांची धावाधाव सुरु झाली पण लगेच काही वेळात प्रशांतचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. " 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, पोलिसांनी त्यांच्या प्रयत्नात कोणतीही कसूर ठेवली नाही. सी. सी. टी. व्ही फुटेज मिळालं नाही म्हणून पोलिसांनी त्यावेळी प्रशांतसोबत त्या वॉर्डमध्ये असलेल्या मुलांचे जबाब घ्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच  संजीव काळे यांची साक्ष मिळाली आहे." 

अँड. स्वरा," डॉ. अमर , तुम्हांला यानंतर ही काही बोलायचं आहे का ? " 

डॉ. अमर," हो, मी मान्य करतो की प्रशांतचा मृत्यू माझ्या चुकीमुळे झाला आहे ?" 

अँड. स्वरा," चूक ....... ?" 

डॉ. अमर," मी माझ्या औषधावर खूप मेहनत घेतली होती. शिवाय मला माझ्या औषधावर पूर्ण विश्वास होता. सर्व परवानगी , प्रोसिजर यात अजून किती वेळ जाईल माहित नव्हतं, त्यामुळे जेव्हा मला प्रशांत बद्दल कळलं तेव्हाच मी ठरवलं की मी बनवलेलं औषध देऊन प्रशांतला बरं करायचं आणि प्रशांत बरा झाल्यावर सर्वांचा फोकस आपोआप माझ्या औषधावर आला असता पण सर्व उलट झालं.

मी कोणाला सांगितलं असतं तर कदाचित सर्वानी मला विरोधच केला असता म्हणून मी कोणालाही न सांगता प्लॅन केला. डॉ. मंदारला नाईट ड्युटी दिली, जेणे करून ते लवकर घरी जातील. सकाळी साफसफाईच्या वेळी डॉक्टर बऱ्याचदा राऊंडला येतात त्यामुळे मला रिस्क घ्यायची नव्हती. डॉ. मंदार लवकर घरी गेले आणि साफसफाईची वेळ म्हणून मी वॉर्डमध्ये प्रवेश केला. कोणत्याना ना कोणत्या डॉक्टरांचा राउंड नेहमी असल्यामुळे सहसा कोणी लक्ष देत नाही आणि बऱ्याच वेळ ती यंग मुले लवकर उठतही नाहीत म्हणून मी तीच वेळ निवडली.    

प्रशांत बरा होईल अशी मला खात्री होती पण नक्की माझ्या औषधामध्ये काय चुकलं ते कळलं नाही त्यामुळे प्रशांतचा जीव गेला. पोस्टमार्टम केल्यावर त्याच्या मृत्यूचं कारण कळलं असतं आणि पूर्वी मी डॉ. मंदारशी या विषयी बोललो असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं असतं की प्रशांतचा मृत्यू माझ्या औषधामुळेच झाला आहे. प्रशांतची ट्रीटमेंट डॉ. मंदार करत असल्यामुळे मुलाच्या वडिलांनी डॉ. मंदार यांच्यावर केस दाखल केली. मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. मला कोणी पाहिलं नाही हा माझा समज होता. त्यामुळे मी सी. सी. टी. व्ही फुटेज डिलिट केलं. अँड. पवार यांना पैसे दिले की केस दुसरीकडे वळता कामा नये. 

पोस्टमार्टम करणं भाग होतं कारण कोर्टाचा आदेश होता. म्हणून मग मी पोस्टमार्टम करणारे डॉक्टर डॉ. सावंत यांची माहिती काढली. ते विकले जाणार नाहीत याची खात्री पटली म्हणून मग मी त्यांचा असिस्टंट डॉ. जांभकर यांना हाताशी धरून रिपोर्ट्स बदलले. डॉ. मंदार यांच्या जर लक्षात आलं असतं की मी जे औषध बनवत होतो , हे तेच तर नाही ना ? ते त्यांच्या लक्षात यायच्या आधी मला त्यांना मारायचं होतं म्हणून मी मारेकरी पाठवले आणि जनसामन्यमधून हा हल्ला झाला असल्याचे अँड. पवार यांनी सांगितलं. " 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, तर ही होती साठाउत्तराची कहाणी खुद्द डॉ. अमर यांच्या जबानी. डॉ. मंदार हे निर्दोष आहेत आणि त्यांना अडकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सर्व साक्षी- पुरावे कोर्टासमोर आहेत. कोर्ट योग्य तो निर्णय देऊन आरोपाला आळा नक्कीच घालेल. " 

जज," सर्व साक्षी- पुरावे आणि डॉ. अमर यांचा कबुलीजबाब हे सर्व पाहता हे न्यायालय डॉ. मंदार रंगले यांची ' निर्दोष' मुक्तता करत आहे. तसेच डॉ. अमर, अँड. पवार, डॉ. जाभंकर यांच्यावर एफ. आय. आर करून नवीन केस कोर्टात उभी करण्याचे आदेश हे न्यायालय देत आहे." 

निकाल लागताच डॉ. मंदारने सुटकेचा निःश्वास टाकला. कोर्टातून बाहेर पडल्यावर मंदारने स्वरा ताईला घट्ट मिठी मारली. स्वराने त्याचे अश्रू पुसले आणि अनुराधा ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये ते निघाले. 

मंदारच्या सुटकेची बातमी ऐकून अनुराधाला हर्षवायू होतो. बेडवर झोपलेली असली तरी अनुराधाने मंदारला जवळ घेऊन गोंजारलं. तेवढ्यात मागून आवाज येतो," आत्या आम्ही पण कुशीत येऊ का ?" मागे स्वरा आणि सारंग उभे असतात. अनुराधा आपले हात पसरवून दोघांनाही स्वतःकडे बोलावते आणि स्वरा - सारंग अनुच्या मिठीत शिरतात. स्वरा नंतर म्हणते." मंदार मी तुला म्हणाले होते ना , तू टेन्शन घेऊ नकोस. कोणालाही काहीही होणार नाही. कारण माहित आहे ?

" सारंग दादा.... पी. एस. आय. सारंग बिडे.... ! याच्या नावाने भले भले कापतात. त्याच्या घरच्यांवर हल्ला करण्याचा कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. शिवाय दादाने अनु आत्याच्या सेफ्टीसाठी फॉर्मल ड्रेसमध्ये पॊलिस लावले होतेच. आता सर्व ठीक झालं आहे. 

अनुराधा हात जोडत म्हणते," देवा , मोठ्या संकटातून बाहेर काढलास , खरंच तुझे आभार....!" 

सारंग," आत्या फक्त देवाचे आभार नको मानू तर आम्हांला सुद्धा पार्टी दे. कारण तुला ' उत्कृष्ट शेतकरी' पुरस्कार जाहीर झाला आहे. " कृषी विभागाकडून आलेला कागद पुढे करत सारंग म्हणाला आणि सर्वांनी जल्लोष  केला....

इकडे रेवती कृष्णकांतला म्हणते," खरं आहे, सत्य हे ' स्वयंभू' असतं. ते प्रगट होतंच. त्याचमुळे मंदार निर्दोष सुटला आणि एवढ्या वर्षांनी का होईना  अनुराधाला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं."  रेवती आणि कृष्णकांत सुरु असलेला जल्लोष साश्रू नयनांनी पाहत असतात.

समाप्त ...........

🎭 Series Post

View all