स्वयंभू   १५   

---------

स्वयंभू   १५   

@ आरती पाटील - लेखिका 

 सामाजिक कथा- ठाणे विभाग. 

पी. एस. आय. सारंग बिडे पुढे म्हणतात," मिलॉर्ड, या रिपोर्टनुसार प्रशांतचा मृत्यू डॉ. मंदार यांनी दिलेल्या औषधांच्या ओव्हर डोसमुळे नाहीतर दुसऱ्या एका औषधामुळे हृदयावर जोर आल्यामुळे झाला आहे. मात्र त्याच नाव पोस्टमार्ट करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा माहित नाही. डॉ. सावंत यांचे असिस्टंट डॉ. जांभकर यांनी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बदल करून कोर्टासमोर सादर केले आहेत. 

डॉ. मंदारवर २ दिवसांपूर्वी हल्ला झाला. त्याचा तपास केला तेव्हा ३ जणांना आम्ही अटक केली आहे. हल्ला करणाऱ्यांनी मंकी कॅप घातल्या होत्या पण काही अंतर पुढे जाऊन त्यांनी त्या काढल्या आणि आम्ही आसपासचे सी. सी टी. व्ही. चाळल्यावर आम्हांला हल्लेखोरांचे फुटेज सापडले. त्याप्रमाणे त्या अटक केली आहे. डॉक्टर जांभकर यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट बदलणं, डॉ. मंदारवर हल्ला होणं यामुळे डॉ. मंदार यांच्या जीवाला धोका असल्याची संभावना लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या नकळत त्यांच्यावर लक्ष ठेवून सुरक्षा दिली. "

पी. एस. आय. सारंग बिडे पुढे म्हणतात," मिलॉर्ड , पुढे केलेल्या तपासावरून आमच्या लक्षात आलं की प्रशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेली व्यक्ती, डॉ. मंदारवर हल्ला करवणारी व्यक्ती आणि पोस्टमार्टम रिपोर्ट बदलवणारी व्यक्ती एकच आहे आणि ती व्यक्ती म्हणजे " मातृत्व" हॉस्पिटलचे ट्रस्टी श्री. मनोहर जाधव यांचा मुलगा डॉ. अमर जाधव." 

पी. एस. आय. सारंग बिडे यांचं बोलणं ऐकून कोर्टात कुजबुज सुरु होते. त ऐकून प्रतिपक्षाचे वकील अँड. पवार उभे राहतात आणि म्हणतात," पी. एस. आय. सारंग बिडे तुम्हांला कळतंय तुम्ही काय बोलताय ? डॉ. मंदार हे तुमच्या भावासारखे आहेत म्हणून त्यांना वाचवायला तुम्ही कोणावरही आरोप करायला ?" 

पी. एस. आय. सारंग बिडे," अँड. पवार, मी माझी ड्युटी करताना नातं कधीच मध्ये आणत नाही. आधी ड्युटी मग सगळं. मी फक्त माझा जो तपास आहे तो कोर्टात सांगत आहे. तुमच्यासारखं रात्री - अपरात्री स्पिटलचे ट्रस्टी श्री. मनोहर जाधव यांच्या घरी जाऊन पैसे नाही घेत मी. " 

पी. एस. आय. सारंग बिडे यांच्या बोलण्यावर अँड. पवार गडबडतात. नंतर म्हणतात," तुम्ही काय म्हणताय कळतंय का ?" 

पी. एस. आय. सारंग बिडे," यांचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत. देऊ का ?" 

जज," पी. एस. आय. सारंग बिडे तुम्हांला जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. " 

पी. एस. आय. सारंग बिडे," मिलॉर्ड, माझ्याकडे डॉ. अमर , श्री. मनोहर जाधव आणि अँड. पवार यांचे कॉल रेकॉर्डस्  आहेत. यांच्यात वारंवार फोन झाले आहेत. शिवाय अँड. पवार यांच्या बँक खात्यात डॉ. अमर यांनी मोठी रक्कम सुद्धा जमा केली आहे. आम्ही एका वकिलाची सुद्धा कुंडली काढू असं त्यांना वाटलं नाही त्यामुळे ते गाफील राहिले. खरं तर हे श्री. राजन यांचे नाही तर डॉ. अमर यांचे वकील आहेत असं म्हणालात तरी चालेल. ज्यांचं काम आहे की या केस मध्ये डॉ. मंदार यांना अडकवणं. "

अँड. पवार," डॉ. अमर एखाद्याचा मर्डर का करतील ? तेही एका मुलाचा ? काही वैयक्तिक शत्रुता नाही, काही कारण नाही. तरीही तुम्ही त्यांचं नाव या प्रकरणात घेत आहेत." 

अँड. स्वरा," नाही कसं ?  कारण आहे ना ? मिलॉर्ड, प्रसिद्धी, पैसा हे माणसाचं डोकं खराब करतात कधी कधी. डॉ. अमर जाधव हे एक मोठे डॉक्टर आहेत. खूप वर्षांचा अनुभव आहे त्यांना. त्याच बरोबर त्यांना आजारांवर औषध शोधायचाही ध्यास आहे. डॉ. अमर जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी एक औषध तयार केलं होतं ज्याला त्यांनी नाव दिलं होतं ' झेड प्लस ' त्यांच्या अभ्यासानुसार या औषधाने किडनीचा खराब भाग दुरुस्त होऊ शकतो. या औषधाच्या प्राणी परीक्षणासाठी त्यांनी परवानगी काढण्याचे प्रयत्न केले.  या प्रकारच्या गोष्टीसाठी बराच वेळ लागतो पण डॉ. अमर यांना संयम नव्हता. आधी एकदा बोलताना ते डॉ. मंदार यांच्याजवळ ' झेड प्लस ' विषयी बोलले होते. त्यामुळे डॉ. अमर अशाप्रकारचं औषध परीक्षण करणार आहेत हे त्यांना माहित होतं. 

प्रशांत ऍडमिट झाल्यानंतर २ दिवसांच्या टेस्ट्स नंतर त्याच्या किडनीचा २० % भाग खराब असल्याचे डॉ. अमर यांना सुद्धा कळलं. संयम नसलेल्या डॉ. अमर यांनी आपल्या नवीन शोधलेल्या औषधाचा प्रयोग थेट रुग्णावर करायचं ठरवलं. त्या दिवशी डॉ. मंदार सकाळी वेळेच्या आधी राउंड मारून गेले. त्यानंतर अगदी काहीच वेळात डॉ. अमर प्रशांतजवळ गेले. सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान साफसफाईसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर पाठवलं जातं. त्याचं दरम्यान प्रशांतला औषध दिलं गेलं आहे. औषधाचं परीक्षण झालेलं नसल्यामुळे त्याचे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स माहित नव्हते आणि त्याच औषधामुळे प्रशांतचा जीव गेला. " 

अँड. पवार चिडून म्हणतात ," तुमच्याकडे काय पुरावे आहे अँड. स्वरा ?" 

स्वरा," आहेत, सर्व साक्षी - पुरावे आहेत माझ्याकडे . " 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, मला डॉ. अमर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात यावी." 

जज," परवानगी आहे. " 

अँड. पवार ," ते का कोर्टात येतील ? ते ही त्यांचा संबंध नसताना ? मिलॉर्ड त्यासाठी डॉ. अमर यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस द्यावी लागेल. मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाने पुढील तारीख द्यावी आणि पुढील तारखेला डॉ. अमर यांची साक्ष घ्यावी." 

अँड. स्वरा ," पुढील तारीख कशाला ? तेही डॉ. अमर कोर्टात हजर असताना ?" 

अँड. स्वराच्या बोलण्याने पुन्हा कोर्टात कुजबुज सुरु होते. 

अँड. स्वरा," मिलॉर्ड, चौथ्या रांगेत डॉ. अमर बसलेले आहेत. " 

सर्वजण डॉ. अमरकडे पाहू लागतात. डॉ. अमर सुद्धा चाचपतात पण नाव घेतल्यानंतर विटनेस बॉक्स मध्ये येण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही.   

कोर्टात डॉ. अमर जाधव यांच्या नावाचा पुकारा होतो. डॉ. अमर जाधव विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात. गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर स्वरा त्यांना  प्रश्न विचारायला सुरुवात करते.  

अँड. स्वरा," डॉ. अमर जाधव तुम्ही प्रख्यात डॉक्टर आहात. तुम्हांला खूप जण ओळखतात. खूप चांगले डॉक्टर अशी ख्याती आहे तुमची. " 

डॉ. अमर ," थँक्स ."

अँड. स्वरा," बरं मला सांगा , आता मी जे म्हणाले की , तुम्ही एक औषध बनवलं आहे. ते खरं आहे की खोटं ?" 

डॉ. अमर ," खरं आहे. ' झेड प्लस ' नावाचं औषध मी बनवलं आहे." 

अँड. स्वरा," तुम्हांला प्राण्यांवर प्रयोग करण्याची परवानगी मिळाली का ?" 

डॉ. अमर," नाही अजून." 

अँड. स्वरा," मग तरीही तुम्ही ते औषध प्रशांतवर वापरलं ?" 

डॉ. अमर," नाही. मी ते औषध प्रशांतवर वापरलेलं नाहीये. तसा पुरावा सुद्धा तुमच्याकडे नाहीये. शिवाय पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सांगितलेलं औषध आणि मी बनवलेलं औषध एकच आहे का ? हे सुद्धा अजून प्रूफ नाही झालेलं ?" 

अँड. स्वरा," डॉ. अमर जाधव, प्रत्येक गुन्हेगाराला वाटत की आपण केलेला गुन्हा सफाईने केलेला आहे, त्यामुळे आपण पकडलेच जाऊ शकत नाही. " 

क्रमश :  ............

🎭 Series Post

View all