स्वयंभू १०
@ आरती पाटील - लेखिका
सामाजिक कथा- ठाणे विभाग.
दुसऱ्या दिवशी कोर्ट खचाखच भरलं होतं. बातमी पेपरमध्ये आली होती, त्यामुळे अर्थातच सगळ्यांना माहित होतं आणि केसबद्दल उत्सुकता देखील. जज आले आणि सर्वांनी उठून त्यांना अभिवादन केलं. जजसाहेब बसले आणि कारवाई सुरु करण्याचे आदेश दिले.
प्रतिपक्षाचे वकील अँड. पवार उभे राहिले आणि म्हणाले," मिलॉर्ड , केस अगदी साधी आणि सोपी आहे. ' मातृत्व ' हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या माझ्या अशिलाच्या मुलाला चुकीची ट्रेंटमेन्ट दिली गेली आणि त्यामुळे त्याचा जीव गेला. माझ्या अशिलाच्या मुलाचं नाव " प्रशांत " होतं , त्याची ट्रेंटमेन्ट डॉ. मंदार करत होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्याचा जीव गेला. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे की , आरोपीचा डॉक्टरकीचा परवाना रद्द करावा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी."
स्वरा," मिलॉर्ड , माझे मित्र अँड. पवारांना कदाचित दिव्यदृष्टी लाभली आहे. " तिच्या या बोलण्यावर कोर्टात हशा पिकतो.
" ऑर्डर, ऑर्डर....."
स्वरा पुढे बोलते," मिलॉर्ड, केस आता सुरु झाली आहे. साक्षी , पुरावे सर्व झाल्याशिवाय माझ्या अशिलाला माझे मित्र शिक्षा नाही देऊ शकत. जर तो दोषी ठरला तर ती तुम्ही देणार ना ?"
जज," अँड. पवार तुमच्याकडे काही साक्षी - पुरावे असतील तर ते कोर्टासमोर सादर करा."
अँड. पवार," मिलॉर्ड, मी माझ्या अशिलाला म्हणजेच मृताचे वडील श्री. राजन मोहिले यांना विटनेस बॉक्समध्ये बोलण्याची अनुमती मागतो. "
जज," अनुमती आहे."
कोर्टात श्री. राजन मोहिले यांच्या नावाचा पुकारा होतो. श्री. राजन विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात.
अँड. पवार ," श्री. राजनजी तुम्ही कोर्टाला सांगा नक्की काय -काय घडलं ."
श्री राजन ," माझ्या मुलाच्या म्हणजेच " प्रशांतच्या " पोटात दुखत होतं, म्हणून आम्ही त्याला " मातृत्व " हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. ४ दिवस टेस्ट्स, सोनोग्राफी वैगेरे केली. त्यात त्याच्या किडनीला इन्फेकशन असल्याचे सांगितलं होतं आम्हांला. त्यावर ट्रेंटमेन्ट सुरु होती. प्रशांतची ट्रेंटमेन्ट डॉ. मंदार करत होते आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळेच माझ्या मुलाचा जीव गेला. "
अँड. पवार," तुम्ही आता ऐकलं त्याप्रमाणे मिलॉर्ड , मृताची ट्रेंटमेन्ट डॉ. मंदार करत होते आणि त्यांच्याच निष्काळजीपणामुळे माझ्या अशिलाच्या मुलाचा जीव गेला आहे. "
स्वरा," मिलॉर्ड , मला श्री. राजनजी यांना काही प्रश्न विचारण्याची अनुमती द्यावी."
जज," अनुमती आहे."
स्वरा," श्री. राजनजी, डॉ. मंदार यांच्या निष्काळजीपणामुळे प्रशांतचा जीव गेला असं तुमचं म्हणणं आहे. मला सांगा, डॉ. मंदार तुमच्या मुलाला तपासायला कधी यायचे ? "
श्री. राजन," दिवसातून एकदा ते राउंडला यायचे आणि अधे- मध्ये काही वाटलं तर नर्स त्यांना बोलावायच्या. "
स्वरा," अच्छा. म्हणजे तुमच्या मुलाची ट्रेंटमेन्ट फक्त आणि फक्त डॉ. मंदार करत होते तर ?" कसं आहे ना , डॉ. मंदार जुनिअर डॉक्टर आहेत. एम. बी. बी. एस. झाल्यावर प्रॅक्टिस करत आहेत, ते एम. एस. किंवा एम. डी. नाहीत , त्यामुळे कोणत्याही रुग्णाला ते एकटे ट्रेंट करू शकत नाहीत. त्यांच्यावर सिनियर डॉक्टर हवेतच. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर फक्त डॉ. मंदार तुमच्या मुलाची ट्रेंटमेन्ट करत असतील तर यात हॉस्पिटलचा निष्काळजीपणा सुद्धा आहे. बरोबर ना ?"
श्री राजन ," नाही मॅडम, सिनिअर डॉक्टर होते. ऍडमिट केलं तेव्हा ते आले होते. त्यानंतर आले नाहीत."
स्वरा," म्हणजे तुमच्या मुलाची ट्रेंटमेन्ट फक्त डॉ. मंदार करत नव्हते. बरोबर ?"
श्री. राजन ," बरोबर. "
स्वरा," मग तुम्ही फक्त डॉ. मंदार विरोधात तक्रार का केलीत ? "
श्री. राजन ," कारण तेच ट्रेंटमेन्ट करत होते. "
स्वरा," पण आता तुम्ही म्हणालात ना की , सिनिअर डॉक्टर पण होते. शिवाय अश्यावेळी हॉस्पिटलवर केस केली जाते, कुण्या एका व्यक्तीवर नाही. त्यावर चौकशी होते आणि मग दोषी असलेल्यांना शिक्षा होते. "
श्री राजन थोडे गडबडतात. स्वरा पुढे म्हणाली," मिलॉर्ड, आता श्री. राजन यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रेंटमेन्ट फक्त डॉ. मंदार करत नव्हते, शिवाय अश्यावेळी केस हॉस्पिटलवर होते, अजूनही पूर्ण चौकशी झालेली नाही. मृताच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टम सुद्धा करू दिलं नाही. त्यामुळे पुढील चौकशी होईपर्यंत माझ्या अशीलाला जामीन ( बेल ) मंजूर करण्यात यावा."
स्वराने दिलेले सर्व तर्क बरोबर असल्यामुळे कोर्ट डॉ. मंदारची जामीन मंजूर करतं. शिवाय मृताच्या पोस्टमार्टमचे आदेश दिले जातात. अनुराधाचा जीव भांडयात पडतो. कोर्ट संपल्यावर अनुराधा मंदारला कडकडून मिठी मारते. स्वरा सर्वांना घरी जायला सांगते आणि स्वतः तिच्या ऑफिसला जाते.
सर्वजण मंदारसोबत घरी येतात. मंदारला रेवती गरम जेवण बनवून खाऊ घालते. मंदार नेहमीप्रमाणे नसतो. अगदी शांत झाला होता तो. सर्वजण त्याच्या कलाने घेण्याचा प्रयत्न करत होते. संध्याकाळी स्वरा घरी आली आणि मंदारला म्हणाली, " मंदार जेवून माझ्या स्टडीमध्ये ये, केसविषयी सविस्तर बोलायचं आहे. " मंदारने फक्त होकारार्थी मान डोलावली. मंदार एका दडपणाखाली असल्याचे सतत जाणवत होतं.
जेवण झाल्यावर मंदार स्वराच्या स्टडीमध्ये आला. स्वरा तिथे काही कागदपत्रांवर काम करत होती. मंदारला पाहून स्वरा म्हणाली," ये ना मंदार. बस. " मंदार येऊन स्वराच्या समोर बसतो. स्वरा पुढे म्हणते," मंदार , तू माझा छोटा भाऊ आहेस. तू कसा आहेस मला चांगलं माहित आहे पण आपण एखादया क्षेत्रात काम करतो तर तिथे कमी - जास्त होतं. आता मी तुझी वकील सुद्धा आहे. तेव्हा कोणताही आडपडदा न ठेवता. कोणतंही आणि कुणाचंही दडपण न घेता मला सर्व सुरुवातीपासून आणि खरं- खरं सांग. तू खरं सांगितलंस तरच मी तुझी मदत करू शकेन. अनु आत्याने तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली आहेत, त्यासाठी खूप कष्ट सुद्धा घेतले आहेत. त्यामुळे जे आहे ते सांग. तू निर्दोष आहेस तर तुला काहीही झालं तरी शिक्षा होऊ देणार नाही मी.
मंदार स्वराच्या बोलण्याने बराच शांत होतो आणि बोलायला सुरुवात करतो. स्वरा मंदार सांगत असताना एक - एक पॉईंट लिहून घेत होती. स्वरा मंदारचं बोलणं ऐकून मध्ये- मध्ये गंभीर होतं होती. मंदारचं बोलणं झाल्यावर स्वराने त्याला जाऊन ' निवांत' झोपायला सांगितलं. मंदार गेल्यावर स्वराने २ - ३ फोन लावले आणि आपल्या यंत्रणेला नवीन कामाला लावलं. आता तिला कोर्टात मंदारला ढाल व्हायचं होतं आणि समोरच्यावर वार करायला तलवारही तयार ठेवायची होती.
क्रमश : ......................
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा