Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

स्वावलंबी मूर्ती

Read Later
स्वावलंबी मूर्ती


कवितेचे नाव:- स्वावलंबी मूर्ती
कवितेचा विषय:- मीच माझा शिल्पकार
जिल्हास्तरीय कविता स्पर्धा फेरी २

निर्णयाचे मोजमाप करताना परिस्थितीला सांभाळून घेतले..
इतरांवर विश्वास ठेऊन स्वतःला कठपुतली झालेले पाहिले..

संकटाच्या काळरात्री सर्वस्व पणाला लावून घेतले..
दुःखद घटिका बाजूला करून स्वतःला सावरलेले पाहिले..

जगत असताना अर्ध्या जीवनात तणाव ओढवून घेतले..
स्व अस्तित्वाचा शोध घेऊन मी स्वतः ला उमगलेले पाहिले..

खोल अंतकरणात भावनांच्या उद्रेकाला साठवून घेतले..
मनातले ओठी येऊन बिनधास्त मोकळी झालेले पाहिले..

भीतीच्या सावटाखाली गतकाळी प्रवाहात वाहवून घेतले..
स्वावलंबी मूर्ती साकारून मीच माझा शिल्पकार घडलेले पाहिले..

जिल्हा पालघर
©®नमिता धिरज तांडेल..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Namita Dhiraj Tandel

Accountant

Writing Poem, Story, Quote

//