स्वतःसाठी जगा भाग 3 अंतिम

स्वतः साठी वेळ काढायला हवा
स्वतः साठी जगा भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.....

सतीश घरी आला टूर हुन. रुटीन सुरू झाल. नीताची अस्वस्थता वाढत होती. कोणाला घरी यायला थोडा जरी उशिरा झाला की ती घाबरून जायची. कोणी जोरात जरी बोलाल तरी तिची धड धड वाढत होती. थोड जरी काम केल तरी दमायला व्हायच. या बाबत तिने सतीशला सांगितल...

"तू काळजी करू नकोस, मी डॉक्टरची अपाॅइंटमेंट घेतो." सतीशला काळजी वाटत होती. ते दवाखान्यात पोहोचले.

"आजकाल मी फार अस्वस्थ होते डॉक्टर. सगळ असून काही तरी कमी आहे अस वाटत. सगळे व्यवस्थित वागतात. तरी मनात एक अनामिक भीती सदोदित असते. काही चूक तर नाही ना होणार. सकाळी लवकर आवरेल का? सगळ काम झालय का? अस टेंशन असत. प्रत्यक्षात कोणी काही बोलत नाही .... तरी उशीर झाला उठायला की वाईट वाटत ? मुलांची खूप काळजी वाटते. ते मोठे होत आहेत. पुढच्या शिक्षणासाठी होस्टेलला जातील. तिकडे करमेल ना. त्यांना त्रास तर होणार नाही ना. असे अनेक प्रश्न मला शांतता मिळू देत नाहीत. मुलं माझ्या पासून दूर जातील अस वाटत. काय झालाय मला? "

" काहीही झाल नाही. तुम्ही व्यवस्थित आहात. हे कॉमन सिप्टम्स आहेत. हार्मोनियम ईम्बॅलन्स मुळे अस होत. आता एक करायचा अजिबात काळजी करायची नाही स्वतःला वेळ द्यायला हवा. आपण ही एक महत्त्वाची व्यक्ति आहोत हे लक्षात ठेवायच. मुलांच म्हणाल तर एका वेळे नंतर ते आयुष्यात पुढे जातीलच. आपल्या सोबत कायम रहाणार नाहीत. अॅसेप्ट करा पुढे चला. मुल शिकले तर आपल्याला आनंद होणार आहे. घरी बसलेले काही न करणारे मुल कोणाला आवडतात. "

" बरोबर आहे डॉक्टर."

"तुम्ही स्वतःला वेळ द्या. वॉक सुरू करा. मित्र मैत्रिणींना भेटा. एखादा छंद असेल तर तो जोपासा, टीव्ही वर आवडता सिनेमा बघा, प्रोग्रॅम बघा, मोकळा हसा, कामासाठी मदतनीस हवी असेल तर ती घ्या, स्वतःला वेळ द्या, आनंदी रहा, तुम्ही आनंदी तर घर आनंदी. "

नीता सतीश घरी आले. मुल काळजीत होते. " काय झालं आई तुला?"

" एकदम ठीक आहे मी काळजी सारख काही नाही. "

तिने विचार केला आपली तब्येत ठीक करण आपल्या हातात आहे. आता अस दुर्लक्ष करायचं नाही. घरचे काळजी करतात. हळू हळू तिने थोडा बदल केला.

आता नीताचा मस्त दिनक्रम सुरू होता. ती स्वतः कडे लक्ष देते होती. लहान मुलांचे ड्रॉइंग पेंटिंगचे क्लासेस ही घेत होती. संध्याकाळी मस्त फिरून येत होती. घरचे खुश होते.

काय होत ना आपण स्वतः साठी वेळच काढत नाही. घरच्यांसाठी काहीही करायला सांगा आपण आनंदाने करतो. पण स्वतःला गृहीत धरतो.

घरच्यांना हवा तो पदार्थ करुन देतो. स्वतः साठी असेल ते खावून घेतो. आराम नाही की वेळेवर गोळ्या औषध घेत नाही. काहीही झालं की वाटत जरा झोपून बघु. होईल ठीक. पण हे चांगल नाही. स्वता कडे लक्ष द्यायला हवं.

आपण एवढे अडकतो संसारात. आपल्या कामात मुलांमध्ये की आपल्याला काहीही सुचत नाही. घरचे सांगत नाही अस आपल्याला की आमचंच काम कर... आपणच स्वतःहून अति काळजी करतो. आणि इमोशनली अडकतो. पण हे पाश कमी करायला हवे. तरच त्रास कमी होईल .

विचार करून बघा.

🎭 Series Post

View all