स्वतःसाठी जगा भाग 1

स्वतः साठी वेळ काढायला हवा.
स्वतः साठी जगा भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.....

मैत्रिणी सोबत बाजारात गेलेल्या नीताला तिथेच चार वाजले. मुल घरी येतील दहा मिनिटात. काय करू? ती खूप गोंधळून गेली होती. रिक्षा... रिक्षा... एक ही रिक्षा थांबायला तयार नव्हती.

तिने सतीशला फोन लावला. "अहो मी मार्केट मधे आहे. रिक्षा मिळत नाही. मुल शाळेतून घरी आले असतील. काय करू मला काळजी वाटते आहे."

"चावी आहे ना शेजारी?"

हो.

"मग कसल टेंशन घेते. बसतील ते आत. मुल मोठे आहेत. एवढी घाबरू नको. आरामात घरी जा."

ती पाच वाजता घरी आली. प्रिया, सौरभ सँडविच खात होते.

"सॉरी मुलांनो रिक्षा मिळत नव्हती. धावपळ झाली माझी. तुम्ही आले. मी घरी नाही. भूक लागली असेल. कोणी केल सँडविच?"

" आम्ही दोघांनी मिळून केल. आई इट्स ओके एवढ काय बस तू. हे घे खा. " मुल बोलले.

" अरे वाह किती छान झाल आहे सँडविच. भाज्या कोणी कापल्या?"

मी.. सौरभ सांगत होता.

" लागल नाही ना हाताला. "

नाही. दोघ मुल तिला हसत होते. "आई तू आम्हाला किती लहान समजते. "

नीता एक साधी भोळी गृहिणी होती. स्वभावाने एकदम चांगली. आपल घर मुल नवरा हेच तीच जग. त्यांच्या साठी काहीही करायला नेहमी तयार असायची ती. आईला सांगितल आणि झाल काम हे समीकरण जणू ठरलेल होत. कामाला नेहमी तत्पर होती.

ती आवरून स्वयंपाकाला लागली. सतीश आले. जेवण झाल.

"आई मला उद्या लवकरच उठव, माझी एक्झाम आहे तर सकाळी उठून वाचणार आहे मी." प्रियाने सांगितल.

ठीक आहे नीताने अलार्म लावला. प्रियाला साडे पाचला उठवायच म्हणजे मी पाचला उठते.

"काहीही काय आई? तू कशाला अर्धा तास आधी उठते. दे तो अलार्म इकडे. मी उठते बेल झाली की. तू आराम कर. " प्रिया तिच्या रूम मधे निघून गेली.

तरी निताने मोबाईल मधे अलार्म लावला. उशीर नको व्हायला. ती झोपली.

सकाळी घड्याळाचा अलार्म वाजला तशी ती खडबडून जागी झाली.

"काय झालं ग झोप जरा वेळ, तू एवढी का दचकते अलार्म झाला की?" सतिश काळजी करत होते.

" नाही उठाव लागेल, खूप काम पडलय."

ती उठली. लेकीसाठी चहा ठेवला. तिला आवडत म्हणून खारी काढून ठेवली. हळूच जावुन बघितला साडे पाच होत आले होते. प्रिया उठली.

"आई कशाला करते अस. थँक्स चहा बद्दल. " तिने एकदम आईला मिठी मारली.

"या साठी. " नीता खुश होवुन रूम मध्ये गेली.

प्रियाची दहावीची प्रॅक्टीकल एक्झाम होती आज.

"झाल का अटोप लवकर प्रिया. घेतल का सगळ? देवाच्या पाया पड. प्रश्न नीट वाच." नीता काळजी करत होती.

" आई प्रॅक्टीकल एक्झाम आहे. आणी प्लीज चिल. एवढ्या लवकर जावून करू काय? निघते अर्ध्या तासात."

तरी नीताला थरथर होत होती. परीक्षा मुलीची हीच टेंशन घेत होती. स्वतः च्या परीक्षेच्या वेळी एवढ टेंशन आल नव्हत. काय होतय आता अस.


🎭 Series Post

View all