Login

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

सासू आणि सून यांचे नाते....

शुभम आणि स्वरा यांचा प्रेम विवाह... तिच्या माहेरी अगदी चौकटीत राहणारे होते...बाईनी असे वागाव आणि पुरूषानी असे... लहान असल्यापासून दडपणात वाढलेली.... कॉलेजला असताना शुभमच्या प्रेमात पडली... पण व्यक्त होत नव्हती... शुभमला ती आवडत होतीच...पण तिच्या घरची परिस्थिती देखील त्याला माहिती होती....त्याच्या घरी अगदी मोकळे वातावरण होते...त्यामुळे त्यांनी घरी आधीच सांगून ठेवले होते...

योगायोगाने जात एक होती...आणि तिच्या मामांशी ओळख निघाली... मग् यांनीं थोडी सेटिंग लावून लग्न ठरले... लहानपणापासुन दडपणात वाढलेली ती सासर हा शब्द ऐकून अजून घाबरून जात होती... सासू-सून यांचे नाते फक्त तिने आई आणि आजी यांचे अगदी जवळून बघीतले होते... खुप् घाबरली होती... लग्न जवळ आले तसा हिला ताप आला.. टेन्शन घेतले तीने.. बाबांना तर कधी प्रेमाने बोलायचे नाहीत.. त्यांना त्यांची इज्जत, घराणे या पुढे काहीच दिसत नव्हते...

शुभम कडून समजलं आणि होणार्या सासूबाईंचा फोन आला... त्यांच्या शी बोलुन तिला खूप बरे वाटले... थोडी भीती कमी झाली...

लग्न घटीका आली...सर्व काही सुखरूप पार पडले... पाठवणी झाली... सासरी माप ओलांडून आली... सासूबाई नि खूप छान तयारी केली होती तिच्या स्वागताची.... सर्व बघत बसली ती.... खुप् मोकळे वातावरण होते... तरी थोडी अवघडलेली होती...

दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यावर,सासूबाई ने सांगितलं ड्रेस घातलास तरी चालेल... साडी मध्ये अवघडून जायला होत असेल ना... स्वरा बघतच बसली... सासू चे असे रूप तीने कधी बघितले नव्हते... वीणा ताई म्हणजे तिच्या सासूबाई त्यांनी तिला जवळ बसवले आणि सांगितलं. हे बघ शुभम म्हणतो तसे तू मला ए आई म्हणालीस तरी चालेल, आणि हो... आपल्या इथे असे नियम तसे नियम असे काही नाही... प्रत्येक व्यक्तीला त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते... आणि तें स्वैराचारात बदलणार नाही याची आपण काळजी घेतो...

हे ऐकल्यावर ती खूप मोकळी झाली... शुभम ला अहो म्हणून हाक मारतेस... त्याला आवडत असेल तर हाक मार माझी काही हरकत नाही... पण आम्ही काय म्हणू?? या विचाराने जर असे करत असशील तर खरच काही गरज नाही...

स्वराला तिच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर न मागता मिळत गेले... ती हळू हळू रूळू लागली... खूलू लागली... प्रत्येक गोष्टीत तिला प्रोत्साहन मिळत गेले.... तिच्या किती तरी सुप्त कला ज्या तिलाच माहिती नव्हत्या त्या सासूबाईनी शोधून तिला प्रोत्साहीत केले.. आणि एका नवीन स्वराचा जन्म ह्या नव्या आईमुळे झाला...

कशी वाटली कथा नक्की सांगा.....


साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा शेठ