Login

सार्वजनिक वाढदिवस (१ जून)

वाढदिवसाबद्द्ल थोडी माहिती
सार्वजनिक वाढदिवस
१ जून

सकाळी सकाळी वर्गात चर्चा चालू होती. आज ना किती जणांचे वाढदिवस आहेत ना. हो खरच. माझ्या काकांचा, माझ्या बाबांचा, आजोबांचा मावशीचा वाढदिवस आहे . असे प्रत्येक जण आपलं आपलं सांगत होते. तेवढ्यात प्रिया म्हणाली,"अरे तुमच्या लक्षात आहे का आज आपल्या काणे बाईंचा सुद्धा वाढदिवस आहे. " आरे हो खरंच की .
"आपण त्यांचा वाढदिवस करूयात का?" प्रियाने विचारले.
चालेल. सगळे तयारीला लागले.
शाळा भरली आणि पहिल्या तासाला काणे बाई वर्गात आल्या. सगळ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. बाईंना आश्चर्य चकित झाल्या.
जीवेत शरद: शतम् शतम्
सुदिनं सुदिनं जन्मदिनम्
भवतु मंगलम जन्मदिनम्
विजयीभव सर्वदा,
जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा: ||
जोरात गाणं म्हणून मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाईंना भरून आले. दोन आनंदाश्रू बाहेर आलेच.
बाईंनी सगळ्यांना धन्यवाद दिले. आता बाईंनी काही न शिकवता मस्त गप्पा मारुया असे घोषित केले. सगळ्यानी जोरात एक जल्लोष केला. बाई एका बाकावर येऊन बसल्या.
गाणी, गप्पा चालू होत्या त्यात मंदार ने एक प्रश्न विचारला," बाई आज बरेच जणांचा वाढदिवस असतो तर आपण त्याला सार्वजनिक वाढदिवस असे का बरे म्हणतो?"
"मंदार तू योग्य प्रश्न विचारला . मी आता तुम्हाला हा प्रश्न विचारणार होते. कोणाला माहितीय ?"
"नाही"
" पूर्वी फक्त मराठी महिने होते . त्यावेळी तारखाच नव्हत्या. एखाद्या चा जन्म झाला की त्यावेळी एखादी घडलेलं घटना लक्ष्यात ठेउन त्याचा जन्मदिवस मानायचे. म्हणजे एखाद्याच्या जन्माच्या वेळी जर जोरात पाऊस पडत असेल तर तो अंदाजे दिवस पकडायचे हा पण तिथी लक्षात असायची. उदा. होळी पौर्णिमेच्या आसपास जर जन्म झाला असेल तर तो व्यक्ती वाढदिवस सांगताना माझ्या जन्माच्या वेळी होळी होती असे सांगतात.
काही काळा नंतर म्हणजे इंग्रजांनी दिनदर्शिका काढल्यावर तारखेची नोंद करण्यात आली. मग शाळेत प्रवेश घेताना किंवा कागदपत्राच्या नोंदी साठी तारखेची गरज पडली.
त्यावेळी शाळेच्या दृष्टीने योग्य होईल म्हणून १जून तारीख टाकण्यात आली. फक्त साल म्हणजे वर्ष वेगळी वेगळी अंदाजे टाकण्यात आली . या घटनेनंतर ज्यांना तारीख माहित नाही त्यांची १ तारीख झाली. म्हणून आजच्या दिवशी वाढदिवस असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणून आजच्या दिवसाला सार्वजनिक वाढदिवस दिन म्हणतात. "
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि पुन्हा एकदा

जीवेत शरद: शतम् शतम्
सुदिनं सुदिनं जन्मदिनम्
भवतु मंगलम जन्मदिनम्
विजयीभव सर्वदा,
जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा: ||

जीवेत शरद: शतम् शतम्
जीवेत शरद: शतम् शतम् ||


©® सौ. चित्रा अमोल महाराव

0