Feb 23, 2024
नारीवादी

हो मी स्वार्थी होणार

Read Later
हो मी स्वार्थी होणार
चित्राला विशाल खूप आवडत होता....आत्याचा मुलगा होता..... कधी कधी आत्या तिच्या बाबांना म्हणत ही हक्काने ,अरे तुझी मुलगी माझ्या विशाल ला खूप शोभेल ...लाख गुणांची आहे ती आणि अगदी तशीच हवी मला सून ...पण मी तिला मुलगी म्हणूनच संभाळ करेन... तू फक्त हो म्हण दादा..... सगळी हौस मौज पुरवेल मी तिची...... आणि शिक्षणाचं म्हणत असशील तर तिला काय गरज आहे शिक्षणाची ....आता graduate आहे हेच पुरे आहे.....आमच्या घरची सून झाली की तिला काही करायची गरज राहणार नाही....आमच्या कडे पैसाच पैसा आहे....... त्यात माझा मुलगा गलेलठ्ठ पगाराची नौकरी करत आहे....

तरी चित्राचे बाबा म्हणत माझ्या मुलीला कोण्या होतकरू मुलाला देईल पण जिथे तिच्या स्वातंत्र्यावर गदा येईल,जिथे तीचे शिक्षण कवडी मोल ठरवले जाईल तिथे तिला मी सून म्हणून देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे..... जिथे माणूस नाही पण पैसा बोलत असेल ते घर मी तिच्या पुढील आयुष्यासाठी नक्की निवडणार नाही.

चित्रा बऱ्याचदा ह्या आत्या आणि बाबांच्या वाद विवाद ऐकत असत पण तिला बाबांचे म्हणणे ही पटत आणि तिने मनाने ज्याला आपला भावी जीवन साथी निवडला त्याच्या साठी ही तिचे मन ओढ घेत.तिला बाकी काही माहीत नाही, ना स्वतःचे स्वातंत्र्य, ना ओळख,ना शिक्षण तीळ महत्वाचे होते ते तिचे तिच्या मनात वसलेल्या मुलाशी लग्न,एक स्वप्न ,स्वप्नातला राजा राणीचा संसार ,बाकी मग काही ही दुय्यम आहे असे तिचे मत होते.

विशाल विशाल आणि विशाल हाच फक्त माझा नवरा असेल,life partner असेल ,मग इतर कोणी नकोय मला,
तिने तिचे हे मत तिच्या बाबांना बोलून दाखवले ,बाबांनी ही तिच्या किती विनवण्या केल्या,अग तुझं हीत मला कळते ,तुला जितके कळत नाही समजत नाही तितके मला तुझे हित कळते.

पण नाईलाज होता बाबांचा तिच्या हट्टा पुढे.... पण त्यांनी एक अट घातली....की तिने MBA पूर्ण करायचे आणि मगच लग्न...

तिने MBA पूर्ण केले, आणि लग्नाला उभी राहिली...
तिच्या आणि आत्याच्या मनासारखे झाले.

विशाल शिकलेला होता...पण त्यांना विशाल काय आहे हे माहीत नव्हते असे नाही .....म्हणुनच त्यांना परत नाते नको होते

लग्न झाले, विशाल आणि चित्रा वेगळे घर घेऊन राहू लागले..... काही दिवस खूप मजेत आणि सुखात गेले.

विशाल अजून ही असा वागत होता जणू त्याच्या आयुष्यात कोणी आलेच नाही,त्याच्या रूम मध्ये, त्याच्या कोणत्या ही गोष्टी त जिथे आता चित्रा ही तितकीच वाटेकरी आहे असे त्याला वाटत नव्हते.... तो सतत हे म्हणत माझे घर, माझा पगार, माझे पैसे.... माझं ...माझं....माझे..

त्यात कुठे ही चित्रा सामावलेली नव्हती, ना तो तिला सामावून घेत नव्हता. त्याला अजून ही एकच माहीत होते, हे घर माझे आहे,माझ्या कमाईतून घेतले आहे, तिला ही कितीदा म्हणत माझे पैसे आहेत म्हणून तुझी मजा आहे, माझे घर आहे म्हणून तू आरामात राहतेस, चांगला पगार आहे म्हणून खाण्याची पिण्याची, फिरण्याची तुला काही एक कमी नाही, माझी आई म्हणत असते ना तुझ्या वडिलांना आमच्या घरी तिला सगळे सुख आहे आणि तुझे पप्पा अजून ही तुला तुझ्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न दाखवत आहेत, काय कमी आहे तुला आमच्या घरात.

चित्रा लगेच दाबून ठेवलेल्या भावना बोलून दाखववते, मला माझे घर नाही ह्या घरात, माझे हक्काचे स्थान नाही या घरात, मी अजून ही चित्रा देशमुख आहे लग्न होऊन पाटील घरात येऊन ही मी परकी आहे,मी इथे फक्त खायला, प्यायला, झोपायला, फिरायला ,आणि महागडे कपडे घायला नाही आले, मी तुझी म्हणायला आले आहे,आणि तू अजून ही मला ,मी माझ्या बापाची आहे म्हणतो पण बायको नाही म्हणत, प्रत्येक शब्दात हेच मी,माझे पैसे, माझी कमाई,माझा बंगला, माझे कपाट ......काही मागितले ही नाही मी तुझ्याकडे कधी, शिवाय प्रेमाचे दोन शब्द,ते ही तू न देण्या इतका गरीब आहेस हे मला कळले आहे....

विशाल लगेच ,हो हे सगळे वैभव माझे आहे आणि तू हे बघूनच लग्न केले आहेस .

काही दिवसांनी विशाल ची नौकरी जाते, तो वेडा पिसा होता, त्याच्या हातात पैसा ही शिल्लक नसतो ,तो पुरता भांबावून जातो..... आता पैसा नाही म्हणजे मौज नाही, ऐशोआराम नाही.... सगळं संपलं आता ....रुतबा गेला माझा...

इकडे चित्राला MBA च्या base वर नौकरी लागते ,ती त्या भांडणा नंतर बाबांच्या घरी निघून आलेली असते...आता तिला बाबांचे म्हणणे पटलेले असते,..... त्या प्रेमाची धुंद उतरून ती नव्याने जॉब करत असते..... पगार ही खूप चांगला असतो.....

विशाल घरी एकटा रहात असतो, चित्रा विना आता घर रिकामे आणि उदास, भकास वाटत असते,, त्याने तिला एक कोपऱ्यातील कपाट दिले ते ही ती नसल्या मुळे जाळ्या लागून खराब झालेले भासते..... आता कळते की ती होती तेव्हा घर घर वाटत होते..... पण तिला किंमत किती तर शुन्य होती माझ्या लेखी....

तो तिला आणि तिच्यावर केलेल्या अन्यायकारक वागणुकी  बाबत पछतावा करत असतो,,,,लगेच गाडी काढून मामाच्या घरी तिला घ्यायला जातो...... ती ऑफिस मधून आलेली नसते...... तोपर्यंत त्याचटसोबत घरातले कोणी ही नीट बोलत नाही..... त्यांनी आपल्या मुलीचा उठता बसता केलेला अपमान सगळ्यांना लक्षात असतो....आणि म्हणून कोणी दुर्लक्ष केले ते ही जाणून बुजून तर कसे वाटते हे त्याला कळले होते..... असेच 2 वर्ष चित्राने माझ्या प्रेमाशिवाय कसे काढले असतील हे त्याला जाणवत होते..... पण आता तर प्रकरण divorce पर्यंत आले आहे हे त्याला माहित नव्हते....

चित्रा आली आणि तिला इतके बदललेले पाहून त्याला आतून आंनद झाला... तिने एक गाडी घेतली होती.... चांगला पगार होता.... हे पाहून त्याला मनात वाटले आता आपली पैश्याची सोय केली आहे माझ्या बायकोने.... तिचे पैसे म्हणजे आता माझेच पैसे..... आता फक्त तिला परत लाडी गोडी लावून.....प्रेमाची आन देऊन आपल्या घरी घेऊन जायचे......

तो आणि चित्रा जरा वेळ बोलण्यासाठी तो चित्राची परवानगी मागत होता..... पण ती आता तटस्थ होती... तिचा निर्णय झाला होता....तरी बाबांना वाटले हा परत आपल्या लेकीला फसवून घेऊन जाईल.. आणि तिच्या पैस्यांवर मज्जा करेन,आधी सगळे चांगले दिवस होते तेव्हा तिला हे जे काही माझे आहे ते तुझे आहे ,हे कधीच म्हणाला नव्हता, आणि आज नौकरी गेली तर ,पैस्या वाचून नडत आहे ,तेव्हा त्याला बायको असल्याची जाणीव झाली.
त्याला आज कळत आहे की जे नवऱ्याचे असते ते बायकोचे असते....आणि जे बायकोचे आहे ते नवऱ्याचे असते.... जितका बायकोचा अधिकार असतो तिच्या कमाईवर तितका नवऱ्याचं ही असावा.... किती निर्लज म्हणावा हा..

इकडे चित्रा त्याला सांगत होती, आता मी परत नाही येणार... तू आला तसा माघारी जा ...आणि हो तुला जर मी हवी असेल तर एका अटीवर मी तुझी साथ देईन जर तू माझ्या घरी माझ्या पैस्यांवर माझ्या म्हणण्यानुसार राहत असशील तर ....इथे जे काही मी खायला देईन, कपडे देईन ,जिथे मर्जी फिरायला नेईन ,तिथे आणि तसे रहावे लागेल.

तो ही चिडून म्हणाला हे कसं शक्य आहे, ही तर सरळ सरळ गुलाम गिरी आहे..... तू जे म्हणशील तसे वागायला काय मी मिंधा नाही....मला माझे स्वातंत्र्य आहे ....त्या पेक्षा मी एकटा राहील .....ठेव तुझे पैसे तुझ्याकडे मला गरज नाही...

चित्राने बाबाला आश्वासन दिले ...बाबा मी पुन्हा ती चूक करणार नाही.... मी परत प्रेमात पडणार नाही कारण आता माझ्या अकलेवर पडलेला प्रेमाचा पडदा गळून पडला आहे... आता मला स्वातंत्र्य हवेच आहे ....कोणाचे बंधन नकोय..... जे त्याचे होते ते माझे मी मानले नाही ....कारण तसा तो मानत नव्हता ...आणि जे आज माझे आहे ते त्याचे नक्कीच नाही.. मी आता स्वार्थी होणार आहे ...मी मुक्त होणार आहे.

ह्या कथेतला नवरा बायको शिकलेली असून ही तिला गुलामासारखा वागवत होता,आणि ती ही एक बायको म्हणून सहन करत होती....तोपर्यंत जोपर्यंत तिला तिच्या अस्थीत्वाची जणी त्यानेच करून दिली नव्हती ...स्वातंत्र्य काय असते...स्वाभिमान काय असतो हे प्रथम तर आपल्याला कळाले पाहिजे मग इतर ही तुमच्या स्वाभिमानाची किंमत करतात .? आई वडिलांच्या सांगण्यावरून बदल घडत नसतात ,ते आजकाल मुलींनी स्वतः घडवून आणायचे असतात.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//