Feb 24, 2024
मराठीमध्ये शुभेच्छा

स्वप्ने तुझी साकार व्हावी - ईरा तू गरुडझेप घ्यावी

Read Later
स्वप्ने तुझी साकार व्हावी - ईरा तू गरुडझेप घ्यावी

दि.११ एप्रिल. आपल्या ईराचा चौथा वर्धापन दिन. नक्कीच आपल्या ईरा कुटुंबियांसाठी हा एक आनंदोत्सवचं आहे. मी आपल्या सर्वांच्या लाडक्या ईराला माझ्या लेखणीतून काव्यरूपी शुभेच्छा देत आहे.

 

पाहता पाहता आज...

ईरा चार वर्षाची झाली...

यशस्वी वाटचालीने ती...

सर्वांची आवडती झाली...


रोज तुझी खेळकर रूपे पाहून...

 माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटते...

तुझी माझी गट्टी पाहून...

माझी लेखणीही गहिवरते...


ईरा, तू खूप आयुष्यवंत हो...

भाग्यवंत हो, यशवंत हो...

माझ्यासारख्या अनेकांचा...

तू नक्कीच आधार हो...


माझ्या सुखाची आस तू...

माझ्या आनंदाचा अमूल्य ठेवा तू...

शुष्क जीवन सागराला माझ्या...

आनंदाची आलेली भरती तू...


तू कायम अशी बहरत राहा...

खुलत राहा, हसत राहा...

होतील तुझी सर्व स्वप्ने पूर्ण...

आणि आयुष्य होईल नक्कीच परिपूर्ण...


तुझ्या आयुष्यात बहरावे इंद्रधनुचे रंग...

आणि यशाची कमान उंच उंच होत जावी...

उमलत्या वयाच्या प्रत्येक पायरीवर...

नित्य नवी स्वप्ने सत्यात उतरावी...


किर्ती तुझी घेईल आकाशाला कवेत...

पूर्ण होईल तुझ्या मनीच्या सर्व इच्छा...

वर्धापन दिनाच्या निमित्ताने ईरा...

तुला माझ्याकडून अनंत कोटी शुभेच्छा.


सौ. रेखा देशमुख


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//