स्वप्नातलं भविष्य ( भाग ९)

सुहासला एकदम आठवलं........

सुहासला एकदम आठवलं. सदाच्या तोंडात कमळीचं नाव आल्याचं रेखा म्हणाली होती. म्हणजे कब्रस्तानात कमळीलाच पुरली होती तर . म्हणजे सदा रेखाचा खरा मामा. रेखाची आई ती आपली मावशी. खरं तर वाडा रेखाच्या आईचा. मग तो उत्तेजित होत म्हणाला " भाऊ, तुमची कमळी मी तुम्हाला देऊ शकतो. जाधवला एकदम आनंद झाला तो म्हणाला, "खरच ? " .... हो, पण जिवंत नाही, पुरलेली . आता तिचा सांगाडा उरलेला आहे. तुम्ही असं करा, उद्या वाड्यावर या. मी परवा जाणार आहे. मी तुम्हाला तुमची कमळी दाखवीन." सुहासने त्याला आश्वासन दिले. मग तो जड मनाने घरी गेला. वेगळ्याच गोष्टी कळल्याने सुहास परत वाड्यावर जायला निघाला. म्हणजे मामांनी कमळीवर जबरदस्ती करून मारून टाकली तर. एखाद्या स्त्रीवर बलात्कार करणं मुळातच चुकीचं. शिवाय तिचा जीव घेणं ?.... छे, छे, या मामाला जगायचा काही अधिकार नाही. खरं तर रेखाने वाडा सोडून जायला हवं. असल्या विचारांनी त्याचं डोकं भणाणून गेलं. ...... ‌ संध्याकाळचे पाच वाजत होते. मामा मुख्य दरवाजाशी उभे होते. त्यांच्या मुद्रेवर वेगवेगळे भाव दिसत होते. तो घरात शिरताच ते म्हणाले, " झालं का डोकं शांत ? रेखानी झटकला ना तुला ? अरे मला सगळं माहित आहे. " सुहासला असल्या हलकट आणि पाजी माणसाशी बोलण्याची इच्छाच नव्हती. त्याने रागातच विचारलं, " मामा, कमळी कुठे आहे ? " मामांच्या लक्षात आलं, याला कोणीतरी फितवलाय. तरीपण ते थंडपणे म्हणाले, " आपल्या कामाशी काम ठेव सुहास. चार दिवस आलायस , सुखानी राहा. वाड्याच्या (म्हणजे त्यांच्या) उलाढालीत डोकं घालू नकोस. .... .. परवा जायचय ना ? मंदी करता साडी आणि तुझ्या करता कपडा घ्यायचाय मला , तो तेवढा घेऊन जा. "


"मामा , अरे तू कमळीचा जीव घेतलायस. एका माणसाचा तू खून केलायस. तुला लाज नाही वाटत ? तो उत्तेजित होऊन म्हणाला . मामांच्या कपाळावरची शीर थाड थाड उडू लागली. ते दात ओठ खात म्हणाले, सांगितलं ना तुला, चार दिवस सुखानी राहा आणि कमळीचं म्हणशील तर ती कोण आहे हे मलाही माहित नाही. वाटेल ते बरळू नकोस. रेखाला जेवणाचं बघायला सांग. नुसतीच पोसावी लागत्ये तिला. "सुहासने कपडे बदलले. तो रेखाच्या खोलीत डोकावला. नैना त्याला पाहताच त्याच्याकडे आली. रेखा मात्र काही न बोलता स्वैपाकघरात गेली. ती त्याच्याशी एक अक्षरही बोलायला तयार नव्हती. थोडावेळ तो स्वैपाकघरात रेंगाळला. पण तिचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तो दिवाणखान्यात येऊन बसला. .... जेवताना तिघांपैकी कोणीच बोलले नाही. नैनाची तेवढी बडबड चालू होती. रेखा तिला अधून मधून गप्प बसवित होती. आजची भाजी तिखट असल्याचे सर्वांनाच जाणवले. जेवणं झाली ...... साडे नऊ वाजले. जो तो आपापल्या विचारात होता. मामा, सुहासचं आता काय करायचं , या विचारात् होते. त्याला जरुरीपेक्षा जास्त माहिती होती. तो मंदीलाही सांगेल. याला तळघरात बंद करून ठेवावा. रेखा विचार करीत होती. आपण सुहासला आधीच का हो म्हंटलं नाही ? निदान ते थडगं तरी शोधायला नको होतं. पण सुहासच्या आगाऊपणामुळे हे झालं. शिवाय कमळी आपल्याला च का त्रास देते ? मामांनी तिला मारली होती , त्यांच्या मागे ती लागत नव्हती. सुहास तर रेखाला भेटायला अधीर झाला होता. त्याने साडेदहा पर्यंत वाट पाहिली . मग मामांची नजर चुकवून रेखाच्या खोलीत तो डोकावला. त्यावर ती , त्याला मामा झोपल्यावर त्याला बोलवील. म्हणून तोही अंथरूणावर पडून राहिला. स्वतःच्या वस्तू त्याने गोळा केल्या होत्या. परवा त्याला जायचं होतं. उद्याचाच दिवस मध्ये होता.

मामाही तो झोपण्याची वाट पाहात पडून होते. तो अधून मधून घड्याळ पाहात होता. हळू हळू त्याला झोप लागली. मामांनी ते पाहिलं. आणी मनाशी काही ठरवून ते झोपले. इकडे, रेखामध्ये बदल होऊ लागला. अंगाची कांती काळवंडू लागली. मग कालच्या सारखेच सर्व बदल होऊ लागले. तिने दरवाजा हळूंच उघडला. कमळी म्हणालि, " बोलाव तुझ्या याराला. तुझ्याशी लग्न करतोय ना तो ? " मग रेखानी सुहासला हाक मारली. मामांच्या घोरण्याचा आवाज येत होता. तिने खोली बाहेर पाऊल टाकलं आणि तिच्यातल्या कमळी ने सुहासला गोड आवाजात हाक मारली. तो उठत नाही असं पाहून कमळीने आपला हात लांब करून त्याला धक्का दिला. थंड स्पर्श झाल्याने सुहासची झोप चाळवली . हाका ऐकू आल्याने तो बिछान्यावर उठून बसला. त्याने घड्याळ पाहिलं. एक वाजत होता.त्याला लक्षात आलं , रेखानी त्याला बोलावलय. जाताना तो लायटर घेऊन जायला विसरला नाही. लायटरच्या प्रकाशात तो तिच्या खोलीच्या दाराशी आला. कमळी रेखाला म्हणाली, " त्याच्याशी नीट बोलून आत घे. ". रेखा म्हणाली, " सुहास , ये ना ... तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवय ना ? ... ‍ कंदिलाच्या अंधुक प्रकाशात रेखाच्या आकृती शिवाय सुहासला काहीच दिसत नव्हतं. त्याने लायटर पेटवला त्या प्रकाशात तो आत गेला. म्हणाला, " रेखा , काय निर्णय आहे तुझा ? ". त्यावर ती म्हणाली, " परत लायटर पेटव आणि माझ्याकडे बघून सां ग . करशील तू माझ्याशी लग्न ? मी तयार आहे . " त्याने परत लायटर पेटवला. त्याच्या निळसर पिवळसर प्रकाशात त्याची नजर तिच्या चेहेऱ्याकडे गेली. आणि त्याच अंग शहारलं..... खोल गेलेले डोळे, डोक्यावरचे केस उडालेले, दात पुढे येऊन त्यातून रक्तवर्णी लाळ गळत असलेली पाहून त्याला भोवळ येईल की काय असं वाटू लागलं. त्याच्या हातातला लायटर गळून पडला. आणि तो कसातरी धडपडत बिछान्यापर्यंत पोचला. त्याच्यामागे रेखातली कमळी जोरजोरात हासली. आणि दरवाजा लावला गेला. सुहासने ती रात्र कशीतरी तळमळत काढली . रेखाचं हे काय झालं ? तरी ती सांगत होती थडग्यात हात घालू नकोस म्हणून. तिच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत, अशी त्याला टोचणी लागली. उद्या जाधव येईल. मग त्याच्या मनात आलं , रेखा कसल्यातरी अमानवी सापळ्यात अडकली आहे, आणि तो सापळा कमळीने टाकलेला आहे. आपण ठरल्याप्रमाणे, नैनाला घेऊन परवा निघून जावं हे बरं. नैनाला आपण समजावू आणि सांभाळूही. आईलाही हे नक्कीच पटेल. शेवटी ती तिची नातच नाही का ?

एक प्रकारचा मंदपणा आणी आळशीपणा घेऊनच वाड्यातला दिवस उजाडला. सर्वांवर एक प्रकारची अवकळा पसरली होती़. उठल्या उठल्या त्याने मामांकडे पाहिलं. बिछान्यावर त्यांचा पत्ता नव्हता. आता मामा कुठे गायब झाला ? दहा अकरा वाजेपर्यंत वेळ गेला. चहा , नाश्ता वगैरे झालं. सुहासने आपली बॅग पॅक केली. रेखाचं लक्ष होतं पण ती काहीच बोलली नाही. तिची कामं यंत्रवत चालू होती . सुहासने ही तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवटी तिनी नैनाकडून सुहासला बोलावून घेतलं. ति स्वैपाक करीत होती. तो आत येताच ती मंद हसलि. म्हणाली, " , मला तुमच्याशी थोडं बोलायचय. " त्याने फक्त "हूं " म्हंटलं. ती म्हणाली, " तुम्ही म्हणता ते खरं आहे. .. मी..... मी लग्नाला तयार आहे. " त्यावर तो म्हणाला, " लग्न ? आता ते शक्य नाही. तुला वाटतं आपल्याला संसार करणं जमेल? तुझ्या रात्रीच्या प्रॉब्लेमचं काय करायचं ? नैनाला काय सांगणार आहेस ? " ती म्हणाली, " काय हरकत आहे ? आपण दिवसाचा संसार करू . " तरीही त्याची तयारीनव्हती. तो थोडा चिडून म्हणाला, " रेखा एखाद्याच्या बायकोचं रात्री नागिणीत रुपांतर होतं असं काहीतरी वाचलं होतं. तरीही कोणी अशा स्त्रीशी लग्न करणार नाही. इथे तर तू झपाटलेली आहेस्स. तुझ्यात संचार होतो. पण एक गोष्ट मात्र मी करणार आहे , नैनाला बरोबर घेऊन जाणार आहे. एवढ्या लहान मुलीचे हाल कशाला ?, तुझ्याबरोबर राहून ? " तिला ते फारसंआवडलं नाही. पण ती दीनवाणेपणाने म्हणाली, " आपण एखाद्या मानसोपचा तज्ञाला दाखवू किंवा नरसोबाच्या वाडीला जाऊ , म्हणजे काही तरी उपाय नक्की सापडेल. " पण सुहासला ते काही पटेना. मग मात्र तिलानिराशा आली. तिच्या मनात आलं , आई होती तेव्हा तिला आपल्याकडून काहीच सूख मिळालं नाही, आपण अविनाशवर एवढं प्रेम केलं, त्याचं ही आयुष्या आपल्यामुळे फुकट गेलं. खरं तर आपला जगून काही उपयोग नाही. तिने बोलण्याकरता तोंड उघडलं, पण सुहास तिथून निघून गेला. तिला निराशेने हलकासा घाम आला. पदराने घाम पुसून ती पुढच्य कामाना लागली. मामांकडे येण्यात आपली चूक झाली. आपल्याला बीन त्रासाचं सगळं हवं होतं. लोक आयुष्याशी झगडतात, आपण काय केलं ? आपण आता पुरत्या अडकलो असल्याचं तिला जाणवलं. पिंजऱ्यात अडकलेल्या श्वापदासारखी तिची स्थिती झाली. तिची विचार शक्ती खूंटली. अतिनिराशेने ती स्वस्थ बसून राहिली.

त्या ओघात चुलीवरती भात ठेवल्याचं तिच्या लक्षात आलं नाही. तो जळून सगळीकडे वास पसरला. धावतच सुहास स्वैपाकघरात आला. म्हणाला, " अगं रेखा, भात जळतोय. जवळ बसून तू करतेस काय ? " तिने मनाच्या विच्छिन्न अवस्थेत भाताकडे पाहिलं. खरच भातातून धूर येत होता. तिने पटकन भाताचं पातेलं उतरलं. ती तशीच उठून स्वतःच्या खोलीत दरवाजा लावून पडून राहिली. कोणाला विचारायचं , कोणाला सांगायचं ? तिला काही सुचेना. गावात तिची कोणाशीही ओळख नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपली जगण्याची लायकी नाही. तिने दिवाणखान्यात खेळणाऱ्या नैना कडे पाहिलं. काय हरकत आहे , नैना सुहास बरोबर गेली तर ? निदान तिचं आयुष्य तरी सावरेल. आपण आधीच सुहासला होकार द्यायला हवा होता. आता पुन्हा रात्र पडेल, पुन्हा कमळी आप्ल्या शरिराची वाट लावेल. सकाळी पुन्हा नॉर्मल. आताअ हेच आपलं आयुष्य.नेमके जेवायच्या वेळेला मामा आले. मामांच्या हातात दोरखंड आणि धारदार विळा होता. सुहासने मामाला विचारलं, " मामा हे कशासाठी ? " मामा सहजतेचा आव आणित म्हणाले, " अरे , माळावर झुडपं फार झालयेत, कापायला हवीत. आणि दोन बालद्या विहिरीत पडल्येत त्या गळ टाकू न काढायच्येत म्हणून हा दोर. " मग त्यांनी तो दोरखं ड आणि विळा "त्या" खोलीत टाकून दिला. सुहासचा पारा चढतच होता. पण त्याने तावा ठेवला. इतक्यात जाधत येईल. रेखा जेवायला बोलवील अशी त्याची अपेक्षा होती. साडे बारा वाजले होते. मामांना तो न सांगता जाण्याबद्दल विचारणार होता, तेवढ्यात रेखाने जोरात खोलीचं दार उघडलं. तिचे केस मोकळे होते . विव्हळल्यासारखा आवाज करीत ती धावतच निघाली. तिने काही सेकंदातच "त्या " खोलीच्या दरवाजापर्यंतचा मार्ग कापला. काहीतरी गडबड होणार असं वाटून सुहास तिच्यामागे धावला. त्या अवधीत नैना कडे मात्र त्याचं दुर्लक्ष झालं.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all