मग तिने जेवण केलं. नैना आणि ती जेऊन अंथरूणा वर लवंडली. तिला झोप येत नव्हती. एक प्रकारची पोकळी तिच्या मनात निर्माण झाली. मामांकडे येऊन आपण काय करतोय ? आपल्याला निदान काम तरी शोधायला पाहिजे. पुढच्या आयुष्यात आपण काय करणार आहोत ? धेय्यहीन आयुष्य जगणं तिला अस्वस्थ करू लागलं . त्या विचारातच तिला डुलकी लागली.
"पो स्ट म न " या आवाजाने तिला खडबडून जाग आली. पुढच्या दाराशी उभ्या असलेल्या पोस्टमनने तिला एक बंद पाकीत दिले. तो निघून गेल्यावर ते पाकीट फोडावं की नाही या संभ्रमात ती थोडावेळ विचार करीत राहिली. अखेर तिने ते फोडण्याचे ठरवून मामांची माफी मागण्याचे ठरवले. पाकिटातून एक चिठ्ठीवजा पत्र निघाले. कोणीतरी सुहास नावाच्या मुलाने ते लिहिले होते. ते वाचल्यावर तिला कळलं की सुहास मामांचा सख्खा भाचा होता. आणि त्याला दुबईला नोकरी लागली होती. पण जाण्याआधी तो मामांना भेटाय्ला येणार होता. तिला कळेना काय कराव ? कोणीतरी येतय. आपण , आपली काय ओळख करून देणार आहोत ? कोण जाणे . तिने ते पाकीट लिहिण्याच्या टेबलावर ठेवून दिले. नंतार तिच्या लक्षात आलं की नैना अजून झोपलीच आहे. मग तिच्या मनात आलं की आपण आता कुलुप न लावलेली खोली उघडून पाहावी. तिने आधी तोंड धुऊन घेतलं. दुपारचे साडेतीन होत होते. उन्हाची धाप तशी वाड्यात लागत नव्हती. पण बाहेर दिसणाऱ्या लख्ख उजेडावरून तिने अंदाज बांधला. वाऱ्याचं नावही नव्हतं. एवढा मोठा वाडा पण वाड्यात वीज नव्हति. किंबहुना ती गावात अगदी मोजक्याच ठिकाणी होती. तिने घटाघट पाणी प्यायलं.
तिच्या तोंडावर थंड गार वारा येऊ लागला. आस्ते आस्ते वाऱ्याचा वेग वाढला. मग ती थोडी भानावर आली. तिने आता त्या प्रकाशात मागे वळून पाहिले तर तिच्या डाव्या हाताच्या भिंतीतून वर जाणारा तोंड उघडलेल्या माणसासारखा एक जिना तिला दिसला.मघाशी खोलीत आलेला वारा जिन्यावरून येत होता तर. ती स्वतःशीच पुटपुटली. तिने आता नवीन दाराच्या बाहेत डोके काढून समोर वाकून पाहिले. ........ खडकाळ माळरानासारखा भाग तिला दिसला. अर्धवट सुकलेले पिवळे गवत आणि लहान ल्हान वड पिंपळाची झाडे याखेरीज तिला तिथे काही दिसले नाही. पण तोपरिसर आपण कुठेतरी पूर्वी पाहिला असल्याचे जाणवले. मग तिने परत फिरण्यासाठी मान वळवली. आणि तिला खोलीच्या पहिल्या दारात मामांची आकृती दिसली. तिच्या अंगाला घाम फुटला .
(क्र म शः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा