Login

स्वप्नातील जग

Dream Of A Working Tiresome Lady To Be Happy
स्वप्नातील जग.
राधिका कुलकर्णी.

रेवती एका मोठ्या फर्ममध्ये काम करत होती. तिची पोस्टही उत्तम होती. पण सतत कामाच्या रगाड्यात स्वतःसाठी जगायला वेळच मिळत नव्हता तिला. घरी गेल्यावर त्याच जबाबदाऱ्या. आयुष्य एका चाकोरीत बद्ध झालं होतं. एक दिवस खूप वैतागून ती ऑफीसमधून घरी गेलीच नाही.
सरळ समुद्र किनारा गाठला. तिथल्या ओल्या मातीत पाय रूतवून घर बनवले. परत मोडले. पाण्यात खूप बागडली. मग चौपाटीवर भेळ पाणीपुरीचा आस्वाद घेत तिथेच अंग टाकून अगदी तृप्तीची आसवे गाळत पडून राहिली..

"अगं उठ, किती वेळ झाला?"

आणि रेवती खडबडून जागी झाली.
उठली तेव्हा ती तिच्या बेडवर होती. पण मनोमन स्वप्नांच्या जगात मस्त फेरफटका मारून आली होती..
आज ती खूप आनंदाने ऑफीस करता बाहेर पडली. तिचं तेही स्वप्नाच वेगळं जग तिला पुन्हा खुणावत होतच नाऽ.
____________________________
(समाप्त)