Jun 14, 2021
ललित

स्वप्नांजली

Read Later
स्वप्नांजली

मग बडे बाबू आणि वामन ला त्यांनी आॅफीस जवळ सोडले आणि गाडी बंगल्याकडे वळविली दिनानाथने , दुरुनच बंगला दिसत होता , अवी निसर्ग न्याहाळत होता , दुर बंगल्या पासून काही अंतरावर त्याला कुणीतरी चालत बंगल्याकडे जात असलेल दिसलं , जशी जशी गाडी बंगल्याकडे जात होती तशी तशी ती व्यक्ती पण आता स्पष्ट दिसायला लागली , अरे ही मुलगी कोण ? आणि पायी , पण कपडे ,, तिची चाल,, चिरपरीचित वाटतेय ,, अरे हट,,, इकडे कोण आपल्या ओळखीची , 
मनातल्या मनात अवी पुटपुटला , जीप आणि ती व्यक्तीपण गेटवर पोहोचले , रामू बाहेरच ऊभा होता तो धावतच गेट जवळ आला आणि गेट ऊघडले , जीप पोर्च मधे ऊभी राहीली ,
कोण आहे ही बाई दिनानाथ ? माहीत नाही सरजी , बघतो मी , म्हणत दिनानाथ त्या व्यक्तीच्या दिशेने गेला , कोण आपण ? इथे नवीनच वाटताय ? मागून अवी पण आला आणि त्या व्यक्तिचा चेहरा बघून , ओरडलाच , लतिका ssssss
तू ,,,तू ,,, इकडे कशी ? काय ? तिला बघून प्रचंड आनंद झाला होता , धावतच पुढे येत त्याने तिला मिठीत घेतले , 
कधी आलीस गं , माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये , लते,,, कशी काय ?अरे हो हो ,, जरा श्वास घे , दुपारीच आले मी , आणि तिने डोळ्यानेच त्याला इशारा केला , दिनानाथ आणि राजू कडे बघून , 
तसे भानावर येत बाजूला होत अवी म्हणाला , 
मला फोन करायचा असता गं , मी घ्यायला आलो असतो ना , अच्छा म्हणजे इथे फोन लागतो ? हसतच लतिका म्हणाली,
अरे हो मी विसरलोच , बरं हे ड्रायव्हर , अवीचे बोलणे मधेच तोडत लतिका म्हणाली , दिनानाथ भाऊ ! हो की नाही भाऊ , हो मॅडम पण तुम्हाला माझ नाव कसं माहीत ! आश्चर्याने लतिका कडे बघत दिनानाथ म्हणाला ,
राजू भाऊने सांगीतले ! लतिका ऊत्तरली ,
अच्छा अस्सं होय ,,, मला पण वाटल ! तू कशी काय ओळखतेस ,अवी ही हसतच म्हणाला , चला आत जाऊया , मग ते सगळे आत हाॅल मधे आले चला आता चहा घेऊ आपण , चिंतामन चहा बनव बरं , अवीने चिंतामन ला म्हंटले ,
तसे लतिका त्याला म्हणाली , तू जेवला नाहीस ना ? मग आता चहा घ्यायचा नाही आपण जेवणच करुया ! बरं बाबा ठिक आहे , चला सगळेच जेवूया , 
मग सगळ्यांनी जेवण केले , चिंतामन आणि दिनानाथ परत गेलेत , तसेच तिचा हात पकडून तिला बेडरुम मधे घेऊन आला अवी आणि आवेगाने तिला मिठी मारली , तुला माहीत आहे लतिका मी कालच इकडे आलोय पण असं वाटतय खुप दिवसांपासून तुला भेटलो नाहीये , काल पासून जाम आठवण येत होती तुझी , बरं झालं तू आलीस ! आता सर्व बंधने आपण तोडू , आता नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय आणि अवी तिच्या ओठांच चुंबन घ्यायला वाकला , त्याला हलकेच दूर लोटत गालातल्या गालात हसत लतिका म्हणाली , महाशय लग्न व्हायच आहे आपल अजून !
ठरल होत ना आपलं ! लग्नाशिवाय पायरी ओलांडायची नाही ?
काय गं सारखी सारखी अशी अडवत असते मला ! मग कशाला आली तू इकडे ? सोबत चल म्हणालो तर तयार झाली नाहीस आणि अशी एकटी मागाहून आली , मला कळतच नाहीये तुझं काही ? सांग मला का आलीस तू ??
तुझ्या साठीच आले ! नाही राहावले मला ! तू माझ्याकडून गेल्यावर रात्रभर मला झोप आली नाही , तुझ्या दुर जाण्याच्या कल्पनेनेच कसनुसं वाटत होत मला ! काल तू गाडीत बसलास तुझा मेसेज आला मला आणि खुप रडले मी ! तुझा काॅल घेता नाही आला मला मी आंघोळीला गेले होते आणि लक्षातच राहील नाही माझ्या की इकडे आता फोनवरुन आपल बोलण होणार नाही म्हणून ! जेव्हा लक्षात आले तो पर्यंत वेळ निघून गेली होती , तू इकडे पोहोचला होता मग आईशी बोलले आणि लगेच सकाळच्या गाडीत बसले , आणि आता तुझ्या समोर आहे मी ! पण मग आॅफीस ? टाकली सुट्टी पंधरा दिवसांची !
हो का ! पण मग पायरीच ओलांडायची नाही , तुला लांबूनच बघायच ! मग तू तिकडेच बरी होती ना ! रागाने अवी म्हणाला ,
अरे बाबा असा कसा रे तू ! मी आपली एवढ्या लांबून आले , आणि तू रुसतोस माझ्यावर , पण एक सांगू का रवी , रागावलास की खुपच गोड दिसतोस !
अवी आता तिच्या डोळ्यात बघायला लागला , 
कधी करायच लग्न मला आताच तू तारीख सांग बरं ! ठरवूनच घेऊ आपण ! चल बोल आता ! माझ्या प्रश्नाच ऊत्तर आता तू इथे टाळूच शकत नाही ! हां बोल लवकर ! नाहीतर माझा स्फोट होईल आता ! रागाने अवी म्हणाला , ऊद्या !
कायsss 
हो ,,, हो ,,, ऊद्या करायच लग्न कारण आता रात्र झालीय !
एका दमात लतिका बोलली , अवी तर क्षणभर बघतच राहीला , 
मग भानावर येत म्हणाला you mean to say आपण ऊद्या लग्न करायचं ! हो बाबा ऊद्या करायचं ! पण मग आपल्या घरची मंडळी ! त्यांना नंतर सांगू आपण , मला वाटतं माहीत झाल्यावर त्यांना आनंदच होईल ! काय म्हणतोस तू , ए ,,अवी ,,, खरच बोलतेय मी , अगं माझ्या डोक्यावरुनच जातय सगळं ! असं अचानक कसं पण ! ओके , जाऊ दे मग , तुला अचानक नाही आवडलं ना ! ठिक आहे , पुढल्या वर्षी करु लग्न तुझा साळा नोकरीला लागल्यावरं , मग तर विश्वास बसेल ना तुझा !
तणतणतच लतिका म्हणाली !
क्रमशः