सकाळी पक्षांच्या किलबिलनेच त्याला जाग आली , झोपल्या झोपल्याच त्याने खिडकी कडे सहजच बघीतले तर ,
चकीतच झाला , लतिका आंघोळ करुन , साडी घालून तयार होती , आज पण तिचे केस ओले होते आणि ती आनंदाने खिडकीतून बाहेर बघत होती ,
चमकुन लतिका म्हणतं खडबडून अवी हसतच ऊठला आणि खिडकीकडे बघीतले तर , गायब,,,लतिका तिथे नव्हती ,
अरे च्चा ! हे असं का होतय मला ,
हसून स्वतःशीच बोलला , नाही अविनाशराव अश्यानी कसं होणार तुमच ! आता निर्णय घ्यायलाच पाहीजे ,
मनाशी काहीस ठरवूनच तो ऊठला !
तयार होऊन आॅफीस मधे गेला , एका कागदावर सुटीचे अॅप्लीकेशन लिहून त्याने ते तिथल्या चपराशी वामन कडे दिलेत आणि त्याला म्हणाला तुम्ही हे अॅप्लीकेशन अलीगड च्या आॅफीसमधे द्या , तिथून ते वरीष्ठांकडे पाठवतील ,
चला बडे बाबू आज कुठे जायचे ते सांगा आपण जरा कामाला लागूया , मग ते सर्वे करायला पुन्हा जंगलाकडे रवाना झाले ,
असेच दिवसां मागून दिवस जात होते ,
आज अवी लवकरच आॅफीस मधे आला , म्हणजे तसे त्याने आदल्या दिवशी आॅफीस मधे सांगीतले होते ,
आपण ज्या जागा बघीतल्यात त्यातल्या दोन जागा मी तारांकीत करुन ठेवल्यात बडे बाबू !
तुम्ही लवकरात लवकर सगळी माहीती मिळवा , सगळे पेपर्स तयार ठेवा , मी आज गावी जात आहे , पाच दिवसांची सुटी टाकली आहे मी , आल्यावर पुन्हा कामाला लागावे लागेल जोमाने , होजी सरजी !
तयारी झालीच आहे माझी , बंगल्यावर गेलो की निघतोच लवकर अलीगड साठी ,
सरजी , नऊ वाजताची गाडी आहे , मी पण येतो सोबत अलीगड ला ,
मला तिकडून थोड सामान आणायच आहे , बडे बाबू म्हणाले ,
बरं ठिक आहे चला सोबत पण मग जरा लवकरच निघाव लागेल इथून ,
दुकानं रात्री बंद होतील ना ? तुम्ही तयार राहा ,
मी बंगल्यावर जाऊन येतो म्हणत अवी जीप मधे बसून बंगल्यावर परतला .
अवी बंगल्यात आल्यावर हातपाय धुवून फ्रेश झाला , कपडे बदलले , तो पर्यंत राजू चहा घेऊन आला , चहा पित अवी त्याला म्हणाला , राजू मी पाच दिवसानी येतो परत ,
पण सरजी एक गोष्ट विचारु का ? हो विचार ना !
तुम्ही तर अजून काही दिवसा नंतर जाणार होतात ना ?
अरे हो ! एक काम आल वेळेवर म्हणून लवकर जात आहे ,
तेव्हढ्यात चिंतामन आला , सरजी जेवता की डब्बा देऊ सोबत ,
अरे ! नाही डब्बा नको , मी इथेच जेवतो , आण ताट वाढून !
मग अवी ने जेवण केले आणि दिनानाथ सोबत निघाला , आफीस च्या जवळ बडे बाबू ऊभेच होते , त्यांना सोबत घेतले आणि निघाले अलीगडला !
गाडी यायला अजून दोन तास होते , मग अवी पण त्यांच्या सोबत स्टेशन च्या जवळच असणार्या मार्केट मधे गेला , तिथले पेढे खुप छान असतात असे बाबूंनी सांगीतले , मग अवीने दोन पेढ्यांचे बाॅक्स घेतलेत , बडेबाबूंनी काही खरेदी केली मग सगळे स्टेशन वर आलेत , थोड्या वेळाने गाडी आली अवी गाडीत बसला तसे बडेबाबू म्हणाले ,
सरजी या लवकर ! तुम्ही आलात तर जरा रौनक आली बघा आॅफीसमधे ,
बरं ठिक आहे येतो मी , पाच मिनीटात गाडीने स्टेशन सोडल ,
गाडी तशी जवळ जवळ रिकामीच होती , आपल्या जागेवर अवी बसला , एक सुटकेस घेतली होती त्याने सोबत , ती व्यवस्थित ठेवली , दिवसभर्याच्या धावपळीने अवी थकला होता म्हणून लगेच त्याने बर्थवर स्वतःला झोकून दिले ,
लवकर झोपतो मी आता ,
कारण ऊद्या मी आईला भेटलो की आधी लतिके कडे जातो, पुढचे चार पाच दिवस मी तिला आॅफीसला जाऊच देत नाही , माझ्या डोळ्यांसमोरुन तिला हलुच देत नाही मी आता ,
आणि जमल तर स्वप्नातल्या सारखे लग्न ऊरकवून तिला घेऊनच येतो इकडे , काय भयानक लांब लचक मी स्वप्न बघीतल ,
माझाच अजुनही विश्वास बसत नाहीये , ते स्वप्न होत म्हणून !नाही मी आता कुणाचच काही ऐकणार नाही , मी लतिकाला सोबतच घेऊन येणार , ठरल !
अवीला छान झोप आली रात्री , कुठल्यातरी स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा अवी ऊठला , घड्याळ बघीतले , सकाळचे सात वाजले होते , म्हणजे अजून एक तास , अवीने मग चहा घेतला स्टेशनवर , दहा मिनीटात गाडी निघाली मायानगरी साठी , अवी तर मनाने कधीचाच लतिका जवळ पोहोचला होता , मला पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल कारण मी त्यांना सांगीतले होते पंधरा दिवसा नंतर येईल म्हणून ,,, आज तर दहाच दिवस झालेत ,
मला सगळ्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघायचा आहे ,
बस थोडा वेळ ,,, ही प्रतिक्षा जीवघेणी वाटतेय बुवा मला ,
अवी स्वतःशीच बोलला ,
गाडी मायानगरीला पोहोचली , लोकांच्या हातात मोबाईल बघून त्याला आपल्या मोबाईलची आठवण आली ,
अरे माझा मोबाईल ! अरे ,, मोबाईलला रेंज नसल्यामुळे , त्याने मोबाईल कपाटात ठेवला होता , कामाच्या व्यापात मोबाईल कडे लक्षच नव्हत आणि येताना त्याच्या लक्षात नाही राहीलं मोबाईल सोबत घेणे , जाऊ दे मी पोहोचलो आता घरी , काही हरकत नाही ,
पोहोचलो एकदाचा आपल्या गावी बाबा,,,आनंद अवी च्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता , अवी टॅक्सीने घरी गेला , दार ऊघडेच होते , हळूच अवी दार लोटून आत गेला , आईss रमाबाई सोफ्यावर बसलेल्या होत्या आणि डोळ्यांना त्यांच्या धारा लागलेल्या होत्या ,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा