Jun 14, 2021
ललित

स्वप्नांजली.7

Read Later
स्वप्नांजली.7

त्यातच काल लग्नामुळे तू आॅफीसला गेला नाहीस ,
सकाळीच दिनानाथ भाऊ आलेत काही निरोप घेऊन , 
तू बोल त्यांच्याशी आधी ,, चल !
मी तयारी करतो , मग बोलतो त्यांच्याशी , अवी ऊठत म्हणाला , हो ठिक आहे , मी बाहेर जाते , तू ये !
म्हणत लतिका हाॅल मधे गेली ,
अवीने छान गरम पाण्याने आंघोळ केली , त्याचा आताही विश्वास बसत नव्हता , त्याचं लग्न झालं म्हणून !
च्यामायला सगळी गंम्मतच आहे बुवा म्हणत हसतच त्याने मग तयारी केली आणि हाॅलमधे आला , त्याला बघून दिनानाथ ऊभा राहीला , सरजी काल शेजारच्या गावातले लोक आॅफीस मधे आले होते , त्यांना तुम्हाला भेटायचं आहे ,काही कामं आहे का ? हो , ते काही जणांची डोंगराळ भागात ऊंचावर शेती आहे ,,तर त्या बद्दल बोलायच होत त्यांना , काल आॅफीस बंद होत , ते निरोप ठेऊन गेलेत , आज येतो म्हणाले , तर एव्हढ्यात येतीलच , बरं ठिक आहे , आपण नाश्ता करुन निघूया मग ,
तेव्हढ्यात राजू नाश्ता घेऊन आला , आज अवीचा आवडता
शिरा बनला होता , लतिकाने बनवला होता , 
ये लतिका तू पण बैस आपण नाश्ता करु , 
लतिका ही येऊन बसली , दिनानाथला पण नाश्ता दिला , 
अवी तिला आपल्या कामाविषयी सांगू लागला , 
मग म्हणाला आता मी जातो आणि लवकरच यायचा प्रयत्न करतो , बरं मग जेवणाच कसं ? येतो दुपारी जेवायला ,
बरं ठिक आहे ये जेवायला !
तुला कंटाळा येऊ शकतो लतिका , 
अरे नाही येणार , जा तू पण लवकर ये !
मग अवी जीप मधे बसला , त्याने हात हलवून मागे लतिकाला बघीतले ती त्याला दारातून बघतच होती , 
तिने ही हात हलविला , येतो लवकरं , अवी तिला म्हणाला .
अवी आॅफीसमधे गेला तर तिथे शेजारच्या गावातील लोकं आलेली होती , त्यांच्याशी बोलल्यावर त्याला कळले त्यांची डोंगरमाथ्यावर शेती आहे , आणि टाॅवरसाठी जर जमीन पाहीजे आहे तर दोन शेतकरी तयार होते , 
पण अवी म्हणाला आधी मला सगळ्या शक्यता पडताळून बघाव्या लागतीलं , सगळा परीसर फिरल्या शिवाय आताच सांगता येणार नाही , निदान आज आमची जागा तरी बघून येऊ , गावकरी म्हणाले , चला बघून येऊ , दिनानाथ चला गाडी काढा मगं सगळे जीप मधे बसून जागा बघायला गेलेतं ,
संध्याकाळी ऊशीराच अवी बंगल्यावर परतला , 
अरे लतिकाने जेवायला बोलाविले होते पण लांब गेल्यामुळे येऊच शकलो नाही , माहीत नाही काय म्हणेल ही आता , 
घरी पोहचल्या पोहचल्याचं अवी लतिकाला बघताच कानाला हात लावून म्हणाला , साॅरी sssसाॅरीsssयार ss खुप लांब गेलो होतो गं , अरे अरे ठिक आहे ना ! मी समजू शकते , 
काही खाल्लसं का मगं , हो गं ! बाबू आणि बडे बाबूंचा टिफीन होताच सोबत थोडं खाल्लं , चल मग आता फ्रेश हो , जेवण तयारच आहे ,अवी फ्रेश झाला , मग दिवसभर काय झालं ते अवी ने सांगीतले तिला जेवता जेवतां , बेडरुम मधे आल्यावर हसतच तो म्हणाला , लते , अगं टिपीकल नवरा झाल्या सारखं वाटल गं आजं , मी बाबांना असं बघीतल होतं , 
आॅफीस मधून आले की जेवताना दिवसभर काय केलं ते सांगायचे आईला , सगळी गंम्मतच वाटतेय मला गं , 
काय , कुठे तर एखाद्या वर्षाने लग्नं करणार होतो , किती प्राॅब्लेम तुझ्या घरचे , लग्नाचा विषय काढला की आपले भांडण होऊनच मगं वातावरन निवळायचं , इकडे येताना किती मनं भारी होत माझं , कारण तुम्ही कोणीच माझ्याजवळ नसणार हे माहीत होत मलाआणि एवढ्या सगळ्या अशक्य गोष्टीं मधून जे तू शक्य केलसं , माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये ,
अच्छा sss तेच ते तेच ते काय सारखं विश्वास बसतं नाहीये , विश्वास बसतं नाहीये , तुझा खरचं विश्वास बसत नाहीये ना ?
ठिक आहे मगं जाते मी , लतिका ओरडून आणि रागाने म्हणाली ,अवी हसून तिच्याकडे बघायला लागला ,
हसतोस काय असा , घे मी निघाली,,,झुप ,,,, झुप,,,, झुप,,,, बघता बघता त्याच्या डोळ्यां समोरुन लतिका अदृश्य,,,,,,
क्षणभर त्याला कळलचं नाही हे काय झालं ते ,
लतिकाsss लतिकाsss काय झालं ,,, हे कायं होतं ,,,
लते ,,, तू ,, तू,,, अदृश्य कशीझालीस , लताssलतिकाsssलतेsss
मला घाबरवूं नकोस गं,,,ये ना परतं,,,माझी गंम्मत करतेस का ?
लतिकाsssबघं मी रडणारं आता , अशी काय करतेस ,
तू अदृश्य कशी झालीस ,
अवी जागेवरच बसून बडबड करत होता ,
तो जसा बेड ला खिळला होता ,
हलता येत नव्हतं की ऊठता येत नव्हतं ,
जे बघीतलं ते , स्वतःच्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसतं नव्हता,,,क्षणात हे काय झालं ,,,मग त्याला रडू आवरेना ,,,
मनात वेगवेगळे विचार यायला लागले ,,,
म्हणजे मी काय समजू ,माझ्या लतिकाला काही झाल का ,,,?
काही वाईट झाल का तिच्या सोबत,,,?
ती बरी असेल ना ?
नाही ,,, नाही,,,, असं शक्य नाही ,
माझी लतिका मला सोडून जाऊच शकत नाही ,
पण मगं हे काय होत ,
कशी अदृश्य झाली ती ,
लतिकाssss लतिकाssss
अवी हमसून हमसून रडू लागला ,
त्याचा रडण्याचा आवाज ऐकूण ,
राजू , चिंतामन आणि दिनानाथ धावतच बेडरुम मधे आले ,
सरजी ,,,सरजी,,, का रडताय,,, काय झाल ?
का रडताय सरजी,,,,
क्रमशः