Jun 14, 2021
ललित

स्वप्नांजली. 6

Read Later
स्वप्नांजली. 6

मग अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हंटली , नंतर वरमाला घातली एकमेकांना , दोघांना मग खाली बसवून होम मधे आहूती टाकण्यात आली फेरे झालेतं , मंगळसुत्र घालाss आणि मग भांगेत कुंकू भरा , अवी दचकलाच , अरे ss मी तर विसरलोच ! दुकानात जायचे होते ? ना अंगठी , ना मंगळसुत्र , आता कसे ?
राजू ने लगेच एक ट्रे पुढे केला , त्यात कुंकवाचा करंडा , सोबतच मंगळसुत्र आणि दोन अंगठ्या ठेवलेल्या होत्या , 
अरे बापरे ! त्याने प्रेमाने लतिका कडे बघीतले , 
लतिकानेही त्याच्याकडे बघत म्हंटले , ओळखलं का ?
बापरे , पुर्ण तयारीनेच आली तू ! हो ना बदमाश लते ,
शू sss , सगळे बघतायत , लतिका फुसफुसली ,
आधी अंगठी घातली दोघांनी एकमेकांना मग मंगळसुत्र घातले , शेवटी भांगेत कुंकू भरुन , लग्न संपन्न झाले , 
सगळेच खुश झालेत लग्न सोहळा बघून , बडे बाबू म्हणाले ,
सरजी आपण कालच भेटलोत आणि आज आम्ही तुमच्या लग्नाचे साक्षीदार झालोत , खुप आनंद वाटतोय , तुमची जोडी अशीच सात जन्म अबाधीत राहो ,
दादा तुमचे आशीर्वाद हवेच आम्हाला , पाया पडू द्या , लतिका वाकत म्हणाली , 
तसे मागे सरकत बडे बाबू म्हणाले , 
आम्ही लहान माणसं , आमच्या कशाला पाया पडता , 
असू द्या मॅडम ,
पण अवी म्हणाला तुम्ही सगळेच वयाने मोठे आहात , 
या आनंदाच्या क्षणी आमच्या घरचे कुणीच नाहीयेत आशीर्वाद द्यायला , 
आता तुम्हीच आमच्या जवळचे ,पाया पडू द्या आज आम्हाला ,
मग दोघांनी सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि चिंतामनने जेवण बनवून सगळ्यांना जेऊ घातले , ह्या सगळ्यातच दुपार ऊलटून गेली ,
आज तर आपण कार्यालयाला सुट्टीच दिली समजा ,, 
ऊद्या भेटूच , अवी ने बडे बाबूंना म्हंटले ,
सगळ्यांनी निरोप घेतला आणि अवी ने लतिकाला म्हंटले , चल आता आत , खुप गोष्टी विचारायच्या आहेत तुला ,
हो हो ,, चल बाबा ,, तुझे प्रश्न माहीत आहेत मला ! तरी सुद्धा विचार , चल !
दोघेही बेडरुम मधे आलेत , हं बोल तू आता ! आता मला सांग , कधी केलस हे सगळ ? मला वाटत तू सगळ ठरवूनच आलीस , हो ना ?
अरे हो , सांगते सगळ ,, घरुन निघताना अचानक मला मंगळसुत्र दिसल , तू मागच्या महीन्यात आणल होतस आणि तणतणत घरात फेकुन दिल होतस , आठवल ?
सोबतच तू अंगठी पण आणली होतीस ,
हो हो यार लते ,, हे डोक्यातूनच निघून गेल होत , 
बरं , आईने पण वेगळे दागिने तुझ्यासाठी बनवले आहेत , तेच माझ्या लक्षात राहीलेत , 
आणि मग लग्नाची तयारी कशी केलीस , आपल तर सगळे गेल्यावर ठरल लग्न करायच ,
हो रे ,, पण मी तर पुर्ण विचारच करुन आले होते , मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सारख्या रंगाचे कपडे घेतले होते , दिवाळीला मी तुला देणार होते , तेच कपडे मी इकडे घेऊन आले , 
आणि एवढे प्रश्न का विचारीत आहेस ? 
तुझी इच्छाच मला पुर्ण करायची होती अशी अचानकच ! म्हणूनच तू घरी यायच्या आत , मी राजू आणि चिंतामन ला सगळ प्लॅनींग सांगीतल आणि आजच आपल लग्न ठरवल मी , ह्यात तुला काही प्राॅब्लेम आहे का ? 
असेल तर सांग कॅन्सल करु आपण हे लग्न !
आॅ हा ! कॅन्सल म्हणे ! बघ ना नाकाचा शेंडा बघ कसा लाल झाला तुझा , रागात भलतीच गोड दिसतेस बुवा तू , 
चल जा , बोलू नकोस माझ्याशी , लटक्या रागाने लतिका म्हणाली , अस काय ग लते , आता तू कितीही रागावलीस तरी हा तुझा हक्काचा नवरा तुझे सगळे राग , लाड पुरवणार बरं का , बोलं तुला काय हवं , ह्या आनंदी क्षणाची केव्हापासून वाट बघत होतो , अश्या प्रकारे पुर्ण होईल स्वप्न , कल्पनाच केली नव्हती , अगं मला तर वाटल होतं , अजूनं दोन वर्ष आपलं लग्न होणे शक्य नाही , जादूच झाली सगळी ,लतिका चा काहीच प्रतिसाद नाही बघून तिच्या जवळ येत अवी म्हणाला , आता बघ मी तुला हसवण्यासाठी गुदगुदल्या करणार बरं ,
तशी हसून लतिका म्हणाली , पुरे हं अवी ,,, किती बडबड करतोस , काही वाटतं का तुला , लग्न झालय आपलं sss ! 
आणि किती टाईमपास करतोय तू , तुझ्या समोर मी लतिका ऊभी आहे ! निघ ना आश्चर्यातून , सुचक पणे त्याच्या डोळ्यात बघत लतिका गालातल्या गालात हसली ,,,आपल्या हातात त्याचा चेहरा घेऊन कपाळाचे चुंबन घेतले , शहारुन अवी गप्पच झाला ,,, मग हळूच तिला जवळ घेत म्हणाला , 
या आधी मीच तुझ्या जवळ यायच्या प्रयत्नात असायचो आणि आज तर तू , मगं ! लायसन्स मिळालय मला हक्काचं , 
गळ्यातील मंगळसूत्र त्याला दाखवत लतिका गोड हसली ,
मग काय दोघांच्याही मनात एकच गाणं वाजत होतं रात्रभर , 
" दो दिल मिल रहे है , मगर चुपके चुपके " !
सकाळी पक्षांच्या आवाजाने अवी ला जाग आली ,
खिडकी ऊघडी होती , लतिका खिडकीतून बाहेर किलबिल करणार्‍या पक्षांना बघत होती , तिची आंघोळ झाली होती , आज तर तिने सुंदर शी साडी घातली होती , केसं सुद्धा ओले होते तिचे आणि खुपच गोड दिसत होती ती , 
अवी तिचे निरीक्षण करत होता तेव्हढ्यात तिचे लक्ष अवीकडे गेले , अरे ऊठलास ! गोड हसत ती अवीजवळ आली ,
झाली ना झोप ?अवी ने प्रतिप्रश्न केला , माझी तर झाली ,, तुझी,,,, ? तू का ऊठलीस लवकर ? 
चल ये झोप अजून , तिचा हात ओढत अवी म्हणाला ,
ए बाबा थांब तू ! 
साडे नऊ वाजलेत आता , ऊठ तयार हो !
तीनच दिवस झालेत इथे येऊन तुला ,
तुझ्या मागे कामे भरपूर आहेत , 
क्रमशः