स्वप्नांजली.5

It is a continuous novel !! but due to the limitations of words, it is presented in parts, reveals the story of mystry in lives of two youngs in love,with interestig twists....

मग भानावर येत अवी म्हणाला , खरचं ना !
अरे पुन्हा तेच , जा , मला नाही बोलायच यावर काही ,
ती बाहेर जायला निघाली तसे तिचा हात पकडून तिला आपल्याकडे वळवत , अवी तिच्या समोर गुडघ्यांवर खाली बसला , मग तिचा हात हातात घेऊन म्हणाला will you marry me ? 
चकीत होत लतिका लाजून लगेच yesss म्हणाली !
बरं ! आता तर , तुला हक्काने जवळ घेऊ शकतो ना ?
नाही,, अजीबात नाही ,, लग्ना नंतर ,,ऊद्या ,
बरं चल मी पण झोपते आता , दुसरी बेडरुम साफ करुन घेतली होती मी , तिथे झोपते , सकाळी लवकर ऊठून लग्नाची तयारी करायची आहे , बेडरुमचं दार ऊघडत लतिका म्हणाली ,
बरं बाबा ,, ठिक आहे , जा झोप लतिका , गुडनाईट ! अगं अगं लतिका ते तुझ्या आवडत्या गायिकेच , आशाताईंच गाण म्हणना , अरे ! आत्ता ? हो , नाहीतर मी तुला जाऊ नाही देणार झोपायला , बरं , म्हणून लतिका गुणगुणायला लागली , 
" कतरा कतरा मिलती है ! कतरा कतरा जीने दो ! जिंदगी है sssजिंदगी हैsss बहने दो ss बहने दो ss प्यासी हुँ मै प्यासी रहने दोssरहने दोsss " गाण म्हणत त्याला फ्लाईंग किस देत , त्याची झोप ऊडवून लतिका दुसर्‍या बेडरुम मधे झोपायला गेली .
दोघेही मग दुसर्‍या दिवशी काय आणि कस सगळ मॅनेज करायचं तो विचार करतच झोपी गेले .
ऊद्या लग्न करायचं ह्या कल्पनेनेच त्याला शहारुन येत होतं , फायनली माझी लतिका आता माझी होणार , कधीचं स्वप्न बघतोय तिचे मी , माझ पहील आणि शेवटच स्वप्न आहे ती , तिच्या शिवाय कल्पनाच करु शकत नाही मी , चला मग ऊद्या काही दागिने इथे मिळाले तर बरं होईल किमान अंगठी तरी , बाकी दागिने तर घरी आहेत , गावात एक मंदिर दिसल होत , तिथेच करता येईल मग लग्न , मग मोठ्यांने स्वतःशीच बोलला , चला झोपा आता अविनाशराव , कल घोडी चढना है । जल्दी ऊठना पड़ेगा भैया sss एकटाच आनंदाने हसला आणि झोपायचा प्रयत्न करु लागला .
सरजी अहो सरजी , सोबतच दारावर पडलेल्या थापेने त्याला जाग आली , अवीने खिडकीतून बाहेर बघीतले , चांगलच ऊजाडल होत , पुन्हा दारावर टक,,टक,, झाल्यावर त्याने आवाज दिला , हो ,, ऊठलोय , येतो येतो ,
त्याने दार ऊघडले तर समोर राजू गरम पाण्याची बादली घेऊन ऊभा होता , सरजी गरम पाणी आणल आहे , मॅडम म्हणतात लवकर तयार होऊन बाहेर या , 
अरे,, अच्छा,, विसरलोच मी , आत्ता तयार होऊन येतो , चहा तयार ठेव , आलोच !!!
आता अवीचा ऊत्साह बघण्यासारखा होता , झटपट आंघोळ करुन तो बाहेर आला तर , छानसा निळा कुडता पायजामा पलंगावर ठेवलेला होता , अच्छा तर ही आधीच घेऊन आली माझ्यासाठी , मनोमन आनंदून , त्याने कपडे घातलेत , मस्त मंद अत्तर लावून , तयार होऊन तो हाॅल मधे आला , त्याने लतिकाच्या बेडरुम कडे बघीतले , दार ऊघडे होते पण तिची चाहूल लागली नाही , त्याने स्वयंपाकघरात बघीतले कुणीच नव्हत तिथे , अरेच्चा कुठे गेलेत सगळे , 
अगं लतिका कुठे आहेस , आपल्याला खरेदी साठी जावे लागेल ना , ये बर बाहेर , अरे , कुठे आहेस sss असे म्हणत अवी बाहेर आला आणि पुढच दृश्य बघून तर आश्चर्यचकीतच झाला , 
हे काय sss कधी केलत तुम्ही , कस काय !
छानसा छोटा शामीयाना टाकलेला होता , लग्नासाठीची पुर्ण तयारी केलेली होती तिथे , एक भटजी होम हवन ची तयारी करत होते आणि दिनानाथ , राजू , चिंतामन , बडे बाबू , वामन आणि बाबू , सगळे कामात गर्क होते , 
अरे मला कोणी सांगणार का , हे सगळ कधी केलत , 
मला तर कळलच नाही , कोणी एवढी तयारी केली ,
अवी आश्चर्याने त्यांना बघत म्हणाला ,
बडे बाबू म्हणाले , लतिका मॅडम नी कालच राजू आणि चिंतामनला सगळं सांगितल होतं , 
त्यांनी मग दिनानाथला सांगितले आणि सकाळी आम्ही सर्व तयारी निशी इथे आलोत , 
आणि सरजी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना ही आम्ही बोलावलं आहे , म्हणजे लतिका मॅडम नी सांगीतले म्हणून बरं का सरजी ,
हो का , अवीला तर सगळी गंम्मतच वाटतं होती , 
बरं मग लतिका मॅडम कुठे आहेतं ?
त्या बस तयारच आहेत , त्या बघा येत आहेत , बडे बाबूंनी दाराकडे इशारा केला , 
दारात लतिका ऊभी होती , 
अवी तर डोळे विस्फारुन तिचे अलौकिक सौदर्य निहारीत राहीला भान हरपून , 
किती सुंदर दिसत होती लतिका निळ्या गडद रंगाच्या साडी मधे , लांबसडक केसांची तिने वेणी टाकली होती , वरुन मोगर्‍यांचा गजरा माळला होता , 
लाल लिपस्टिक , डोळ्यात काजळ , मोठी लाल बिंदी कपाळाच्या मधोमध शोभून दिसत होती , सुंदर निळ्या खड्यांचे मोठे गोल कानातले , त्याच्याशी मॅचींग खड्यांचाच हार , निळ्या खड्यांच्या मोठ्या बांगड्या आणि मधे काचेच्या हिरव्या बांगड्या , दोन्ही हाताच्या बोटात मोठ्याला दोन अंगठ्या , 
अवीची नजर लतिका वरुन हटत नव्हती ,
त्याला तस बघताना बघून लतिका लाजतच त्याच्या जवळ आली आणि इकडे तिकडे बघत तिथे घुटमळली , 
तरी अवी भानावर आला नाही , 
मग हळूच तिने त्याला आवाज दिला अवीssअवीss 
बापरे किती सुंदर दिसतेस लतिका तू !
लतिका अजूनच लाजली , हळूच त्याच्या कानाशी येऊन म्हणाली , अरे अवी आॅफीस स्टाफ आहे ना इथे , कसा करतोस , भानावर ये बघू , 
मग सगळ्यांना तिने नमस्कार केला , तेव्हढ्यात गावातून काही लोक आलेतं , सरपंच अवीला म्हणाले , हे तर फारच छान झाल सर जी , इथे येऊन तुम्ही लग्न करत आहात , 
हो ते अचानकच आम्ही ठरवले , आणि बघा ही तयारी पण झालीय , अवी हसतच म्हणाला , तेव्हढ्यात भटजींनी त्यांना आवाज दिला , चला वर वधू या इथे , लग्नाला सुरुवात करुया ,
क्रमशः

🎭 Series Post

View all