Login

स्वप्नांजली.3

ही पुर्ण एक सलग कादंबरी आहे , शब्दांच्या मर्यादेमुळे काही भागांमधे विभागून तुम्हाला वाचायला म?

तेव्हढ्यात दिनानाथने आवाज दिला ,सर जी चहा तयार आहे , 
हो आलोच ! बाहेर येत अवी म्हणाला , अरे पाणी वगैरे गरम कसं एवढ , मला हिटर तर दिसलं नाही , हो सरजी गाडीचा आवाज लांबूनच येतो , चूल बाहेरची पेटलेलीच होती , पाणी आधीच गरम केल होत आणि ठेवल होत बाथरुम मधे चिंतामन म्हणाला ! अरे वा छानच , आणि हो चहा फार छान झालाय ,
स्वयंपाक तयार आहे सर जी , बरं वाढा मग , दमलोय बुवा मी , आज लवकरच झोप येईल मला , मग जेवणं झालीत , ड्रायव्हर आणि खानसामा रायगडला परत गेलेत , राजू बंगल्यावरच थांबला , अवी पलंगावर आडवा झाला ,, मनात विचार आला ,, लतिका हवी होती इकडे ! चला पण काहीच हरकत नाही , मी ना घरी गेलो की तिला सुट्टी काढून इकडे काही दिवसांकरीता घेऊनच येतो , मनोमन ठरवून मग लगेच अवी गाढ झोपी गेला
सकाळी पक्षांच्या किलबिल ने अवीला जाग आली , पक्ष्यांचा कलरव कानांना आल्हाददायक वाटत होता , आळोखे पिळोखे देत अवी खिडकीतून बाहेर बघू लागला , झाडावर पोपटांचा थवा बसला होता , एवढ्या मोठ्या प्रमाणात पोपट तो पहील्यांदाच बघत होता , तेवढ्यात दारावर थाप पडली , टक
टक ! कोण ? सर जी मी राजू ! ऊठलेत का तुम्ही ? हो ऊठलो ! बस येतोच बाहेर ! मग अवी ने दात घासलेत , प्रातःविधी ऊरकवून तो हाॅल मधे आला , राजू चहा आण ! हो सर जी , आतून आवाज आला ! चिंतामण ने बनवलेला चहा सोबत बिस्किट एका ट्रे मधे ठेऊन राजू बाहेर आला !अरे वा ! बिस्किट पण आणलेत ! हो सरजी ! ड्रायव्हर दादा घेऊन आलेत !
एवढ्या लवकर आलेत पण , अवीने घड्याळ बघीतली ,
साडेआठ वाजले होते ! अच्छा म्हणजे मी आज एक तास ऊशीरा ऊठलोय ! कालच्या प्रवासाने जरा थकलो होतो पण तरी सुद्धा मला नवल वाटतेय की मी लवकरच ऊठलो ! अवी मनातल्या मनात बडबडला ! चल मी आंघोळ करतो , गरम पाणी आण ! हो सरजी चला तुम्ही , आणतो लगेच पाणी ! मग राजूने गरम पाणी आणून दिले , छान आंघोळ करुन अवी तयार झाला , चिंतामन ने पोहे , चना बनवलेला होता , तो खाल्यावर अवी म्हणाला , चला आज जरा परीसर बघून येतो ! मग ठरवतो काम कसे करायचे ते ! स्वतःशीच बोलत तो बाहेर आला ! बाहेर ड्रायव्हर गाडी पुसत होता , चला दिनानाथ जरा
परीसरात फेर फटका मारु , आणि मग आॅफीस मधे जाऊ , 
हो सर ! चला , अवी ने जीपचे दार ऊघडले , तो आत बसणार तेव्हढ्यात दिनानाथ म्हणाले , अहो सर जी , परीसरात पायीच फेरफटका मारता येईल , गाडीची गरज नाही !
आणि हो टाॅवरसाठी जागा बघायला जायचे असेल तर दाट जंगलातून समोरच्या टेकडी कडे जावे लागेल आपल्याला आणि ते पण बैलगाडीची व्यवस्था करावी लागेल , जीप वर पर्यंत नेता येणार नाही सर जी ! अरेच्चा हो का ! कठीणच आहे बुवा ! पण ठिक आहे अशक्य शक्य करुन दाखवायचे आहे ,
मग असे करुया आता आॅफीसमधेच जाऊया तिथून मग जेवढे जीप नी फिरता येईल तेवढे फिरुया ! बरं ठिक आहे सर जी !
एव्हाना पावणे दहा वाजले होते , रायगड मधल्या छोट्याश्या गावात एका छोट्याश्या घरात आॅफीस थाटलेले होते , तीन टेबल आणि खुर्च्या , एक बाबू आणि बडे बाबू , चपराशी वामन आणि ड्रायव्हर दिनानाथ . 
अवी च्या स्वागताची तयारी बडे बाबूंनी केलेली होती , तिथले सरपंच , पोलीस पाटील आणि काही गावातील प्रतिष्ठित मंडळी आधीच येऊन बसले होते , फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले अवीचे , सर्वांशी ओळख करुन दिली दिनानाथ ने , सरपंच अवीला म्हणाले बर होईल इकडे टाॅवर तयार झाला तर , तुमच्या शहरातल्या सारखे मोबाईल , फोन येतील गावात , तर दुरच्या लोकांसोबत बोलता येईल , माझी मुलगीच मुंबईला राहते तिच्याशी बोलता येईल आम्हाला , साहेब तुम्हाला कुठलीही मदत लागली तर बिनदिक्कत सांगा ! हो नक्कीच सांगतो , छान वाटल तुम्हाला भेटून , मग जरा गावातील माहीती घेतली अवीने नंतर तो म्हणाला आता जरा निसर्ग सौंदर्य बघून येतो ! जंगलात फेरफटका मारतो , चला दिनानाथ , हो सर म्हणत दिनानाथ बाहेर आला , बडे बाबू म्हणाले मी येतो आणि वामन तू ही चल सोबत , मग चौघेही जीप मधे बसलेत आणि जीप निघाली जंगलाकडे , रस्ता खुपच दगडांनी भरलेला ऊबड खाबड होता , खुप झटके पडत होते , तरी सुद्धा पाचेक किलोमीटर आत जंगलात ते गेलेत , उंचच उंच सागवानाचे झाड त्यावर मधमाशांचे मोठे मोठे पोळे , पक्षांचा आवाज विविध जातींचे झाड फळझाड , मधेच नीलगाय दिसली अवीला , अवी तर खुशच झाला तिथले निसर्गसौंदर्य बघून ! आता पर्यंत कुठे आपण माणसांनी गजबजलेल्या मायानगरीत राहत होतो आणि कुठे ही भयाण शांतता , अगदीच विपरीत ठिकाणी आलोत आपण , खरेच परिवार इथे असायला पाहीजे सोबत ,,,, मी ना आता गेलो की लतिकाला घेऊनच येतो ,,, पण आली तरी ती सध्या कायमची माझ्या जवळ राहणे शक्य नाहीये , त्याच्या नजरे समोर लतिका दिसायला लागली ,, चाफेकळी नाक , उंच , बांधेसुद , टपोरे डोळे , लांब घनदाट केस , निमगोरी लतिका कुणालाही आवडेल अशीच होती ,
सर ते बघा हरीण ,, बडे बाबूंच्या आवाजाने अवीची तंद्री भंग झाली , कुठाय हो ? ते बघा तुमच्या ऊजव्या बाजूला , बडे बाबूंनी त्या दिशेने बोट दाखविले ,गाडीच्या आवाजाने हरीण दूर पळाले , अवीला फक्त झलक दिसली तरी सुद्धा अवी आनंदी झाला , दिवसा इतक सुंदर दिसणार जंगल , रात्री किती भयाण वाटत हो ! अवी बडे बाबूंना म्हणाला ,
हो सर , पण इकडच्या लोकांना आणि आम्हालाही सवय झाली आहे आता , तस भीतीदायक इकडे काहीच नाही निश्चिंत राहा सर , बर सर जी जेवण राहील तुमच , दिनानाथ म्हणाला , अरे नाश्ता झाला बंगल्यावर आणि आॅफीसमधे ही नाश्ता झाला , तशी जास्त भूक लागली नाही मला , रात्रीच जेवतो आता , आता साडे चार वाजलेत , चला परत फिरुया , हो सरजी ,
क्रमशः

🎭 Series Post

View all