स्वप्नांजली.1

It is a continuous novel !! but due to the limitations of words, it is presented in parts, reveals the story of mystry in lives of two youngs in love,with interestig twists....

अरे अवी एवढ्या लांब कशाला जातोस , सोड बरं ती नोकरी , आता कुठे ताळमेळ बसला होता आपला ! लतिका लटक्या रागाने अवी ला म्हणाली ,
तिला जवळ घेत अवी म्हणाला , अच्छा म्हणजे मी नोकरी सोडू आणि मग तुझ्या मागे मागे फिरु ! नाही का ? 
लाजतच लतिका म्हणाली , मी कुठे अस म्हंटल ! नोकरी गरजेची आहेच पण मग मला नाही ना येता येणार तिकडे ! नाही अस काही नाहीये , चल तू पण चल , 
आपली मिठी अजूनच घट्ट करत अवी म्हणाला ! 
असं कसं येणार मी , अजून लग्नगाठं बांधायची राहीली आहे आपली म्हंटल ! 
मग कोणी अडवले आहे ? मी मागच्या महीन्यातच म्हणालो होतो लग्न करुन टाकूया , 
तुझ्याच आपल्या सतराशे साठ अडचणी सांगतेस ! 
तिला मिठीतून मुक्त करत थोड्या रागानेच अवी बोलला , त्याच्या जवळ येत त्याचा हात हातात घेऊन लतिका म्हणाली , अवी तू माझी परिस्थिती जाणतोस , बाबा गेल्यावर कमावती मीच आहे घरात , बस हे शेवटच वर्ष आहे राघवच , त्यालाही जाॅब ची आॅफर आहेच , बस तो नोकरीला लागला की मेघा आणि आईची जबाबदारी घेईल , मग मी मोकळी , लगेच आपण लग्न करु ! 
पण अवी जरा रागातच दिसत होता , त्याच्या गळ्याभोवती हाताचा विळखा टाकत डोळ्यात बघत लतिका म्हणाली , 
अरे असा काय रागावतोस अवी , मला नाही आवडत तुझ्यापासून दूर राहणे , बालपणीचे मित्र आपण , एकदुसर्‍यांशिवाय जगूच शकणार नाहीये आपण , माझ्या कठीण प्रसंगात तू माझ्या पाठीशी राहीलास आणि आता आपली एकत्र यायची वेळ जवळ आली आहे तर माझी साथ सोडू नकोस , तू असा रागावलास तर मला जगणे कठीण जाईल अवी ! 
लतिका खुप भावविव्हळ झाली होती , तिच्या पाणावलेल्या डोळ्यात बघताच अवी वरमला ! 
तिच्या कपाळाच चुंबन घेत तिला कवेत घेऊन म्हणाला , समजतो गं तुला ! माझ प्रेम मतलबी नाहीये , पण कधी कधी वाटत ना माणसाला ! 
मी तुझ्या परिवाराची जबाबदारी ऊचलू शकतो , पण तू मला अस करु देत नाहीयेस ,
मी पण तुझ्या भावना समजू शकते अवी , माझ्या परिवारा साठी तुझी मदत घेतली असती तर मी माझ्याच नजरेतून ऊतरली असती , पण मी कमावू शकते ना ! तर का नाही ? 
हो गं माझी झाँसी ची रानी ! ठिक आहे तो इश्यू नाहीये ! मी सदैव तुझाच आहे ! मी कुठेही असू दे , चार वर्ष थांबलो अजून एक वर्ष सही ! 
तेवढ्यात दारावरची घंण्टी वाजली , लतिकाने दार ऊघडले , अरे अवी तू कधी आलास ? घरात येत लतिकाची आई म्हणाली , 
लतिकाची आई आणि अवीची आई सोबतच आल्या बाहेरुन . मला येऊन एखादा तास झाला असेल काकू , 
तुमच देवदर्शन कसं झालं ? 
अरे बाबा खुपच गर्दी होती आज , गुरुवार ना ! मधेच अवी च्या आई रमाबाई बोलल्या ,
अगं सुशीला ! बघ गं त्या जंगली एरिया मधे बदली झाली ह्याची , तिथे काय सोय असेल माहीत नाही , डोंगराळ भाग आहे गं , रस्ते ही बनलेले नाही आहेत तिकडे ! कसा राहील ,
कसा जाईल काय माहीत ! 
हो का गं रमा ! बदली झाली ते लतिकाने सांगीतले पण अश्या दुर्गम भागात झाली हे नव्हत माहीतं .
कस मग अवी बेटा ! काय करणार आहेस ? सुशीलाबाईंनी अवीला विचारले .
अहो काकू आणि आई तुम्ही काही चिंता करु नका , तिथे एक घर आहे राहायला आणि गाडी , ड्रायव्हर , स्वयंपाकी वगैरे आहेत तिथे , 
गावापासून दोन किलोमीटर आत जरा दाट जंगलात आहे घर , पण गाडीसाठी कच्चा रस्ता आहे तिकडे , बीएसएनएल च्या टाॅवर ऊभारणी साठीच नियोजन करायचे आहे , पुढे तिकडे काॅर्टर्स वगैरे पण तयार होतील , सगळ्या सोयी होतील मग तुम्हा सगळ्यांना घ्यायला येईन मी , एवढं चिंता करण्यासारखे काही नाही , निश्चिंत राहा ! 
तुम्हा दोघांच लग्न झाल असतं तर बरं झाल असतं दोघे सोबत राहीले असते , पण आमच्या मुळे लतिकाही बांधल्या गेली आहे , भगवंत माफ कर आम्हाला ! सुशीला बाई बोलता बोलता हळव्या झाल्या .
अवीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना म्हंटले , अहो काकू ते तिच कर्तव्य आहे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका , मला काहीच प्राॅब्लेम नाही , चला आता आपण रात्रीचे जेवण बाहेर जाऊन करु , माझी पुर्ण पॅकींग झाली आहे , ऊद्या सकाळीच मी अलीगड साठी निघतोय ! 
मग सगळे तयारी करुन बाहेर जेवायला गेलेत , ती संध्याकाळ त्यांची खुपच आनंदात गेली ! रात्री ऊशीरा अवी आणि त्याची आई घरी गेलेत .
अवी आणि लतिका एकाच मोहल्यात पण दहा बारा घरा आड राहणारे , सुशीलाबाई आणि रमाबाई मैत्रिणी म्हणून दोनही घरे अवी आणि लतिका साठी खुश होते , 
पण लतिकाचे बाबा एका अपघातात अचानक गेल्या मुळे लहान भाऊ बहीणीची जबाबदारी तिच्यावर आली , अवीचे बाबा ही मेंदूज्वराने गेले होते अवी इजिनीयरींग च्या शेवटच्या वर्षाला असताना , 
लतिका सायन्स ग्रॅज्यूएट आणि अवी इंजीनियर लहानपणीच्या मैत्रिचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते त्यांचे त्यांना पण कळले नाही !
क्रमशः

🎭 Series Post

View all