लगेच भार्गवी म्हणाली , मावशी बसा , बस आटोपलीच पुजा , रमाबाई तर खुशच झाल्या त्यांना बघून आणि अंजली पुजा सोडून आनंदाने धावतच त्यांच्याकडे झेपावली , तसे भटजी ओरडलेच , अरे पुजेतून ऊठू नकोस बेटा , ये बस , तशी लगेच अंजली पुजेत बसली , थोड्या वेळात पुजा आटोपली , भटजी गेलेत , अंजली ऊठून सुशीला बाईंच्या मांडीवर बसली ,
अग बाई माझी गुणाची गं बाई , खुप उंच झालीस गं ,
हो मग मी अजून मोठ्ठी झाले ना आज !
हो ग राणी खरेच खुप मोठी झालीस ,
बर राघव नाही आला ? आणी मेघा ही नाही आली?
कौतुकाने सुशीलाबाई अंजली कडे आणी रमाबाई कडे बघायला लागल्या , मग म्हणाल्या काही वाटतं का तुला ,
त्यांचे सरळ नावच घेते ,
मावशी आणी मामा म्हणायचं त्यांना , समजल का ?
आज तुझा वाढदिवस आहे म्हणून रागवत नाही तुला ,
आज माफ केलं , आणी सगळेच हसायला लागले ,
चहापानी दिल्यावर भार्गवी स्वयंपाक घरात गेली जेवण बनवायला , आणि तिघेही गप्पा करत बसलेत हाॅल मधे , विमलबाईही जेवणाची तयारी करायला आल्या एव्हाना , भार्गवी आणि बाई मिळून स्वयंपाक करायला लागल्या ,
ह्यांना ही बोलावल का ? सुशीलाबाईं कडे इशारा करुन विमल म्हणाली ,
हो मग काय ? त्रासीक पणे बाई कडे बघत भार्गवी म्हणाली , कमाल आहे ताई तुमची ,
ह्यांच्या मुलीचा फोटो काय तुमच्या घरात ,
आणि आई पण घरातलीच जशी काही !
बर बाई तुम्ही जास्त काही बोलू नका ,
माझा मूड खराब करु नका , अजून माझ्या मैत्रिणी पण परिवारासोबत येणार आहेत , तेव्हा कामाला लागा ,
हो ताई त्याच साठी आली ना मी ,
तुम्ही खुपच चांगल्या आहात ,
कोण नाहीतर नवर्याच्या मैत्रिणीचा फोटो घरात लावू देईल आणि तिच्या आईला कोण घरात येऊ देईल ,
खुपच चांगल्या आहात ताई तुम्ही ,
बर तुम्ही पीठ मळा आधी , तो पर्यंत मी भाजी करते म्हणत तिचे बोलने मधेच खंडीत केले भार्गवीने .
इकडे स्वयंपाक सुरु होता , तिकडे अंजली सोबत सुशीलाबाई अवी आणि रमाबाई बोलण्यात , खेळण्यात मग्न होत्या , थोड्यावेळाने भार्गवी च्या तीन ही मैत्रिणी परिवारासोबत आल्यात , त्यांच्या पाठोपाठ वैभवीची आई ती पण आता भार्गवी ची मैत्रिण झाली होती , ती ही आली , मग काय एकच गडबड गोंधळ घरात , अंजली आपल्या मैत्रिणींन सोबत खेळायला लागली , पुरुष मंडळी अंगणातील खुर्चीवर बोलत बसलेत आणी भार्गवीच्या मैत्रिणी तिला मदत करायला किचनमधे गेल्यात ,
भार्गवी तर आनंदून गेली होती मैत्रिणींना बघून ,
जिकडे तिकडे गडबड , ऊत्साहाच वातावरन , त्या सगळ्यांना आनंदी बघून रमाबाई सुखावल्या ,
चल सुशीला आपण माझ्या बेडरुम मधे बसू म्हणत त्या दोघीही बेडरुम मधे गेल्या .
शिला हळूच भार्गवीला म्हणाली , का ग ह्या मावशी पाहीजेच नाही का प्रत्येक आनंदाच्या क्षणी तुझ्याकडे ,
हो ना तिच्या लाडक्या सवतीची आई ना ! मग का नको , सुमती हसत म्हणाली , ऐ तिला विनाकारण चिडवू नका ,
बाय दि वे , मानाव लागेल तिला , अजूनही तुझ्या नवर्याला कह्यात ठेवलय तिने ! खट्याळपणे हसत विभा म्हणाली ,
तश्या सगळ्याच फिदी फिदी हसायला लागल्या ,
आता मात्र भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं ,
तुम्ही माझ्या मैत्रिणीच नाहीये ! जा मला नाही बोलायच आता तुमच्या सोबत , तुम्ही ही चिडवा मला ,
म्हणजे आमच्या व्यतिरिक्त कुणी चिडविले तुला ?
मुद्दाम रागात आल्या सारखी सुमन बोलली ,
ह्या विमल बाई गं , सदानकदा फोटो चाच ह्यांचा प्राॅब्लेम ! अस्स का , आणि तुला ? तुला नाही का प्राॅब्लेम ?
तू ना शिला , मला रडवच ! खरेच ती खाली बसून रडायला लागली , तश्या सगळ्याच चपापल्या ,
हे काय भलतच झालं ! नेहमी अशी गंम्मत केली की भार्गवी हसण्यावारी न्यायची , आणी आज का अशी रडते ?
त्या विचारात पडल्या , सुमती तिला म्हणाली काय झाल रडायला , अवी काही बोलला का तुला ?
तेच तर ना ! तो मोकळेपणाने बोलतच नाही ना माझ्या सोबत , तो आणी अंजली हेच त्याच विश्व आहे ,
अगं चांगल आहे की , तुझी मुलगीच आहे ना ती ?
बापलेकीचा फारच जीव आहे एकमेकांवर ,
हो गं मी का त्या दोघांची वैरी आहे का ? मला ही आवडते त्यांची गट्टी , पण मी बायको आहे ना !
मग माझा अधिकार तर मला मिळायला पाहीजे ना ?
म्हणजे काय गं ? आता चौघी ही तिच्या अधिकच जवळ आल्या आणी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघायला लागल्या ? लगेच शिला विमल बाईंना म्हणाली ,
बाई तुम्ही जरा हाॅल आवरुन घ्या जेवण टेबलवर ठेवा बरं आम्ही थोडावेळ भार्गवीशी बोलतो , मग आपण जेऊ !
बाई समजली ह्यांना आपल्या समोर काही बोलायचे नाही आहे , त्या लगेच म्हणाल्या ठिक आहे , जा बसा तुम्ही ,
मग सगळ्या भार्गवीच्या बेडरुम मधे तिला घेरुन बसल्या ,
बोल आता , काय झालं , सगळ सांग तू आज आम्हाला ,
नेहमी ह्या विषयावर बोलतच नाही , मनात नको ठेऊस बोल , अगं काही नाही गं , काय सांगू तुम्हाला , अवी घरात असला तरी असं वाटत तो दुसराच कुणीतरी आहे ,
नेहमी एक अंतर ठेऊन ,
मोकळे पणाने कोणत्याच विषयावर बोलत नाही ,
सतत आपला आॅफीसच्या कामात असतो नाहीतर आई आणी अंजली सोबत , न चुकता दोन तीन दिवसाआड सुशीला मावशीला भेटायला जातो ,
माझ्या साठी तर वेळच नाही त्याला ,
मुद्दामहून दुर्लक्ष केल्या सारख वाटत मला आणी भार्गवी हमसून हमसून रडायला लागली ,
तिला कसे बसे शांत करुन , शिला म्हणाली ,
पण मला सांग , सुशीला मावशीला मुलगा मुलगी आहे ना ?
हो गं आहे ना राघव , पण तो गेला फाॅरेनला तिकडेच त्याने लग्न केले फाॅरेनरशी , इकडे यायला नाहीच म्हणतो ,
अगं मग मुलगी पण आहे ना ?
हो ती मागच्या वर्षीच जाॅब ला लागली , तिच्या कंपनीतल्याच मुला बरोबर लग्न केले तिने आणि लगेच केरळला गेली ,,,
ती मावशीला तिकडे बोलावते पण हिला नाही जायचे ना तिकडे , इथे त्यांच्या घरात लतिकाची आठवण आहे म्हणतात ! एकटीला इथेच राहायचा भारी शौक आहे ,
अवी आहे ना लक्ष द्यायला मग कशी जाणार ,
मधेच सुमन रागाने बोलली ,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा