स्वप्नांजली.12

It is a continuous novel !! but due to the limitations of words, it is presented in parts, reveals the story of mystry in lives of two youngs in love,with interestig twists....

अगं अंजलीला त्याला भेटायच होत , म्हणून पटकन आलोत घरी , अरे अंजली कुठाय ? सोबत आत आलेल्या अंजलीला तिथून नदारत बघून आई , इकडे तिकडे बघत म्हणाल्या, आताच तर आम्ही सोबत आलोत , 
अग्गं आज्जी मी पप्पांना फोन लावते , 
मम्मीचा मोबाईल आणायला बेडरुम मधे गेले होते , 
अग्गं बाई गुणाची माझी बाळ , रमाबाई कौतुकाने तिच्याकडे बघत म्हणाल्या , 
तुला कस माहीत मोबाईल बेडरुम मधे होता म्हणून , भार्गवीने विचारले ,
मम्मी मीच तर मघाशी चार्जींगला लावला होता तुझा मोबाईल , अच्छा ! हो गं ,,,
बरं जेवतेस का ? 
नाही थोड्या वेळाने आज्जीसोबत जेवणार ! 
बर बाबा ,, ठिक आहे , 
चला मी बाकी काम बघते , तू गेटच्या बाहेर जायचे नाही , पप्पांसोबत बोलून लगेच ठेवशील फोन , आणी हाॅलमधेच खेळत बस , 
बरं मम्मी , म्हणत तिने अवीला फोन लावला , 
पण त्याने फोन ऊचलला नाही , 
मग अंजलीने कपाटावर ठेवलेला तिचा मोठ्ठा टेडीबीयर जवळ घेतला आणि टिव्ही सुरु करुन सोफ्यावर बसली , 
भार्गवी आणी अंजली बोलत असताना रमाबाई आपल्या बेडरुम मधे गेल्या आणि तिथून त्यांनी भटजींना दुसर्‍या दिवशी पुजेसाठी बोलावले , 
सोबतच सुशीलाबाईंना फोन लावला , 
हॅलो,, सुशीला ,कशी आहेस ? 
मी ठिक आहे गं , तू बोल , कशी आहेस ? 
हो ग मी पण छानच ! 
काय नेहमी नेहमी कंम्बरेच गार्‍हाण सांगत बसायच , 
मजेतच आहोत म्हणायचे ! सुशीला बाई हसतच म्हणाल्या ,
हो बाई खरेच ,आता ते दुखण सांगायलाही बर वाटत नाही , 
बर तू कसा काय केला फोन ? घरी सगळ ठिक ना ? काळजीच्या सुरात सुशीलाबाई म्हणाल्या ,
हो सगळ ठिक आहे , 
ऊद्या तू अंजलीच्या वाढदिवसाला आलीस , 
की अजूनच ठिक वाटेल मग ! 
हसून रमाबाई म्हणाल्या , 
अरे हो , अंजलीचा वाढदिवस ऊद्या , येते हो , 
सुशीला सकाळीच ये , पुजा ठेवली आहे , 
बरं ठिक आहे , लवकरच येते मी , मग बोलू सविस्तर , 
चल मला स्वयंपाक करायचा आहे , 
बर ठिक आहे , ये मग , रमाबाईंनी फोन ठेवला , 
चला झालीत महत्त्वाचे दोन कामे ! आता जाते जेवायला !
ऐ अंजली चल जेवण करु , हो आज्जी ,सोफ्यावरुन खाली ऊतरत अंजली म्हणाली , 
बापरे , माझी बाई तर बरीच मोठी झाली , 
अगं भार्गवी ऐकतेस का , 
हो आई बोला , 
तुझी मुलगी आत्ता बातम्या बघत होती , 
हो का ! 
अहो तुम्हाला सांगायचच राहील , 
काल तर ही म्हणाली तिला आशा भोसलेंचा आवाज आवडतो आणि चक्क मोबाईल मधे ती आशाजींचे गाणे ऐकत होती , हसून भार्गवी म्हणाली , दोघी ही खुप कौतुकाने अंजलीकडे बघत होत्या , 
मग तिघींनीही जेवण केलं , 
थोड्या वेळाने अंजली , आज्जी सोबत बेडरुम मधे आराम करायला गेली , आणि भार्गवीने सगळा पसारा आवरायला सुरुवात केली , चला आता ऊद्या जेवायला काय काय करायच ? असे करते अंजलीच्या आवडीचेच पदार्थ बनवते , 
तिच्या काही मैत्रिणी बोलावते , कुणाला बोलवायचे बरे , शामल , मोयना , वैभवी , बरखा आणि ,,,, कोण ?
अरेच्चा एवढ्याच तर आहेत तिला आवडणार्‍या मैत्रिणी ,
ह्या पोरीला ना , मैत्री करायची हौसच नाही मुळी , 
बस पप्पा असले की झाली खुश , 
बरे झाले माझ्या मैत्रिणी इथेच असल्यामुळे त्यांच्या मुली हिच्या मैत्रिणी झाल्यात , वैभवी सोडली तर तिघी ही तिच्या मैत्रिणीच्याच मुली , 
असे करते त्यांना परिवारा सकट ऊद्या बोलावते , 
त्या निमीत्ताने भेटी होतील , मज्जा येईल ,
तेवढ्यात विमल बाई कामाला आल्या , 
अरे वा छानच झाल तुम्ही आल्यात लवकर , 
हसून भार्गवी म्हणाली ,
कशी नाही येणार ! तुम्ही बोलावल्यावर !
ही विमल बाई म्हणजे तिच्या आईकडे आधी पासून घर काम करायची , भार्गवीच्या आईचे विमल बाईशी छान पटायचे , बाईला भार्गवी तर आपली जवळचीच वाटायची , ती आई प्रमाणेच विमल बाईला नेहमीच अडीअडचणीत मदत करायची , म्हणूनच विमल बाई तिच्याशी मोकळे पणाने बोलायची , कॅन्सर ने आई गेल्यावर जवळची म्हणजे विमलच होती , तिच्यासाठी ! भार्गवीचेही वडील ती लहान असतानाच वारले होते , हे राहते घर भार्गवीचे वडीलो पार्जीत होते , ती एकुलती एक वारस असल्यामुळे , लग्नानंतर अवी तिथेच राहायला आला , त्याच जुन्या घराला त्यांनी काही सुधारणा करुन नवीन सुंदर बंगल्यात परावर्तीत केले , अवी रायगड हून पाच वर्षांपुर्वीच बदली घेऊन मायानगरीत आला , आणी आता त्याचा संसार सुरळीत सुरु होता , भार्गवी सारखी सुशील , शांत मुलगी त्याला बायको म्हणून लाभली होती , ती अवी सकट त्याच्या आईचीही देखभाल करायची चांगल्या तर्‍हेने एवढेच काय सुशीला बाईंची सुद्धा काळजी घ्यायची ती ,
बर , सांगा ताई काय करायच आता , 
आधी नेहमीचे काम तर करायचेच आहेत , 
त्याचबरोबर आताच तुम्ही सगळी जळमट काढायची , 
पंखे स्वच्छ करा , हे शो पीस वगैरे पुसून घ्या !
बरं ठिक आहे , तो फोटो पुसायचा का ?
क्रमशः

🎭 Series Post

View all