स्वप्नांजली.10

It is a continuous novel !! but due to the limitations of words, it is presented in parts, reveals the story of mystry in lives of two youngs in love,with interestig twists....

अरे अवीsss रडता रडता , अचानक त्याला आलेल बघून त्या चकीत होऊन हसल्या , तू कसा काय आलास अचानक ,
अगं पण तू का रडत होतीस , 
का बर गं आई ,
अरे तुझीच आठवण करत होती रेsss 
आणि ती पुन्हा त्याच्या गळ्यात पडून रडू लागली ,
अगं आलो ना मी आता ! रडू नकोस , चुप राहा ,
तुझ्या हातचा चहा हवा मला , मी आंघोळ करुन येतो , 
आईने चहा केला तो पर्यंत अवी झटपट आंघोळ करुन , तयार होऊन आला , आई मी चहा पिऊन लतिका कडे जातो , 
हो ! चहा पी आधी , त्याने चहा घेतला , 
आई जाऊन येतो मी लतिका च्या घरी , 
अरे थांब जरा ! मी पण येते , 
अगं तू नंतर ये मी जातो , 
थांब ना रेss , 
अरे तिच्या कडे पुजा आहे मला पण जायचे आहे , 
थांब थोडा , 
आज काय आहे , त्याने कॅलेंडर कडे बघीतले , 
अरे आज रविवार आहे , त्याला माहीत होते लतिकाची आई धार्मिक स्वभावाच्या आहेत आणि अधून मधून त्यांच्या कडे पुजा व्हायची ! पण आज रविवारी पुजा ? त्याने डोक्याला ताण न देता , आईला म्हंटले ,
चल जाऊ आपण , अवीने गाडी सुरु केली ,
गाडीत बसता बसता आई म्हणाली , घाटाकडे घे गाडी ,
तिकडे का बरं ? 
पूजा तिकडेच आहे ,
बरं ठिक आहे चल ,
दोघेही घाटावर आलेत , अवी मंदीराच्या दिशेने निघाला त्याची नजर लतिकाला शोधत होती ,
कुठे आहे ही मुलगी , आवाज देऊ का तिला अवी मनातल्या मनात बोलला , 
अरे अवी बेटा , इकडे ये , मागे , मंदीराच्या ,रमाबाई म्हणाल्या ,
दोघे ही तिकडे गेलेत , त्याने इकडे तिकडे बघीतले , लोकांची गर्दी होतीच तिथे , 
दुर नदीच्या काठावर पुजा सुरु होती , लतिकाची आई , भाऊ आणि बहीण तिथे बसलेले होते , 
त्यांना बघून आनंदाने अवी ओरडलाच काकू ss चमकून सुशीलाबाईंनी मान वर करुन त्याच्याकडे बघीतले , आणि,,आणि,, एकच क्षण ,,, त्या हंबरडा फोडत ऊठून त्याच्या कडे धावल्याच , 
त्याच्या गळ्यात पडून त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या , 
अवी गांगरुनच गेला,,,अरे काकू अश्या का रडताय ,
मग आई कडे बघून म्हणाला , आई बघ ना जरा ,
काकू किती रडतायत , 
त्याने आईकडे बघीतले त्याची आई सुद्धा पदर डोळ्याला लावून रडत होती , 
काय झाल तुम्हा दोघींना ? आता मात्र त्याला थोड विचित्र वाटल , तुम्ही अश्या का रडत आहात आणि मला लतिका दिसली नाही ,
कुठे आहे लतिका ? ऐ लतिकाssलतिकाss
राघव ! कुठाय लतिका , अरे बोलं ना ! राघवने रडतच समोर हात दाखवला ,
त्या दिशेला अवीने बघीतले , समोर भटजी पुजापाठ करत होते , त्यांच्या समोरच लतिकाचा हार घातलेला फोटो ठेवलेला होता , आययाईsssमाझ्या लतिकाच्या फोटो समोर का पुजा करत आहे , हा भटजी ! 
अवी बघतच राहीला ,, निःशब्द ! त्याला काही सुचतच नव्हते , सगळे आवाज येणे बंद झाले होते,,,रमाबाईंनी त्याला हलवून भानावर आणले , अवी धावतच फोटो जवळ गेला आणि मटकन खाली बसला , हे कधी आणि कस झाल , पण ,, कस शक्य आहे हे ? त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता !
सुशीला बाई बोलत होत्या , तू गेलास त्याच दिवशी तिची आॅफीसची ट्रिप जाणार होती , तुला माहीतच होते , तुच तिला ट्रिपला जायला म्हणाला होतास , रात्रीच्या मुक्कामाने गेले होते सगळे , 
पण तिकडे जाताना दुपारी एका वळणावर गाडी खोल दरीत पडली , आणि अर्धे अधिक लोकं त्यात जागेवरच गेलेत ,,, आपली लतिका ही त्यातच आपल्याला सोडून गेली रेsss
अवी कधी फोटोला तर कधी त्या सगळ्यांना बघत होता,,,अवी अतिशय दुःखाने फोटो बघत होता , काय झाल हे , मी का गेलो तिकडे , इथेच राहीलो असतो तर लतिका आता माझ्या सोबत असती , काय करु मी आता , कसा जगू तिच्या शिवाय , कित्ती स्वप्न पाहीलीत मी तिला घेऊन , काय होऊन बसल हे , अतीव दुःखाने तो म्हणाला तुम्ही मला न सांगताच अंत्यविधी कसा केला तिचा ? अंतिम दर्शन ही झाल नाही तिच , तुम्ही माझ्या सोबत असे कसे करु शकता ? तो हताश होऊन खाली मान घालून बसला , डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या ! रमाबाई त्याच्या पाठीवरुन हात फिरवत रडतच म्हणाल्या , हो रे बाबा तुझ बरोबर आहे , पण तुझ्या आॅफीसच्या बाबतीत आम्हाला काहीच माहीती नव्हती , फोन नाही तिकडे , मग कसा संपर्क करायचा होता ! अॅक्सीडेंट मधे छिन्न विछिन्न झाले होते रे काहीजण , आम्हाला तर सुचतच नव्हत काही , त्यात सुशीला बेशुद्ध होती , तिला ही लतिकाचे दर्शन झाले नाही रे , मी आणि मेघा हिच्या जवळ , हिलाच आॅक्सीजन लावाव लागल होत , करणारा राघवच होता , बाकीच्या प्रेतांसोबत मग लतिकाचाही अंत्यविधी एकत्रित केल्या गेला , त्यातही तिच्या काही मैत्रिणींना फक्त खरचटल , पण आपली लतिका दुर्दैवी राहीली , सगळे स्वप्न इथेच ठेऊन गेली रे ती sss रमाबाई हमसून हमसून रडू लागल्या , कालच दवाखाण्यातून आईला घरी आणल , आज ताईच दसव आहे , राघव रडतच म्हणाला , हो , पण मी , मी कोण होतो तिचा , मला तर तुम्ही एकटच पाडल , परकच ठरवलत ! आज मी आलो म्हणून तिच्या पुजेत अनावधनाने सामील झालो , एवढच नात होत का लतिकाच आणि माझ ? का लतिका अस केलस तू माझ्यासोबत , मला न भेटता , बोलता गेलीस , आपण बघीतलेल स्वप्न ! त्याच काय ? तुला याव लागेल लतिका ! तुला याव लागेल लतिका ss पुन्हा अवी रडायला लागला , रमा बाई सुशीलाबाई त्याला समजावित होत्या , तिची सोबत एवढीच होती अवी ,
क्रमशः

🎭 Series Post

View all