स्वप्नांच्या पलीकडले !

"आज इतक्या वाजेपर्यंत आली तर ठीक आहे. नाहीतर नको येऊ !" प्रकाश.बिचारी सलाईनचा हात घेऊन तशीच तिच्या सासरी तिचा भाऊ सोडून आला तिच्या भावाला त्यांनी पाणी ही दिले नाही अन् तो परतला."ताई काळजी घे! हे पैसे ठेव , दवाखान्यात जाऊ ये ! " भरल्या डोळ्यांनी दोघ भाऊ बहिणीनी एकमेकांचा निरोप घेतला.
स्वप्नांच्या पलीकडले !
   

            जेव्हा मुलीच्या लग्नाविषयी घरात बोलले जाते तेव्हा ती नकळत सुखी संसाराचे स्वप्न पाहायला सुरवात करते. पण प्रत्यक्षात मात्र तिचे स्वप्न भंग होते. तेव्हा तिला काय वाटत असेल तिच्या मनाची काय अवस्था असेल याची कोणीही कल्पना करू शकत नाही.

"कधी जगावं मी माझ्या मनासारखं ? श्वास घेतानाही यांना विचारून घ्यायचा का ? खूप तडफड होते आतल्याआत .. मी जेव्हा वेळ मागत होते. मला वेळ दिला नाही तेव्हा मात्र रात्र दिवसं मी रडले, तरफडले पण माझी कोणाला दया आली नाही. बारा वर्ष मी सहन केले पण आता नाही सहन होत. आधी कुठे मी माझ्या मनासारखे जगत होते म्हणा,सतत वडिलांच्या धाकात , कुठे जाऊ नये, कुणाशी बोलू नये, त्यात तर कुणा मुलांसोबत बोलायचा प्रश्नच नाही. मनासारखे कपडे ही घालता आले नाही. लग्न झाले तिथेही निदान मुलाची चौकशी तर करायला पाहिजे होती. पण नाही लग्नाचीही तिथेही घाई केली, कारण काय पहिले स्थळाशी साखरपुडा होऊन तुटलेला का तर तिथे मुलाच्या अटी होत्या हुंड्यात त्याना चार चाकी पाहिजे होती. मग या स्थळाला घाई केली. ठरलं एकदाच !
त्यात ही फोनवर कपड्यांची खरेदी बद्दल हे घे,ते घे .

" माझ्या आईच्या पसंतीची साडी घे ! वहिनीने ही तशीच घेतली होती. तू ही घे !" प्रकाश. एकीकडे प्रकाश फोन करून सांगतो . दूसरीकडून सासू सांगते

"माझ्या मुलाच्या पसंतीची साडी घे ! त्याला आवडते !" शारदा.

दोन्हीकडून मानसिक दबाब होतोय त्यांच्या वहिनींच वेगळच 
सुरू! कोणीही माझ्या आवडी निवडीचा विचार केला नाही. कुरकूर नुसती कुरुकुरूच होती . लग्न अशा पद्धतीने करा ! तस करा , दागिने हे घ्या,ते घ्या ! वादच वाद ! नवरा मुलगा प्रकाश सोबत बोलतनाही त्याचे वाद होत होते . काय बोलणार किती बोलवं. कसे आहेत ? तब्बेत कशी ?जेवण केले का? रोज रोज काय बोलणार ? हा प्रश्न तिला पडत होता.. कधी फोन उचलला नाही तर माझा फोन का उचलला नाही ? मग त्यावर बोलाबाली .. लग्न व्हायच्या आधीच असे वाटत होते की नकार द्यावा इतका तो मानसिक त्रास होत होता. जीव नकोसा या बंधनात पळून जावू वाटत होते. मग तसे केले तर ,तिथेही मुलीची चूक असते ना हो .. कारण तर ती मुलगी आहे. तिला हे सहन करावे लागणार . आधी आई वडिल म्हणतील तसे नंतर नवरा सासू सासरे म्हणतील तसे. मुलींना ऐकावंच लागत ना, समुजतदार पणा घ्यावा लागतो. म्हणून तिने ही घेतला . कोण आहे ही ? तर ही आहे प्रथा .
       

            लग्न झाले तसे नव्यानवरीचा गृहप्रवेश झाला . मुलाकडेच्या बायकांनी अंगावर काय काय आणले हे पाहणे सुरू केले. मोठे जेठ त्यांच्या आजीला म्हणाले," हे बघ आजी तुझ्या नातसुनेने पोतं भरून सोन आणलयं !" त्यांनी तिला टोमणा मारला.
जाऊबाई म्हणाल्या,
"तिकडच्या भागातील मुली नांदत नाही हो!"

ही आपली खाली मान घालून बसलेली. काय बोलणार ? बोलली तर बोलणारी आहे. नवरीचे दोन तीन दिवस सरले आणि सासुबाईं शारदांनी गोधड्या धुवायला टाकाल्या आणि नव्या नवरीला धुवायच्या सांगितल्या .

"हे बघ रे,तुझ्या बायकोला घर झाडता येत नाही !" नवरा लगेच तयार बोलायला . प्रथा सकाळी लवकर उठायची तरी सासूसासरे तिच्या नावाने ओराडायचे . अंघोळ करून छान साडी नेसून , भांगेत सिंदूर लावून ओठांना हलकीशी लिपस्टीक लावून तयार झाली तर ,

" हे आमच्या घरात असं चालत नाही! अस नाही राहायचं, अशा साड्या नाही नेसायच्या !" शारदा सांगून मोकळी झाली. कसं राहू मी? कशी दिसणार ?कोण म्हणणार मला नवी नवरी ? तिला प्रश्न पडला. स्वतःच्या हातांच्या मेंहदीकडे पाहिले. ती तर अजूनही अस्पष्ट दिसत होती. मेंहदी पुसली गेली नव्हती. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. 

"म्हणजे यांना सून नको होती तर यांना घरात मोलकरीण एक मशीन हवी होती. वागवत तर तसेच आहेत मला .. दिवसभर काम कारायची . पाहुण्यांच करायचं, सकाळचे जेवण संध्याकाळी करायचं ,थोडा ही आराम करायचा नाही किंवा खोलीत गेली तर आरोड्या मारायच्या, त्यांच्या हो ला हो करायचं. त्यात माझ्याशी कोणीही नाही बोलायला, नवराही ऐकून घेत नाही. माझ्या आईचा फोन आला तर लगेच सासूबाई बोलतात जंगलात टाकली यांची मुलगी फोन करताय ! आईबाबासोबत बोलायला चोरी. साधा एक कप चहापण करू शकत नाही.तो नवऱ्यासोबत शांततेत बसून पिऊही शकत नाही. काय तर सर्वच तपासून ड्युटीवर जाता. वरतून बोलतात ," मी ड्युटीवर गेल्यावर चांगले चांगले करून खाते ." कसे विचार आहेत या 
लोकांचे?सासूबाई मी काय निर्जीव वस्तू आहे का? मला इथे श्वास घ्यायला त्रास होतोय. हे ड्रिंक करता हे मला माहितीच नाही. आज काल कोण करत नाही ड्रिंक सर्वच करता पण त्याला ही लिमिट असते ना .. पहिल्यापासून हे खोटं बोलले. नेहमीच माहेरी जायचे म्हटले तर सासूबाईंची टांगती तलवार आहेच मानगुटीवर , नवर्‍याला सांगावं तर तो म्हणतो आईला विचार , काहीही झालं की आईला विचार ,आणि विचारल्यावर सतरा गोष्टी सांगतील मग हिरमोड होतोच होतो आणि जाणही कॅन्सल. प्रत्येक गोष्टीत त्यांचा टोमणा असतो. घाण घाणं शिव्या असता. सरकारी नोकरीवर आहे माझी सासुबाई पण सुशिक्षित बिलकुल दिसत नाहीं "

पाळीत खूप त्रास होत होता. तरीही त्यांनी जाणूनच काम काढले होते. सांगितल्यावर म्हणाले की नाटक करतेय ही ! असं सरळ म्हणतात आणि त्याच्या मुलीला पाळीत त्रास होतो तेव्हा तिला ओंजारतील ,गोंजारतील "आराम करं छकु ! माझ्या छकुलीला त्रास होतोय !" मी ही माझ्याआईची छकुली आहे ना ? मग मला अशी वागणूक का?



एकदा हद्द तर तेव्हा झाली जेव्हा माझ्या आजीची तब्बेत एकदम सिरयस झाली पप्पांचा फोन आला.


" प्रथा, तुझी आजी सिरियस झालीय तू लवकर ये! " 

" हो , बाबा ." तिने फोन ठेवला. तिने तिच्या नवर्याला सांगितले. त्याने तिला त्याच्या आईला विचारायचे सांगितले.

" तू गेली तर तुझी आजी चांगली होणार आहे का?" सासूबाई म्हणाली. तिने रडत रडत बाबांना सांगितले . बाबांनी सासूबाईंना फोन केला .

"माझ्या आईच्या जागी तुमची आई गेली असती तर तुम्ही तिला जिवंत केले असते का ताई?"

"ये ऽऽ तुझ्या बापाला सांगायचं की माझ्या सासुबाई सोबत नीट "बोलायचं "

आजीला हॉस्पिटल मध्ये भरती केले . आजीचे चान्सेस नव्हते जगण्याचे. डॉक्टरांनीही सांगितले होते एक क्षण असा आला की ती गेली. डॉक्टरांनी सांगितले ती गेली म्हणून आणि दुसऱ्याच मिनिटाला ती परत आली हा मोठा दैवी चमत्कारच झाला होता.

"आजोबांना भेटून आल्या आजी ?" डॉक्टर आजींना म्हणाले.

प्रथाच्या नवरा कधीच तिच्यासाठी उभा राहिला नाही तो त्याचा त्याचा मस्त मज्जा दारू पार्टीत खुष राहिला. खोट बोलण्यात तर त्याने पी एच डी केली. .. प्रथा माहेरी गेली. तिथे तिला डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतले. तिला सलाईन लावली. आणि तिच्या जबरदस्ती नवर्याने बोलावून घेतले.

 "आज इतक्या वाजेपर्यंत आली तर ठीक आहे. नाहीतर नको येऊ !" प्रकाश.
बिचारी सलाईनचा हात घेऊन तशीच तिच्या सासरी तिचा भाऊ सोडून आला तिच्या भावाला त्यांनी पाणी ही दिले नाही अन् तो परतला.

"ताई काळजी घे! हे पैसे ठेव , दवाखान्यात जाऊ ये ! " 
भरल्या डोळ्यांनी दोघ भाऊ बहिणीनी एकमेकांचा निरोप घेतला. भाऊ गेल्यानंतर सासूबाई तिच्या सोबत खूप भांडल्या . यावेळी तिचा संयम सुटला मोबाइचा विषय निघाल्याने, तिने संतापात मोबाइल फेकून दिला . तिच्या नवर्‍याने एक सनकन गालावर ठेवून दिली आणि ती खाली बेशुद्ध पडली. आता तर सासूबाई घरातील कामांवर तिच्या खाण्यांवरून तिच्या बसण्यावरून ,उठण्यावरून तिला बोलत होत्या . त्यातील तिने एकही गोष्ट तिच्या माहेरी सांगितली नाही. ती उदास राहू लागली. त्यात सासूबाई ड्युटीवर गेल्यावर आजीसासूचे सगळ्या कामावर लक्ष ठेवत असत. तिथे तिल्या गुदमल्यासारखे वाटत होते . तिला आत्महत्येचे विचार येत होते मग प्रथाने डायरित लिहणे सुरु केले, रोजची दिनचर्या लिहू लागली . किती वाजता उठली पासून तर किती वाजता झोपली. त्यात काय केले? कोण बोलले ? सुखद क्षण, सासूबाईंचे टोमणे , कसे ते मागच्या अंगणात अंघोळ झाल्यावर साडी नेसायचे म्हणत होते. चांगले , वाईट सर्वच लिहले. 


प्रथाच्या बाबांचा एक्सीडेंट झाला तेव्हा प्रथा तिचा नवरा , सासू सासरे पाहायला गेले. घरात आल्या आल्या सर्व सोफ्यावर बसले ती तिच्या बाबांजवळ बसली, बाबांची विचारपूस करून ती आतल्या रूममध्ये आली. प्रथाची आई बाहेर दुकानात प्रथाच्या सासूबाईसाठी साडी घ्यायला गेली होती. चहापाणी झाला. आणि तिची सासू रुममध्ये आली . पाहुणचार करून घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी तिला शिव्याची लाखोली वाहिली.


"हिला समजल नाही का ह्या रा***, च** ."इतक्या घाणरेड्या शिव्या तिने आज पहिल्यांदाच ऐकल्या. तिच्या आईला बाबाला तिच्या म्हताऱ्या आजीलाही शिव्या देत होत्या. ती नुसती रडत होती प्रथाने रोजच्या प्रमाणे हे पण तिच्या रोजनिशीच्या डायरित आहे. यावेळी तिचा संताप, मनातील राग उफाळून त्या डायरित लिहाला.. मला शिव्या देता त्याच आहेत ह्या ..इनडायरेक्टली तिने त्यांना म्हणाली. सासूबाईंनी तिची डायरी चोरून वाचली. दोन दिवसांच लिहायचे म्हणून तिने डायरीची शोधाशोध सुरु केली तेव्हा तिला माहिती पडले. की सासूबाईंनी डायरी चोरली .त्यात त्यांचे खूप मोठे भांडण झाले. नाही नाही ते म्हणाले तिला. खरचं ही लोक सुशिक्षित आहेत का? त्यापेक्षा तर अडाणी निरक्षर लोक चांगलीत. शिकलेली माणसे अशी वागतात का?


"माझ्या बॅगमध्ये माझ्या नकळत माझी डायरी का घेतली? मला माझी डायरी हवीय." नवराही तिच्याकडून नव्हता आता प्रथाला तिथे राहायचे नव्हते. ती घर सोडून गेली. प्रथाच्या सासुने 
सर्वांकडेच प्रथाची बदनामी केली.

 
"हिने डायरी लिहिली त्यात मला शिव्या दिला." पण खरे करण्यासाठी डायरी कोणाला दिली नाही. 

" ती माझ्या घरात नकोय ?" अशी ताकीद दिली.

"तिला घटस्फोट देतो. " प्रथाचा नवरा म्हणाला.

शेवटी तिला तिचा संसार वाचावण्यासाठी गेलीच . तिला घराबाहेर काढले . दूसरी कडे राहायला गेली पण तिथे येऊन दारात तिला खूप शिव्या दिल्या. तेंव्हाही नवरा एकही शब्द बोलला नाही. भर लोकांत त्याच्या बायकोचा अपमान झाला. तिने प्रत्येक वेळी सुधारयची संधी दिली पण तो सुधारला नाही. त्याचा तो मस्त राहिला. कोणी म्हणे लेकरू बाळं झालं की होईल? एक मुलगा झाला पार्थ गोड गुबरा गालाचा आता तरी सुधारावे पण काही नाही झाले. कसलाच व्यवहार तिला सांगितला नाही जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा मरणाची धमकी दिली मग तिने तिचे दागिने विकले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळला प्रथाने त्याचा साथ दिला. प्रत्येक वेळेला तिने संधी दिली. त्याला चुका झाल्यावर अक्कल आली. तरीही तिला आता मानसिक टेंशन देणे चालूच होते. बारा वर्ष तिने त्याच्या सोबत काढले होते. तिला आताही जीवन संपवण्याचे विचार येत होते .. किती ते नियम आहेत तिला . 


अंगावर मारण्याचे वळ काही दिवसांनी दिसत नाही. पण शब्दांचे मार विसरता येत नाही.
घरातील पाळीव प्राण्यालाही तुम्ही चांगले वागवता, काळजी करता , प्रेम देता मग ही तर तुमची सुन आहे . मग तिच्या बाबतीत असं का?


"जगू नको का मी माझ्या मनासारखे ? किती टॉर्चर करताय हे 
मला? कुठेतरी निघून गेले तर माझ्या चरित्र्यावर बोटं 
ठेवतील ? गेली कुणासोबत पळून ?असं जगण्यापेक्षा मरणं चांगले, एकदाची सुटका होईल माझी. तिने रॅट किलर घेतले आणि तोंडाला लावतच होती तर तिचा अकरा वर्षाचा मुलगा आला. तिने पटकन बाटली बाजुला केली.

"काय करतेस तूऽ मम्मा , तू काय पित होती ? कोणत औषध होत ते? दाखव मला" पार्थने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्याने ते आईकडून हिसकून घेतले . त्याने वाचले .

"मम्मा माझा एकदाही विचार नाही आला का तूला, तू एक काम करं आधी मला दे. मग तू घे ! आलेल्या परिस्थितीशी फाइट करायचे सांगते ना तू , मग तू असं करू शकते. तू माझी स्ट्रॉग मम्मा आहे प्लिज फाईट कर आणि मी तुझ्यासोबत आहे!" तो आश्वासक नजरेने त्याच्या आईकडे बघून सांगत होता.

अकरा वर्षाचा तिचा पार्थ तिला जीवनाचा धडा शिकवत होता. तिने त्याला कुशीत घेतले आणि रडू लागली . आणि तिने एक निर्णय घेतला. सततच्या मानसिक तणावामुळे तिने तिच्या नवऱ्याला घटस्फोट देण्याचा .. आणि तिने एका शाळेत शिक्षेका म्हणून रूजू होऊन स्वावलंबी झाली. ती तिच्या नवर्‍यापासून वेगळी झाली. ती आणि तिचा मुलगा आता स्वतंत्र राहू लागले. तिला आता कोणाचीही पर्वा नव्हती तिचा पार्थ तिच्यासोबत होता आणि हेच प्रथासाठी महत्त्वाचे होते.


****
समाप्त 


©® धनदिपा