स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 9)
( माघील भागात आपण पाहिले
मयुरी व अभिमान यांचे नाविलाजने का होईना पण एकमत झाले होते )
आता पुढे ..............................
मला त्यांचा निर्णय मान्य होता असे नाही पण माझ्याकडे पर्याय देखील नव्हता म्हणून मी शांत राहिले,
प्रिया चा वाढदिवस होता यांनी तिच्यासाठी ड्रेस आणला पण त्यांनी आणताना दोन ड्रेस आणले त्यांना वाटले एक प्रिया साठी व एक माझ्यासाठी ,
प्रिया म्हणजे घरातील लाडकं लेकरू हे तिच्या प्रत्येक वाढदिवसाला
तिला सरप्राईज गिफ्ट देतात ,
त्यांनी दोन्ही ड्रेस तिच्या हातात दिले एक तुझ्यासाठी व एक तुझ्या वहिनी साठी,
प्रिया ने ड्रेस पुन्हा पुन्हा नेहाळून
पाहिले मग त्यातील एक ड्रेस पसंत केला,
आणि शिल्लक राहिलेला माझ्या हातात दिला
मी तो ड्रेस हातात घेतला
त्यावरून एक हात फिरवला व रूममध्ये ठेवायला गेले,
मी रूममध्ये जाताच हे पाठीमाघून आले कारण अजूनही घरातील सगळ्यान समोर मला बोलायला ते माघे पुढे बघत होते,
मी कॉट वर बसून त्या ड्रेस कडे बघत होते तेवढ्यात हे आतमध्ये आले,
"काय ग काय झालं
आवडला नाही का "
हे त्या ड्रेस कडे बघत म्हणाले
"अस का वाटलं तुम्हांला
मी त्यांना विचारले,
"तू त्या गिफ्ट वर काहीच रिऍक्शन दिली नाहीस म्हणून म्हणालो"
त्यांच्या डोळ्यात मला खुप मोठे प्रश्नचिन्ह दिसत होते थोडा वेळ मला हसू आले,
यांना खरच माझ्या चेहऱ्यावरील भाव कळत नाहीत
की ते कळून न कळल्या सारखे करता,
मी फक्त त्यांच्याकडे बघत होते
"सांग ना काय झालं "
ते माझ्या समोर येऊन बसले व म्हणाले,
मी हसले व बोलू लागले अहो तुम्ही माझ्यासाठी काय आणले यापेक्षा त्याठिकाणी गेल्यावर , त्यावेळी तुम्हांला माझी आठवण आली हे जास्त जवळचे वाटले मला, आणि माझ्या वाट्याला कोणताही ड्रेस आला तरी तो तुमच्या आवडीचा आहे हे मला सुखावह होते,
तुमच्या भावना माझ्यासाठी जास्त जवळच्या आहेत,
माझे बोलणे संपले व हे एकदम बोलू लागले,
"मयू तुला काय वाटते मला कळत नाही तू माझ्यासाठी खुप काही ऍडजस्ट करते पण कस आहे ना बायको
माझे मित्र म्हणतात बायकोचे जास्त कौतुक केले की ती डोक्यावर बसते
आणि ते जोरात हसू लागले
मला राग यायला हवा होता तेव्हा त्यांचा पण माहीत नाही का
???
नाही आला राग
" हो का
मग मी पण बघते ना कसे कौतुक करत नाहीत ते"
मी स्वतःवरील विश्वास दाखवत म्हणाले,
आम्ही दोघे ही एकमेकांना बघून हसू लागलो,
संध्याकाळ झाली होती
मी दिवे लावले व दुध तापायला ठेवले,
तेवढ्यात यांनी मला आवाज दिला त्यांना माझे डॉक्युमेंट्स हवे होते ते शोधण्यात वेळ कसा गेला कळलं च नाही,
तेवढ्यात आई ने जोरात दिलेल्या आवाजाने मी किचनकडे धाव घेतली,
बघते तर काय दुधाने पूर्ण किचनओठा व्यापून पातेलं पूर्ण जळून गेलं होतं,
खुप वास येत होता त्याचा
हे सगळं दृश्य बघून आई मला खुप रागावू लागल्या,
"तुला कळत नाही का ??
आता काय तू लहान आहे का ??
तुझ्या लक्षात असायला हवं आपण गॅस वर काय ठेवलंय
बाई चे चोहीकडे लक्ष असावं
पण तू एकदा का रूम मध्ये गेली बाहेर येणाचे नाव नसते
मला समजत नाही तुझे काय काम असते इतके रूम मध्ये"
आई चे डोळे लाल झाले होते
त्या खुप रागात बोलत होत्या.
त्यांचा आवाज ऐकून सगळे किचनकडे आले त्यात हे देखील होते
आई मला बोलत होत्या व सगळे फक्त बघत होते,
मी काही बोलू शकत नव्हते
व बाकीच्यांचे पण जाऊ द्या पण हे बोलू शकत नव्हते का??
पण नाही हे फक्त शांत होते
आता मनात खुप राग आला अरे ज्या माणसासाठी मी माझे आई वडील सोडून आले त्याला या गोष्टी ची जाणीव देखील असू नये,
व गेले इतके से दूध वाया तर बिघडले कुठे??
त्याने कुठे आभाळ कोसळणार होते,
पण नवरा म्हणून यांचे काही कर्तव्य आहे की नाही
जर हे गरज असताना माझी साथ देऊ शकत नाही तर त्या नात्याला अर्थ काय??
नवरा बायकोचे प्रेम चार भीतीच्या आतले असे विचार करणाऱ्या कडून मी वेगळी अपेक्षा काय करणार होते,
जो माणूस मला साथ देऊ शकत नाही तो प्रेम काय करणार,
शेवटी बाबा नि मध्यस्थी केली व आई शांत झाल्या मी अजूनही किचनओट्या जवळ उभा होते
मी रडत रडत सगळे साफ करून घेतले
पण मनाचे काय ????
आज या मनामध्ये अढि निर्माण झाली होती आई व यांच्या विषयी,
मी शांतपणे सगळं आवरून घेतले अजूनही कुणी कुणाशी बोलत नव्हते आज सर्वांनी जेवण देखील शांतपणे केले,
मी माझी कामे आवरून रूम मध्ये जाऊन बसले,
डोळ्यातील पाणी व मनातील विचारांनी आज परिसीमा गाठली होती,
खरच सासर कधी
माहेर होईल का ?
डोळ्यातील पाण्यासोबत
मनातील अढि वाहील का ?
नाही करू शकत कुणी
कधी आई ची बरोबरी
पण मला तरी कधी
मुलगी होता येईल का ??
अभिमान चुकले की
माझे विचार चुकताय
आई आणि बायको मध्ये
कोणासाठी ते झुरताय
कोणताही विचार करताना आज
मन हे गडगडले
अनुभवत होते मी एक
गाव स्वप्नाच्या पलीकडले
क्रमशः ...............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा