A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session69adc53fe7c6fc1e3dc501bc6e1fa2b535253dae5e6a2894c924fd0716cd561ff4250a12): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Swapnachya palikadale 8
Oct 25, 2020
स्पर्धा

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 8)

Read Later
स्वप्नांच्या पलीकडले (भाग 8)

स्वप्नाच्या पलीकडले (भाग 8 )

( माघील भागात आपण पाहिले मयुरी व अभिमान किचनमध्ये होते व अभिमान ला धडा शिकवण्यासाठी मयुरी ने मुद्दाम प्रिया ला आवाज दिला) 

आता पुढे ...............

मी ने दिलेला आवाज ऐकताच प्रिया किचनमध्ये आली, 
तिला  बघून हे खुप अवघडले पण यांच्या पेक्षा आम्ही दोघे किचनमध्ये काय करतोय हा प्रिया  ला प्रश्न पडला 

व ती म्हणाली 
"दादा आता स्वयंपाक करू लागतो की काय??" 

"का ?? मला दुसरे काही काम नाही का " ते माझ्याकडे बघून म्हणाले 

"हो का सारखा तर वहिनी च्या माघे पुढे असतोस " प्रिया हसत म्हणाल्या 

"तू तर थांब आता 
तू फक्त हाती लाग माझ्या" हे प्रियाकडे धाव घेत म्हणाले 

ते दोघे एकमेकांच्या माघे एक राऊंड घेऊन पुन्हा पळत पळत किचनमध्ये आले, 
आता प्रिया पूर्ण अडकल्या होत्या कारण किचनमधून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता व त्यात हे उभा होते 
"आता कुठे जाशील ना 
बघतो च तुझी सोय " 

असे म्हणून ते पुर्ण दरवाजा कव्हर करत दोन्ही हात पसरून प्रियाकडे येऊ लागले, 
हे येताय व आता आपण मेलो हे प्रिया ताई च्या लक्ष्यात आले होते, 
हे जवळ आले तसे प्रिया ताई माझ्या माघे दडल्या , 
"भाबी जाण 
अब मेरी जाण आपके हाथ मै है।
ईस नाचीज की जाण बचाओ भाबी "
त्या त्यांच्या नेहमीच्या फिल्मी स्टाईल मध्ये मला म्हणाल्या 
पण हे अजूनही त्यांच्या माघे हात धुन लागले होते 
त्या माझ्या मागे दडल्या होत्या 
हे त्यांना पकडायचा प्रयत्न करत होते तेवढ्यात प्रिया ताई नि जोरात मला त्यांच्या अंगावर ढकलले व त्या हॉलमध्ये पळून गेला, 
प्रिया ने इतके जोरात ढकलले की मी त्यांना धडकून पडणार तोच त्यांनी मला हातावर सावरले, 
मला सोडून ते ताई माघे देखील पळू शकत नव्हते पण या भावा -बहिणीच्या भांडणामध्ये मी अडकले होते, 
आता स्वतःहून यांच्या हातावर आलेली हे हलकेच थोडी सोडणार होते, 

यांनी मुद्दाम मला त्याच अवस्थेत थोडा वेळ ठेवलं 
तेवढ्यात प्रिया पुन्हा दरवाजाजवळ आल्या 
"दादासाहेब  .......
घरात इतर माणसे देखील आहेत " 
असे म्हणून हसू लागल्या 
यांनी मला पटकन सोडलं 
व प्रिया च्या डोक्यात एक चापट मारून ते हॉलमध्ये जाऊन बसले, 

मी माझी साडी सावरत किचनओठ्या जवळ उभे राहिले,

"वहिनी 
हा रोग कायमचा असतो की लग्नानंतर काही दिवस असतो" 
त्या हळूच माझ्या जवळ येऊन म्हणाल्या 

"रोग कोणता रोग ??" 
मी काही समजले नाही असे दाखवत म्हणाले, 

"अहो तोच 
माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्या " 
प्रिया ताई माझ्याकडे बघत बघत हसत होत्या व तशाच त्या निघून गेल्या, 

मी विचार केला नेहमी शांत समजदार वाटणारे हे जेव्हा आम्ही दोघेच असतो तेव्हा तर हे लहान बाळासारखे वागतात, माझ्या सोबत ते आता व्यक्त होऊ लागले होते, पण इथे खुप लोक असल्यामुळे आम्हाला एकमेकांना देण्यासाठी वेळ खुप कमी मिळतो 
एक तर दिवसा जास्तवेळ रूम मध्ये थांबता येत नाही.
कारण आई ना ते आवडत नव्हते, 
तितक्यात माझ्याच मनात विचार आला , 
आम्ही कुठे फिरायला गेलो तर 
छान फ्रेश पण वाटेल व एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळही मिळेल 
आणि आता च लग्न झाले म्हणून कुणी जाण्यासाठी अडवणार देखील नाही , 
चल याना विचारून बघते असे मनाशीच  ठरवून मी यांना शोधण्यासाठी बाहेर आले, 
बाबा घरासमोरील बाघेत पेपर वाचत बसले होते आई त्यांच्या जवळ बसून वाती वळवत होत्या, प्रिया रूम मध्ये निघून गेल्या होत्या, आणि हे एकटेच बसले होते हॉल मध्ये टिव्ही बघत, 
असे आतापर्यंत तरी कधी आम्ही दोघेच हॉल मध्ये बसलो नव्हतो व सोबत एका सोप्यावर तर मुळीच नाही, 
ते सोप्यावर बसले होते मी त्यांच्या शेजारी जाऊन बसले, 
आता बायको स्वतःहून जवळ आली म्हणजे नक्कीच काहितरी काम असेल हे त्यांनी एका क्षणात ओळखले  व म्हणाले 
"बोल काय म्हणतेस " 

" कुठे काय सहज च " मी विषय टाळत म्हणाले

"ओ ....
मॅडम 
माझ्या मित्राचे किस्से ऐकून झालेत 
बायको नावाचा प्राणी जेव्हा त्याचे आपल्याकडे कमी काम असते
तेव्हा तो स्वतःहून जवळ येतो हे आज पटले"ते माझी उडवत म्हणाले, 

"काही नाही जा" 

मी लटका राग आणून उठण्याचा प्रयत्न करू लागले तोच त्यानी एक हात पकडून पुन्हा खाली बसवले 

"अग मस्करी केली ग बोल काय म्हणतेस"

आता ते शांतपणे माझे ऐकून घेतील याची जेव्हा खात्री पटली तेव्हा  मी बोलू लागले, 

"आपण कुठेतरी फिरायला जाऊ यात ना , 

लग्नानंतर सगळेच जातात माझ्या खुप मैत्रिणी गेल्यात त्यांनी मला छान छान स्पॉट देखील सांगितलेत, 
तसेही आपण जॉईंट फॅमिली मध्ये राहतो इथे आपल्याला पुरेशी प्रायव्हसी मिळत नाही, 
सतत कुणी ना कुणी असते 
आपल्याला एकमेकांना समजून घेता येईल एकमेकांना वेळ देता येईल "

मी बोलत होते व ते ऐकत होते , 
त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं व म्हणाले
"हे बग मयू आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत हे 
असे फिरायला वैगरे जाणे या लोकांना आवडणार नाही व तुझ्या हट्टासाठी मी तुला घेऊनही जाईल पण आपल्या माणसांना दुखवून त्यांना दूर करून एकटे राहण्यात कसला आला ग आनंद, 
मुळात एकमेकांना समजून घेण्यासाठी एकांत नाही तर फक्त एकमेकांन सोबत असणे गरजेचे, 
आणि तुला जे वाटते ना की मी त्यांच्या समोर वेगळा वागतो तू एकटी असताना वेगळा वागतो याला कारण आहे,
 अग .........
मुळात नवरा बायकोचे नात च अस असत ते फक्त चार भिंतीत च छान दिसत व 
मॅडम नवरा बायकोच प्रेम 
ही जगाला दाखवण्याची गोस्ट नाही बर ते अनुभवाय च असत 

अस म्हणून ते कधी गालावर किस करून निघून गेले ,
माझे मलाच कळले नाही, 

मी माझी सगळी कामे आवरून रूम मध्ये जाऊन बसले, 
माझ्या मनातून अजूनही तो फिरण्याचा विचार जात नव्हता, 
काय माणूस आहे इतका शिकला तरी असा विचार करतो अडाण्या  सारखा, 
म्हणे नवरा बायको च प्रेम हे चार भिंतीत असत, 
अस कुठे असत का ??
मग बाहेर फिरणारे लोक काय मूर्ख आहेत का?? 

आज मी खुप उदास झाले होते 
मला पुन्हा पुन्हा मैत्रिणी ने तिच्या लग्नानंतर च्या फिरायला गेलेल्या आठवणी सांगितलेल्या आठवत होत्या, 
पण माझ्या नशिबात हे सुख नाही हा विचार करून मी पुन्हा पुन्हा दुःखी होत होते, 
मी सकाळ पासून केलेला प्लॅन फसला होता , 
कोणता ड्रेस घालणार??
कसे फोटो काढणार हा सगळा विचार मी करून बसले होते, 
मी माझ्या विचारात गुंतले होते व तेवढ्यात हे आले, 
मी इतकी विचारमग्न होते की ,
हे आले मला याचे भान देखील नव्हते, 
मी  कॉटवर बसले होते व ते माझ्या समोर येऊन बसले, 
मी कसलातरी विचार करतेय हे यांनी हेरले होते 

त्यांनी माझा हात हातात घेतला व ते म्हणाले,

"राग आलाय का माझा, 
तुला वाटत असेल ना की काय माणूस आहे बायको स्वतःहून चल
।म्हणतेय व हा नको म्हणतो 
पण मयू नेहमी स्वतः चा विचार करून नाही चालत अग व तसेही आपण गेलोच पण मी मनाने तुझ्यासोबत नसेल तर चालेल का तुला ??
आणि फक्त मैत्रिणी गेल्या म्हणून आपण जाऊ, 
किंवा फक्त फोटो काढायचे म्हणून आपण जाऊ हे योग्य आहे का ??
मला कुणी बायको च्या माघे पुढे करतो असे म्हणाल तर चालेल का तुला "


"नाही चालणार मला" 
मी त्यांच्या हातावर दुसऱ्या हाताने थाप मारत म्हणाले, 

मनाला ते शंभर टक्के पटले नव्हते पण यांच्या साठी मी हो म्हणाले, 

तुमच्या  निर्णयाबाबत कधीच 
शंका नसते 
तुमच्या प्रत्येक पावलासोबत 
माझे पाऊल असते 

तुम्ही कधीच चुकणार नाहीत याची मला खात्री असते 
माझ्या पाऊलवाटेल वळण 
मात्र तुमचे असते 


आज पुन्हा तुझ्याशी नाते 
विश्वासाने मी जोडले
मी अनुभवते एक गाव 
स्वप्नाच्या पलीकडले.
क्रमशः .........

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,