स्वप्नांच्या पलीकडले (भाग7)

Competition

स्वप्नाच्या पलीकडले (भाग 7) 

( माघील भागात आपण पाहिले मयुरी अभिमान च्या रूममध्ये जाऊन झोपली होती व ती अचानक ओरडली ) 

आता पुढे .......

"बाप रे 
आता मेले " 
मी जोरात ओरडले खुप उशीर झाला होता जवळजवळ सात वाजून गेले होते आता आई काय म्हणतील 
त्या रागावतील का मला 
मी त्याच धाकाने आवरून रूममधून बाहेर पडले, 
अगोदरच उठायला उशीर झाला होता त्यामुळे केस विचारने साडी पिन करणे या फंद्यात न पडता मी फक्त केस वरती लावले व पदराला फक्त सिंगल एक पिन लावून तसाच खोचून घेतला 
आज सुंदर दिसण्यापेक्षा आई चे बोलणे बसू नये ही ईच्छा होती, 
मी घाबरत च किचनमध्ये गेले बघते तर काय ??
आई नि सडा रांगोळी करून पाणी देखील भरले होते व त्या देवपूजा करत होत्या,
मी किचनमध्ये जाऊन उभा राहिले,
"आई सॉरी उठायला उशीर झाला"
मी घाबरतच म्हणाले कारण मैत्रिणी कडून ऐकले होते लग्नानंतर लवकर उठावे लागते आपली अंघोळ आवरून सगळी कामे आवरून घ्यावी लागतात घरातील इतर व्यक्ती उठेपर्यंत 
नाहीतर सासूबाई खुप रागावतात, 
ओरडतात 
त्यामुळे आज मी बोलणे खाणार हे पक्के होते, 

"काही नाही होत
चालते  कधी कधी 
तू चहा घे तुला करून 
तोपर्यंत मी देवपूजा करते मग स्वयंपाकाचे बघू" 
आई नेहमीचा शांतपणा दाखवत म्हणल्या, 

मी स्वतः साठी चहा बनवला घेतला देखील तोपर्यंत आई नि त्यांची देवपूजा आवरून घेतली 
हे अजूनही उठले नव्हते 
मुलांचं बर आहे लवकर उठायचं टेन्शन नाही काही नाही मस्त मनाला वाटेल तसे जगायचं
मी मनात च त्यांचा हेवा करत होते, 
पण मन दुसऱ्या बाजूने देखील विचार करत होते खरच आई नि किती समजून घेतले मला पण त्यांनी आज समजून घेतले म्हणून मी रोज लेट उठायचे


असे नव्हते 
मी आज त्यांनी दाखवलेला माझ्यावरील विश्वास टिकवणे गरजेचे होते, 

मी व आई स्वयंपाक करायला लागलो, 
आई नि भाजी केली व शेजारच्या काकू सकाळी पाय घसरून पडल्या होत्या मग त्यांना किती लागले हे बघण्यासाठी त्या निघून गेल्या, 
बाबा त्यांचे आवरून बाहेर गेले चक्कर मारण्यासाठी, 
प्रिया च्या परीक्षा जवळ आल्या होत्या म्हणून त्या अभ्यास करत बसल्या होत्या रूममध्ये , 
थोडक्यात काय तर सगळे आपापल्या कामात व्यस्त होते 
मी किचन ओट्या जवळ उभी राहून पोळ्या करत होत्या तेवढ्यात हे आले आवरून किचनमध्ये, 
आज त्यांनी मुद्दाम माझ्या साडी ला मॅचिंग शर्ट घातला होता, 
रेड कलर चा चेक्स चा शर्ट त्यांना शोधून दिसत होता, 
शर्ट चा रंग साडीला मॅच झाला होता खरा पण मी आले तेव्हा तर हे झोपलेले होते ना, 
मग याना कसे कळाले मी रेड साडी घातली, 
मी मनात विचार करू लागले व मध्येच त्यांच्याकडे पाहिले, 
"काय साडी चा रंग कसा कळला  हाच विचार करतेस ना, ते कसे आहे मॅडम ( कधी मला अक्कल शिकवताना हे मयु न म्हणता मॅडम म्हणायचे) 
तुम्ही जेव्हा सकाळी आवरत होतास ना तेव्हा मला झोप लागली होती मग तुम्ही स्वप्नांत आला माझ्या व मग मला साडी चा रंग दिसला" असे म्हणून ते हसू लागले , 

मी त्यांच्याकडे रागाने बघत होते 
अरे देवा म्हणजे हे जागी होते तर झोपेचं सोंगं आणलं होतं त्यांनी मी पण किती मूर्ख आहे ना, 
मी त्यांना टाळत होते मनातल्या मनात लाजून चेहऱ्यावर खोटा खोटा राग आणत होते, 
"ये  मयू ऐक ना" 
हे किचनओठ्या जवळ येऊन उभे राहिले व म्हणाले, 

"मला माहित आहे मी रागात खुप सुंदर दिसते असे म्हणाल तुम्ही आता पण मी तुमच्या कुठल्याही भूल थापाणा बळी पडणार नाही " मी नाक  मुरडत म्हणाले, 
"हे ....
तू रागावल्यावर खुप सुंदर दिसतेस" ते हळूच कानात म्हणाले, 


"चला दूर उभे राहा 
पुन्हा सांगितले नाही म्हणाल 
लवकर 
चला दूर "
मी हातातील बेलन त्यांच्या नकडे उंचावत म्हणाले

"ये ..........
बायको 
थांब जातो " 
असे म्हणून त्यानी केसांचे क्लचर हाताने काढले व थोड्या अंतरावर खुर्ची टाकून जाऊन बसले, 

किचनमध्ये गॅस ला हवा लागू नये म्हणून तेथे टेबल फॅन लावलेला होता व त्याच संधी चा फायदा घेत हे मुद्दाम तो टेबल फॅन माझ्याकडे करत होते, 
माझे ते वाऱ्यावर उडणारे केस माप पोळ्या करू देत नव्हते, 
व पोळ्या सोडून मी पुन्हा पुन्हा ते केस सावरू ही शकत नव्हते, 
दोन पोळ्या लाटल्या मी काशातरी व हे तिथे बसून माझी मजा बघत होते, 


" ओ.......
द्या ना ओ क्लचर  please " 
मी सारखी सारखी त्यांना विनंती करत होते,


"हो ....का ....
देऊ ..का...
बर ....
पण एका अटीवर " 
ते म्हणाले 

"आता काय 
सांगा लवकर " 
मी वैतागत म्हणाले कारण 
अगोदरच मी खुप वैतागले होते त्या केसांना 
ते सारखे सारखे पोळ्या करताना मध्ये मध्ये येत होते , 

"मी लावतो केसांना 
बग जमत असेल तर" 
हे मला कैचीत पकडत म्हणाले, 


माझ्यासमोर दुसरा पर्याय देखील नव्हता, म्हणून मी हो म्हणाले, 

ते उठून जवळ आले, 
तसेही ते जवळ आले की आपोआपच हर्टबिट वाढायचे माझे व ते त्यात भर टाकत मुद्दाम असे काही करायचे ज्याने मी अडकायचे च त्यांच्या जाळ्यात, 
ते जवळ आले त्यांनी केसांना हात 
लावताच मी स्तब्ध झाले, त्यांनी वेडेवाकडे केस वरती लावले मुळात त्यांना ते खुप छान लावता येत होते असे नाही पण जवळ येण्यासाठी कारण हवे म्हणून हे सर्व चालू होते, 
त्यांनी केस वरती लावले,
 माझे काम झाले होते आता यांच्या जाळ्यात अडकण्यात अर्थ नाही हे समजताच मी 
"प्रिया ..........
म्हणून आवाज दिला" 

मी आवाज देताच हे पटकन दूर झाले व फॅन जवळ जाऊन हसू लागले, 
आम्ही दोघे ही हसत होतो एकमेकांकडे बघत, 
एक वेगळीच ओढ लागली होती दोघांनाही मला त्यांची की त्यांना माझी हे निरुतरीतच होते, 
आम्हाला सतत एकत्र वेळ घालवावा सा वाटायचा, सोबत राहण्यासाठी आम्ही कारणे च शोधत होतो, 
आता यांची ऑफिस व घर येणाची वेळ फिक्स झाली होती, 
नेहमी मित्रांसोबत गप्पा मारत बसणारे हे आता ऑफिस संपले की पटपट घराकडे निघत होते, 
हॉल, रूम, किचन हा आमचा प्रवास सतत चालू असायचा एकमेकांचा वेध घेत, 


आता मला सगळीकडे 
फक्त तो च दिसतो 
घर, रूम , किचन 
प्रवास सतत चालू असतो 

त्याच्या स्पर्शाने मी 
मोहित होते 
रोज रात्रीला त्यांचीच 
स्वप्न विनते 

आज त्यांचे नाव घेताना 
शब्दही अडखळले 
अनुभवते मी एक गाव 
स्वप्नाच्या पलीकडले

जाणून घेण्यासाठी अभिमान व मयुरी चा प्रवास सोबत राहा 
आवडल्यास लाईक नक्की करा,

🎭 Series Post

View all