स्वप्नांच्या पलीकडले (भाग 6)
( माघील भागात आपण पाहिले मयुरी चे मूल्यमापन करणाऱ्या लोकांचा तिला खुप राग येत होता आणि मूळतः स्पस्ट बोलणारी मयुरी या सगळ्याचा विरोध करत होती)
आता पुढे .........
नेहमीप्रमाणे मी लवकर उठून माझी कामे आवरून घेतली आज आत्या देखील जाणार होत्या त्यांनी अजून काही दिवस थांबावे अशी सगळ्यांची ईच्छा होती पण त्यांच्यावर देखील त्यांच्या काही जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांनी जाणे पसंत केले,
मी आत्या जाणार म्हणून आई ला कामात मदत करत होते,
तेवढ्यात आई नि कपाटातून एक डबा काढला व तो आजी च्या हातात दिला,
काय असेल त्यात ????
पण फक्त माझ्याच नजरेत शोध जाणवत होता
आई, आत्या, प्रिया, बाबा ,आजी व हे सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त समाधान होते
आई तो डबा हॉल मध्ये घेऊन गेल्या व त्यांनी तो आजीकडे दिला,
"मयुरी ये ...........
मयुरी
बाहेर ये ग ..........
"
आत्या च्या आवाजाने मी हॉलमध्ये आले,
सगळे हॉलमध्ये बसलेले होते
बाबा समोर खुर्ची वर आई , आत्या आई व आजी खाली बसल्या होत्या,
प्रिया कानात हेडफोन टाकून
सोप्यावर लोळत होती व तिच्या बाजूला शिल्लक असलेल्या जागेत हे बसले होते,
मी हॉलमध्ये गेले पण कुठे बसावं म्हणून उभा राहीले तेवढ्यात
"बस खाली" आजी मला जवळ घेत म्हणाल्या,
मी आजी जवळ खाली बसले,
" हे घे हे आपल्याला घराण्याचे दागिने आहेत,
परंपरेप्रमाणे जेव्हा नवीन सुनेची खात्री पटते की ती आपल्या घराण्याचा उद्धार करेल तेव्हा तिच्या स्वाधीन केले जातात,
आणि तू आमच्या परीक्षेत पास झालीस,
मी विचार करू लागले
मी बाहेरच्या लोकांना नाव ठेवत होते पण माझ्या घरात देखील तेच चालू होते,
पण मला विचार करून हसू आले यांनी चार दिवसात माझे असे काय मूल्यमापन केले की त्यांनी घराण्याची इज्जत माझ्या हातात दिली,
मी तो डबा हातात घेतला,
व आई कडे देत म्हणाले
"आई हे तुमच्याकडे च ठेवा जेव्हा गरज असेल तेव्हा मी घेत जाईल पण अजून तरी मी इतकी मोठी नाही झाले की मला ही जबाबदारी सांभाळली जाईल
माझी हात जोडून विनंती आहे की मला अगोदर तुमच्या पंखाखाली बळ मिळू द्या आताच उडायला नका सांगू
Please आई"
माझे बोलणे ऐकून आई च्या डोळ्यात पाणी आले,
त्यांना शब्द च फुटत नव्हते,
त्यांनी फक्त डबा घेतला व माझ्या कपाळावर एक किस करत माझ्या तोंडावरून हात फिरवला,
मी सगळ्यांच्या नजारा वाचण्याचा प्रयत्न करू लागले
सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला कौतुक वाटत होते फक्त हे सोडून
मी यांच्या कडे पाहिले तर ते
माझ्याकडे बघत च नव्हते,
अरे यांना आवडले असेल का माझे बोलणे मी मनाशीच म्हणाले,
मी सर्वांचे कौतुक स्वीकारून किचनमध्ये निघून गेले
मी घासलेले भांडे एक एक कपड्याने पुसून
रॅक वर लावत होते काम तर माझे चालू होते पण मी मनाने अजूनही तिथेच गुंतले होते,
मी माझ्या विचारात गुंतलेले होते व कुणीतरी आल्याचा भास झाला मी माघे वळून पाहिले तर हे होते
हे का ???
आले असतील
पण अगोदरचा राग मनात असल्यामुळे मी त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही ते आले स्वतः च्या च हाताने पाणी घेऊन पिले व मुद्दाम तिथेच गुटमळू लागले
त्यांना काहितरी बोलायचे आहे हे मला जाणवत होते पण मी मुद्दाम त्यांच्याकडे कानाडोळा केला,
मी काहीच प्रतिसाद देत नाही हे कळताच ते जवळ येऊन स्तब्ध झाले, बोलत तर काहीच नव्हते त्यांनी जवळ येत हातानेच मला धक्का दिला ते असे काही करतील हे मला अपेक्षित च नव्हते त्यामुळे त्यांनी जसा धक्का दिला तसे माझ्या हातातील
ग्लास खाली पडला,
त्या पडलेल्या ग्लास चा इतका आवाज आला की आम्ही नेमके काय करतोय किचन मध्ये हे बघण्यासाठी प्रिया धावत आली
तीला बघून हे आणखी गोधळले व ते पटकन निघून गेले मला खुप हसायला येत होते मी काही केल्या माझे हसणे थांबवू शकत नव्हते मला हसताना बघून प्रिया देखील हसू लागली व आम्ही दोघी हसत हसत हॉलमध्ये आलो तोपर्यंत हे गायप झाले होते,
आज आत्या जाणार होत्या व वातावरण बदल म्हणून त्या आजी ना देखील सोबत घेऊन जाणार होत्या,
मी अजूनही माझी कामे च आवरत होते आई ना दुपारी झोपलेले आवडत नव्हते त्या वेळेचा सदपयोग करावा असे त्या नेहमी म्हणत असे ,
उदा: दाळी निवडले , घराची सापसफाई करणे, प्रेस करणे, असे काम करत बसावे असा त्यांचा अट्टाहास असायचा
पण मला या कामाचा भारी कंटाळा मला त्या वेळेचा सदपयोग म्हणून पुस्तक वाचणे किंवा अभ्यासाशी निगडित काही कारणे असे वाटायचे पण आई चा शब्द मोडायचा नाही ही यांची शिकवन आठवली की मी पुन्हा त्या सांगेल ते ऐकायचे,
आत्या व आजी गेल्या होत्या
आता घर मोकळे मोकळे वाटत होते
आता घरात नेहमीची माणसे उरली होती
आई ला स्वयंपाक काय करायचा हे विचारून मी कामाला लागले
"तू फक्त पोळ्या कर भाजी मी करते"
आई चे हे एक वाक्य मला दहा हत्ती चे बळ देत होते
मी पोळ्या केल्या व आई नि भाजी सगळ्यांची जेवणं झाली व नेहमीप्रमाणे मी सगळी कामे आवरून हॉलमध्ये जाऊन बसले,
आज घर रिकामे रिकामे वाटत होते हे जेवण करून गेले तसे हॉलकडे थिरकले देखील नव्हते,
प्रिया अभ्यास करायचा आहे असे कारण सांगून तिच्या रूम कडे निघून गेली, बाबा हॉलमध्ये टीव्ही बघत होते. आई त्यांच्या जवळ टीव्ही बघत बघत वाती वळत होत्या प्रत्येकजण त्यांच्या कामात व्यस्त होता माझे ना टिव्ही कडे लक्ष लागत होत ना आईकडे
हे का आले नसेल बाहेर मी हाच विचार करत होते,
मी तरी रूम मध्ये कशी जाणार ना?
पाणी देण्याच्या निमित्ताने जाऊ का ?
हो चालेल मी पाणी देऊन येते
असे मनात ठरवून मी रूममध्ये पाणी घेऊन गेले,
पूर्ण कॉट एकट्याने व्यापून हे पालथे झोपले होते
मी गेले.... जवळ असलेल्या टेबल वर पाणी ठेवले
काही सेकंद ते उठतील याची वाट बघत उभा राहीले पण त्यांचे काही कळेना म्हणून पुन्हा जाण्यासाठी निघाले,
माहीत नाही का पण आज पाऊले अडखळत होती
पुढे पाऊल च टाकावे वाटत नव्हते
मी सारखी सारखी माघे बघत होते , अशीच अडखळत मी हॉल जवळ पोहोचले मी समोर दिसताच आई म्हणाल्या
"का....ग काय झालं काही हवंय का ????
"
मी फक्त मान हलवत नाही म्हणाले
"मग जा ना रूममध्ये"
आई रूमकडे हात करत म्हणाल्या "
मी मान हलवून हो म्हणाले
व रूमकडे निघून गेले,
मी रूममध्ये पोहोचले हे अजूनही त्याच पोजिशन मध्ये झोपलेले होते,
मी त्यांना सरकवण्याचा निरर्थक प्रयत्न केला पण ते सरकत नाहीत हे लक्षात येताच मी उपलब्ध असलेल्या जागेवर झोपले,
तेवढ्यात ते पालथे झोपलेले होते तर सरळ होऊन कुशीवर झाले आता मला मुबलक जागा मिळाली होती
ते शांत झोपलेत असा विचार करून मी उशी घेऊन झोपले
मी खाली झोपताक्षणी मला त्यांचा हात अंगावर पडल्याचा भास झाला मी मान वरती करून बघण्याचा प्रयत्न केला तर ते डोळे बंद करून हसत होते
अरे हे जागी आहेत म्हणून मी उठू लागले तर त्यांनी पुन्हा हाताला जोर देत
पळून जाते काय आता बोलावं कोण मदतीला येते,
"ओ .....
सोडा म्हणते बर
पुन्हा म्हणाल सांगितले नाही "
मी आवाज वाढवत म्हणाले
"हो का ???
मग ओरड व येऊ दे आई ला"
ते हसत म्हणाले
आता आपण यांच्या तावडीतून सुटू शकत नाही हे लक्षात येताच मी प्रतिकार करणे बंद केले,
माझा प्रतिकार कधी प्रतिसादात बदलला हे माझ्याच लक्षात आले नाही , मला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती व खुप उशीर देखील झाला होता,
बाप रे .............
मी ओरडले,
स्वप्नरंजित ती पहिली भेट
नयनसुखाऊन जाते
येणारी वाऱ्याची झुळूक देखील
त्यांच्या स्पर्शाने मोहित होते
नजरेतली ओढ त्याच्या
या नजरेने हेरली अशी
तहानलेला वाटसरू
मुगजळ शोधती तशी
हृदयातील प्रेम
डोळ्यात त्यांच्या दिसते
मनात खुप काही असताना
ओठांवर नि: शब्द असतं
त्यांच्यात स्वतः ला सामावत
आज मी त्यांच्याशी जोडले
मी अनुभवत होते एक
गाव स्वप्नांच्या पलीकडले
जाणून घेण्यासाठी स्वप्नातील प्रेम सोबत राहा व कथा आवडल्यास लाईक नक्की करा ,
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा