स्वप्नांच्या पलीकडले (भाग 4)
( माघील भागात आपण पाहिले मयुरी अभिमान ची रूम झाडण्यासाठी गेली होती व त्याच्या रूम मध्ये स्वतः चा फोटो बघून ती मनाशीच खुप खुश झाली)
आता पुढे ..................
" ओ .............
वाहिणीसाहेब
झोपल्या की काय रूम झाडता झाडता "
प्रिया च्या आवाजाने मी भानावर आले,
मी पण ना खरच मुर्ख आहे कशात पण गुंतते स्वतः च दोष देऊन मी बाहेर निघून गेले,
ताई ची जाण्यासाठी आवरा आवर चालू झाली मी ताई ची बॅग काय हवं काय नको ते सगळं आई जसे सांगतील तसे भरून दिले,
" तशी तुझी बायको शिकलेली आहे पण हुशार आहे बर ......
म्हणजे वाटलं नव्हतं पण आहे "
ताई म्हणाल्या
मी त्यांच्यात जास्त बोलतच नव्हते कारण ते कधी यू टर्न घेतील कुणीच सांगू शकत नव्हते,
ताई ची सगळी तयारी झाली व मला अजूनही माहीत नव्हते ताई ला हे सोडायला जाणार आहेत,
"मग नवरदेव परवानगी मिळाली का पण मुक्कामी राहण्याची "
प्रिया पुन्हा खेचत म्हणाली
"का ??
तिलाच नेतो ना सोबत "
हे न अडखळता म्हणाले
आता प्रिया ची चांगलीच फजिती झाली,
"बाप रे पाणी लागले ओ .......
एका पोराला....."
प्रिया पुन्हा जोरात म्हणाली,
"चल रस्ता सोड"
असे म्हणून हे ताई ची बॅग घेऊन गाडीकडे गेले,
ताई देखील सर्वांचा निरोप घेऊन गाडीत बसल्या,
मी फक्त यांच्याकडे बघत होते चोरट्या नजरेने पण यांनी एकदाही माझ्याकडे बघितले नाही,
ताई गेल्या व मी रूम मध्ये जाऊन रडू लागले,
मुळात मी रडण्याचे काही कारण च नव्हते ,
पण मलाच कळत नव्हते मला नेमके कशाचे वाईट वाटत होते,
हे मला न सांगता गेले याचे???
की
हे मुक्कामी थांबणार आहे याचे??
त्यांच्याशिवाय घरात करमनार नाही याचे
की
मला सोबत नेले नाही याचे ???
खुप वेळ रूम मधेच थांबून दिवे लागणीच्या वेळी मी बाहेर आले,
तोपर्यंत निशा आत्या, आई, बाबा, प्रिया यांच्या मस्त एक एक झोपा झाल्या होत्या .......
मी दिसताच
"वहिनीसाहेब मस्त चाय बनवा ना "
प्रिया ने हुकून सोडला
मी चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता गुपचुप किचनमध्ये निघून घेले,
मी चहा करत होते
पण लक्ष सगळे यांच्याकडे लागले होते,
पोहोचले असेल का ते
त्यांनी मला साधा एक कॉल देखील करू नये
असे एक ना हजार प्रश्न मनात आले,
सर्वांना चहा देऊन
मी रात्रीच्या स्वयंपाकाला लागले,
घरात नेहमीप्रमाणे हसी मजाक
चालू च होता पण मी त्यात कुठेच नव्हते,
कसे असते ना एक व्यक्ती तीही अनोळखी अचानक आपल्या आयुष्यात येते व आपले आयुष्य च बनून जाते,
आपले हसणे, खेळणे, रुसने, फुगणे , नटने , सवरने सगळं काही त्या व्यक्ती साठी च असते,
ती समोर नसली की आपला जीव कासावीस होतो
जसे माझे झाले होते,
हे आज येणार नाहीत हा विचारच मला स्वस्थ बसू देत नव्हता,
सारखे मन त्यांची आठवण काढत होते,
स्वयंपाकात अशीही माझी बोंब पडत नव्हती म्हणून मी व आत्या सोबत स्वयंपाकाला लागलो,
आज आई ना आराम दिला,
मी आत्या जसे सांगतील तसे करत होते तितक्यात प्रिया आली,
"मग वाहिनी साहेब काय आहे आज स्पेशल "
प्रिया ताई म्हणाल्या
"काही नाही नेहमीचेच "
मी शांतपणे म्हणाले
माझ्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघून ताई म्हणाल्या
" आत्या कोणाला तरी करमत नाहीये ग आज"
" कोणाला ग ".....
आत्या देखील सामील होत म्हणाल्या ,
"कुठे कोणाला मी गम्मत केली ग....."
पुन्हा माझी उडवत ताई म्हणाल्या,
या दोघींना काही विचारने म्हणजे मूर्खपणा आहे, असे म्हणून मी कामाला लागले
तेवढ्यात आई आल्या
चला आई ला तरी विचारू
म्हणून मी आई ला म्हणाले "आई ताई चे गाव खुप दूर आहे का??"
"नाही ग का???"
आई म्हणाल्या
"आई तू जा बाहेर आम्ही करतोय ना काम "
असा दम देऊन प्रिया ताई ने अशी ला काढून दिले,
आता काय करू कोण सांगेल ??
व हे पण कसे आहेत त्यांना आहे का काही काळजी
बायको नवीन आहे व खुशाल मुक्कामी गेले,
मी विचार च करत होते तोच प्रिया ताई ओरडल्या
" दादा आलास तू"
मी कुठलाही विचार न करता पळत दरवाजा मध्ये आले,
व इकडे तिकडे बघू लागले
पण समोर कुणीच दिसेना
मी माघे फिरले तोच
आत्या
प्रिया
जोरात असू लागल्या,
"काय वाहिणीसाहेब दिसला का तुमचा हिरो"
प्रियाताई पुन्हा खेचत म्हणाल्या
मी लाजून किचनमध्ये निघून आले,
सगळी कामे आवरली फक्त जेवण बाकी होते पण का कुणाचं ठाऊक कुणी जेवणाचे नाव च घेत नव्हते
का थांबले असतील हे सर्व पण विचारण्याची कुठे सोय होती
मी पण थांबले ते थांबले म्हणून
तेवढ्यात गेट उघडण्याचा आवाज आला मी बाहेर डोकावून पाहिले तर हे आले होते,
त्यांना बघून जो आनंद झाला तो शब्दात सांगणे अवघड होते
एका क्षणात माझा चेहरा खुलला,
मी जागेवरच मनातल्या मनात नाचत होते,
त्यांचे येणे माझ्यासाठी आनंदाची पर्वणी होते,
मी आपली उगाच कुशीत किचन हॉल किचन अशा चकरा मारत होते,
ते आतमध्ये आले आमची नजरेला नजर भिडली व त्यांनी नजरेनेच समजून सांगितलं अरे बावळट तुला न सांगता कसा थांबेल,
खरच मी पण मूर्ख आहे
मनाला मुर्खपणाची झालर लावून मी मोकळी झाले,
सगळ्याची जेवणं झाली
मी नेहमीप्रमाणे कामे आवरून
घेतले,
आज रूम मध्ये न जाण्यासाठी काहीच बहाणा नव्हता पण माझीच हिम्मत होत नव्हती,
मी आत्या चा आसरा घेत आज पुन्हा आत्या सोबत थांबले,
"आई पाणी ठेव रूम मध्ये"
हे आई ला आवाज देत म्हणाले,
मी न सांगताच उठले व पाणी ठेवले,
मी पाणी ठेऊन माघारी फिरले तरीही त्यांचे मुडके अजूनही पुस्तकात च होते,
मी नाक मुरडून निघून आले
तुझ्यावर रुसने
तुझ्यावर फुगणे
आयुष्य हे
तुझ्यासम जगणे
लटका राग माझा
लटकेच बोलणे
तुझ्या ओढीने तुटतात
सगळीच बंधने
यापूर्वी असे काही
ना कधी घडले
मी अनुभवते एक गाव
स्वप्नांच्या पलीकडले
कथा आवडल्यास लाईक नक्की करा
कारण आपला प्रतिसाद लेखनास प्रोत्साहन देतो
क्रमशः ...........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा