स्वप्नांच्या पलीकडले (भाग3)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 3) 

( माघील भागात आपण पाहिले श्रुती ने केलेल्या हट्टामुळे अभिमान तिच्या सोबत रूम मध्ये झोपला व मयुरी निशा आत्या सोबत सासूबाई च्या रूम मध्ये , पण मयुरी ला साडीची सवय नव्हती म्हणून अभिमान ने तिच्यासाठी पाठवलेल्या ड्रेस च्या आठवणीत मयुरी गुंतली होती ) 

आता पुढे .…................

सकाळी लवकर उठ बर असे अशी नि बजावल्यामुळे झोपताना च मनावर एक दडपण होते . 
मला सकाळी लवकर जाग येईल ना पण 
व नाही आली तर , 

नाही नाही मी का वाईट विचार करतेय येईल जाग, 

झोप व माझ्यात एक घट्ट नाते होते ती न सांगता च यायची व मनसोक्त राहायची आई चे बोलणे खाईपर्यंत , 

मी माहेरी कधी लवकर उठलेत नाही जर उठले असेल तर ते फक्त 26 जानेवारी व 15 ऑगस्ट ला च बाकी दिवस सूर्यनारायण भेटीस आले की मग आमची सकाळ होत असे. 

पण आता ते चालणार नव्हते, 
देवा लवकर जाग येऊ दे, 
असे देवावर संकट टाकून मी झोपी गेले. 

कालांतराने अचानक मला जाग आली, 
मोबाईल बघते तर काय 4:30 वाजले होते व बाकीचे अजून झोपेत होते, 

अरे वा म्हणजे मी वेळेवर उठले 
"शाब्बास मयुरी" 

स्वतः च स्वतः ची पाठ थोपटत मी कामाला लागले, 

स्वतःचे आवरून मी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेले, 

मोठा हिमतीने, 
धैर्याने मी किचनमध्ये गेले 
पण पुढे काय ??????? 

पुढे सगळी च बोंब होती 
मला एकावेळी एकच काम येत होते. 

म्हणजे बघा पोळ्या भाजणे , 
कणिक मळणे, पोळ्या लाटणे असे, 

मी आईकडे दिवसभरात एकच काम करायचे व तेच दिवसभर मी केलं मी केलं असे पूर्ण घरभर सांगत फिरायचे. 

पण आता त्यातील कुठलेच वर्क करत नव्हते, 
आता पोळ्या चे करेल मॅनेज 
नकाशे स्वरूपात पण भाजी चे काय होईल, 

लवकर उठून काहीच उपयोग झाला नव्हता हे लक्षात येताच 
याना मेसेज केला, 

मला भाजी बनवता येत नाही काय करू????

मेसेज बघता क्षणी उत्तर आले, 
बाप रे मेलो आता , 


अरे भाजी मला बनवता येत नाही व हे का मेले, 


जाऊ दे म्हणून मी कुणीतरी उठण्याची वाट बघत बसले, 

त्यावेळी ना जिओ होते ना  यूट्यूब 
मला घरील गुगल शिवाय पर्याय नव्हता म्हणजे आई शिवाय. 

आई किचनमध्ये आल्या, 

"तू उठलीस देखील " 
आई भांडे लावत म्हणाल्या 

अरे यार किती मूर्ख आहोत आपण भांडे तरी लावू शकत होतो ना असे उभे राहण्यापेक्षा 
पण काय करू इथे काही सुचतच नाही, 
पुस्तकी कीडा असलेली मी इथे एकदम कात टाकते, 

" हो 
म्हणलं ताई लवकर जाणार आहेत तर आवरून घेऊ" 
मी हळू  आवाजात म्हणाले 

"जास्त मनावर नको घेत जाऊ त्या 
मजा घेत होत्या तुझी " 


"म्हणजे " 
मी प्रश्नार्थक नजरेने आईकडे बघत म्हणाले 

" काही लवकर वैगरे जायचे नाही त्या मुद्दाम करत होत्या तुला रूम मध्ये जायला उशीर करण्यासाठी पण नेमकं तू त्यांच्या जाळ्यात अडकली व लवकर उठून बसली त्या बग कधी उठतात आता बर जाऊ दे उठली आहेस तर बाहेरचे झाडून घे व सडा टाक मी बघेल बाकीचे " आई शांतपणे म्हणाल्या 


बाप रे कसले घर आहे व कशी माणसे आहेत 
इथे मी रात्रभर नीट झोपले नाही लवकर उठायचे म्हणून आणि भुतासारखे लवकर उठून बसले आणि आता कळतंय की ताई व आत्या माझी मजा घेत होत्या , 

आता त्यांचा राग करू की 
स्वतःवर हसू 
अशी वेळ माझ्यावर आली होती, 
मी माझ्याच विचारात हॉल मध्ये आले व सहज हसू आले म्हणून हसले 

तर ते नेमकं ताई नि पाहिले 
" अग काकू तुझी लाडकी सुनबाई एकटी च हसतेय" 

त्या जोरात ओरडल्या 

आता काय करू मी यांना 
असे म्हणून मी हाताने च हात जोडून खुणावू लागले ताई शांत बसा म्हणून 
पण ऐकतील त्या ताई कसल्या 

" आणि हो नवी नवरी आम्हाला लवकर जायचे होते म्हणून लवकर उठली बर " 

असे म्हणून पुन्हा त्या व आत्या हसू लागल्या 

हे लोक हसतात का ??? 
सारखे सारखे 
मी काय याना जोकर वाटतेय का ?? 
जाऊ दे 

असे म्हणून मी आई ची मदत करू लागले अर्थात काही बोंब पडत नसल्यामुळे गॅस चा ताबा आईकडे च होता मी फक्त हाताजोघे काम करत होते 
म्हणजे कोथिम्बिर निवडून देणे, कांदा , टोमॅटो , मिरची चिरून देणे, 
हा डबा दे तो डबा दे , 
आई चे किचन म्हणजे साक्षात अन्नपूर्णे च घर होत. 
प्रत्येक वस्तू बरोबर सांगितल्या जागी मिळत होती व कटाक्षाने ती पुन्हा तिथेच ठेवायची हे देखील आई सांगण्यास विसरत नव्हत्या, 

आई चा स्वयंपाक झाला व मी किचनओटा पुसून घेतला आणि भांडे घासून घेतले, 


आता बाहेर हॉल मध्ये जायचे होते सर्वांना जेवणासाठी बोलवायला पण माझी काही हिम्मत होत नव्हती कारण अगोदर ताई, प्रिया, व आत्या नि यांना अर्धे ठेवले नव्हते टोमणे मारून मारून 

आता काय बुवा नवी नवरी स्वयंपाक करतेय, 
नवरदेवा चे   वासानेच पोट भरलं असेल, 
की रूम मध्ये जातो ताट घेऊन जेवायला 
हे काही काही शब्द किचनमध्ये देखील ऐकू येत होते. 
मुळात त्या मुद्दाम जोरात बोलत होत्या मी ऐकावे म्हणून

मी ऐकून न ऐकल्या सारखे केले 
व सर्वांना जेवायला वाढून दिले.

सर्वांचे जेवण होईपर्यंत मी तिथे च शांतपणे बसून होते, 
यांनी तर खाली मान घातली ती वरती केलीच नाही 


सर्वांचे जेवण झाले 
मी किचनमधील सर्व कामे आवरून घेतली.

"तुमची रूम झाडून घेतलीस का ग ?? " 

आई म्हणाल्या 

मी मानेने च नाही म्हणाले 

"जा मग झाडून घे" 

मी पुन्हा मान हलवली,

मी रूम झाडण्यासाठी गेले व बघते तर काय??? ........
रूम आहे की डम्पिंग ग्राउंड 
लोड एकीकडे, 
उश्या दुसरीकडे, 
बेडवर तर बेडशीट फक्त नावापुरते होते, 
कालचा त्यांचा ड्रेस शेजारील चेअर वर पडलेला, 
इतरवेळी असा पसारा बघून मला खुप राग येतो पण आज नव्हता आला , 
का ते माहीत नाही , 

मी रूम आवरून बाहेर येत होते व अचानक लक्ष बेडवर पडलेल्या पुस्तकाकडे गेले, 
उचलून ठेवण्यासाठी ते पुस्तक मी उचलले तर त्यातून मी यांना लग्नाच्या वेळी दाखवायला दिलेला फोटो खाली पडला, 
म्हणजे हे पुस्तक वाचायचं सोडून माझा फोटो बघताच, 
मला माझेच खुप कौतुक वाटले 

ती फोटो तसाच हातात घेऊन 
.............................

तुझ्या प्रेमाच्या सहवासाने 
माझी मीच मोहरते 
माझं तुझ्यातील अस्तित्व आठवून 
माझी मीच सावरते 

हृदयाचा तुझ्या नकळतपणे 
मी ठाव घेते 
ऋणानुबंध हे जपत 
मनाने मी तुझीच होते 

रूम मधून बाहेर पडताना 
पाऊले ही अडखळले  
मी अनुुभवते एक गाव 
स्वप्नांच्या पलीकडले


कथा आवडल्यास लाईक नक्की करा व शेअर करा 
आपल्या प्रतिक्रिया लेखकाला लेखनास प्रोत्साहन देतात, 

क्रमशः ..............

🎭 Series Post

View all