स्वप्नांच्या पलीकडले (भाग 27)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 27) 

( माघील भागात आपण पाहिले मयुरी च्या मनात प्रिया विषयी वादळ माजले होते पण ती शांतच होती कारण प्रिया ला दिलेला शब्द तिला खोटा ठरवायचा नव्हता) 

आता पुढे ..........


असेच हसत खेळत मस्ती करत दिवस जात होते, 
प्रिया हळूहळू अभ्यासाकडे लक्ष देत होती 
आता माझे तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष असायचे ती चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून 
बाबा च्या तब्बेतीच्या तक्रारी देखील हळूहळू वाढत होत्या, 
यांचे घर ऑफिस 
घर .....ऑफिस हेच चालू होते 
व आता मला देखील या सगळ्यांची सवय झाली होती 

माझ्या पूर्ण दिवस घरकामात जायचा व आई चा देव देव करण्यात 
कधी जर मला वेळ मिळाला तर एखादे छान पुस्तक मी वाचायचे पण जास्त नाही, 

उद्या तो दिवस उजाडणार होता ज्याची मी वर्षभर वाट बघते, 
एरव्ही लवकर झोपणारी मी त्या दिवशी बरोबर 12 पर्यंत जागते 
मग कसे ते विचारू नका ????

कारण मला रात्री 12 ला विष करायला व करून घ्यायला देखील आवडते, 
मी आवर्जून जागी 12 ला विष करते माझ्या जवळच्या लोकांना, 
उद्या माझा वाढदिवस होता व मी आजपासूनच खुश होते, 

मला ना पहिलं विष कोण करणार याची खुप उत्सुकता असायची, 
व या वेळी तर खुप वेगळं होत 
माझं हक्कच माणूस माझ्या सोबत होतं 
व पहिलं विष त्यांनी करावं ही देखील ईच्छा होती, 

नेहमीप्रमाणे सर्वांची जेवणं आवरून मी कामाला सुरुवात केली, 
कामे आवरून रूममध्ये गेले तर हे पुस्तक वाचत होते, 
मी बघून न बघितल्या सारखे केले व पडले कॉटवर 
आज आपल्याला काहितरी सरप्राईज मिळणार म्हणून मी खुश होते, 
मी डोळे बंद करून शांतपणे झोपण्याचे नाटक करू लागले, 
नेहमी बरोबर दहा ला झोपणारे ते आज 11 वाजले तरी जागीच होते 
मी देखील त्यांना झोपण्यासाठी आग्रह केला नाही

मी पडण्याचे नाटक केलं 
व बरोबर 12 च्या ठोक्याला मला जाग आली, 
नेहमीप्रमाणे पण मी दोन मिनिटं तशीच पडून राहिले म्हणलं बघू हे कसे उठवतात 
पण ते उठत नाहीत हे समजल्यावर मी हातात मोबाईल घेतला तर 12 वाजून 5 मिनिटे वरती झाली होती व साहेब गाढ झोपेत होते, 

" मी खरच मूर्ख आहे यार " 
मी स्वतः च्या डोक्याला मारत म्हणाले 

किती अपेक्षा करते ना 
मी पण एकपण पूर्ण होत नाही तरी 

असा विचार करून मी मला 12 ला विष करणार्यांना रिप्लाय दिले 
पण मन अजूनही यांची च वाट बघत होते, 
लग्नानंतर चा पहिला वाढदिवस होता माझा व मी अपेक्षा ठेवण स्वाभाविक होतं 
पण पुन्हा जाऊ दे म्हणून सोडून दिले व झोपी गेले, 

सकाळी त्यांच्या अगोदर उठून कामाला लागले, 

मी किचनमध्ये ओट्याकडे तोंड करून काम करत होते तोच कुणीतरी पाठीमाघून आले व माझे डोळे बंद केले 
मी एकदम खुश झाले मला वाटले हे च आहे 
पण हात त्यांचा वाटत नव्हता मग कोण असेल बर 
????
असा विचार करत होते तोच प्रिया बोलली 
 
"वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा वाहिणीसाहेब" 

अरे ताई आहेत का मी मनात म्हणाले 

"धन्यवाद " 
मी डोळे सोडवून घेत म्हणाले 

"हे घ्या आपल्यासाठी" 
त्यांनी गार्डन मधून तोडून आणलेले गुलाब दिले, 
आतापर्यंत प्रत्येक वाढदिवसाला महागडे गिफ्ट मिळायचे व यावेळी फक्त हे फुलं अगोदर मन तोड नाराज झाले पण पुन्हा विचार केला 
हे फुल तर प्रेमाचे प्रतीक आहे ना 
व आज या शुभदिनी मला नेमकं
तेच गिफ्ट मिळालं होतं, 
मी पुन्हा पुन्हा नाराज होत होते 
तेवढ्यात हे देखील आले 

"वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा मयू" 
हे देखील असे परक्यासारखे विष करून ऑफिस ला निघून गेले, 


माझा पूर्ण दिवस कामात निघून गेला दुपारी थोडे पडले तर सारखे अगोदरच्या व आत्ता च्या दिवसाची मी तुलना करत होते, 
कुठे मोठी पार्टी 
दिवसभर मिळणारे सरप्राईज गिफ्ट, 
मोठ्याप्रमाणात येणारे कॉल्स व मेसेज 
व आज 
घरातील व्यक्ती सोडले तर ना कुणाचे कॉल्स ना मेसेज व सरप्राईज तर दूर साध गिफ्ट सुद्धा दिसत नव्हते, 

सगळ्यात आनंदी जाणारा माझा दिवस 
आज सगळ्यात बोर चालला होता, 
संध्याकाळ झाली मी दिवे लावले व पुन्हा कामाला लागले, 
स्वयंपाक करत असताना यांची गाडी वाजली 
एक शेवटची आशा म्हणून मी पुन्हा उत्सुकतेने किचनच्या खिडकी मधून बाहेर डोकावले 
पण हाती निराशा च पडली 
हातात टिफिन घेऊन हे घरात आले, 
शेवटची आशा होती ती देखील दिवसासोबत मावळली , 

डोळ्यातून वाहणारे पाणी मी अलगद टिपले व तोंडावर पाणी मारले 
बाहेर आलेले अश्रू कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून पण मन आज खुप दुःखी झाले होते, 
मी सकाळपासून मूर्खा सारखी वाट बघत होते व याची या माणसाला जाणीव देखील असू नये ???? 
पण चुकी त्यांची देखील नव्हती 
कारण घरात कधीच कुणाचा वाढदिवस साजरा होत नाही व केक तर कधीच कापला जात नाही आई ना आवडत नाही हे सगळं, केक कापणे, मेणबत्ती विजवणे म्हणून 
हे प्रियताई ने सकाळीच सांगितलं होतं तरी मी मूर्खा सारखी वाट बघत होते 
मग चूक माझीच होती ना 

सगळ्यांनी जेवणं केली, 
माझे आज कशातच मन लागत नव्हते, 
राहून राहून मला माहेरची आठवण येत होती 
वर्षातील सगळ्यात आनंदाचा दिवस माझा फक्त रडण्यात  गेला होता, 

मी किचनमध्ये काम आवरत होते व हे आले 
आता पुन्हा स्वप्न बघून मला रडायचे नव्हते त्यामुळे मी शांतच होत,

"ये मयू मी मित्राकडे जाऊन येतो 
हॉलच दरवाजा लावू नको फक्त लोटून घे 
व तू झोप मी येतो लवकर च 
"हे सांगण्यासाठी हे किचनमध्ये आले होते, 

"हो " 
मी फक्त एक शब्द म्हणाले तोही नाराजी च्या स्वरात म्हणाले 
पण त्यांना कुठे गांभीर्य होत त्या नाराजीचे ते धावतपळत गेले मित्राला भेटायला , 
मी माझे सर्व कामे आवरून घेतले , 
आई बाबा झोपले होते 
प्रिया ने देखील रूमचा दरवाजा बंद केला होता , 
त्यांनी सांगितल्या प्रमाणे 
मी हॉलच दरवाजा बंद केला व रूममध्ये जाऊन पडले, 
मनात खुप विचार येत होते 
मान्य आहे घरात केक कापलेला चालत नाही , पण फक्त केक च सगळं काही नसतो ना , 
हे मला बाहेर देखील घेऊन जाऊ शकत होते 
नाहीकाही तर साधी एक कॅडबरी तरी
पण त्यांना तेही समजले नाही जाऊ द्या 
सगळं राहील पण आज हे फक्त सोबत जरी थांबले असते तरी खुप झाले असते मला 
असे मी मनाशी च म्हणाले पण जाऊ द्या नशीब आपले असे म्हणून मी झोपी गेले 


"ये मयू झोपलीस का ग 
उठ ना ....."यांचा आवाज माझ्या कानावर आला 

"हो 
व तुम्ही पण झोपा सकाळी बोलू "मी यांना समजावत म्हणाले 


"नाही आत्ता उठ एक गंम्मत आहे" हे हट्ट करत म्हणाले 


"बोलू ना ओ सकाळी"
मी नाराजीने म्हणाले 

"अग तुझ्यासाठी सरप्राईज आहे " 


"सरप्राईज " 

हा शब्द ऐकताच मी ताडकन उठून बसले 

व बघते तर काय 

घरभर त्या झिरो लाईट चा पिवळा रंग पसरला होता, 
रूममध्ये सगळीकडे लाल रंगाचे हार्टशेप फुगे दिसत होते, आज पाण्याच्या टेबलवर केक ठेवलेला होता व तोही माझ्या आवडीचा 

तो पिवळा रंग 
ते फुगे 
चॉकलेट चा केक 
व त्यांच्याकडे एकटक बघणारी मी

"हे सगळं माझ्यासाठी आहे " 
मी आनंदाने म्हणाले 

"नाही गाव लोकांसाठी " हे माझी खेचत म्हणाले 


"काय ओ .......पुन्हा झाले चालू   Thank you so much " 
मी त्यांचा हात पकडून म्हणाले 


"काय यार एवढ केलं म्हणलं 
नाही किस तर किमान हग तरी मिळेल पण आमच्या नशिबात फक्त धन्यवाद" 
ते माझ्याकडे बघत म्हणाले 

"बर असे म्हणून मी त्यांना मिठी मारली " 


मग आम्ही दोघांनी केक कापला उरलेल्या केक चे करायचे काय 
जो संपवाता येईल तो संपवून बाकीच्या केक ची विल्हेवाट लावायची ठरली 

मी सगळी रूम आवरून घेतली व पडले 

"मॅडम झोपल्या का ???
"हे पुन्हा खोड काढत म्हणाले 

"हम्मम्म" 
मी फक्त हम्मम केलं 


"गिफ्ट राहील की असे म्हणून त्यांनी एक बॉक्स काढला 

काय असेल त्यात 
मी आनंदाने उघडला तर त्यात डिझायनर साडी होती 
मी नेहमीप्रमाणे अगोदर किंमत पहिली तर 3200 रु त्या साडीची किंमत होती 

मी हातात साडी घेतली व डोळ्यातील पाण्याला वाट मोकळी करून देत 
त्यांच्या कुशीत विसावले 

क्रमशः ................

🎭 Series Post

View all