स्वप्नांच्या पलीकडले (भाग 26)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 26) 

( माघील भागात आपण पाहिले अभिमान मयुरी च्या उदास चेहऱ्याचे कारण विचारत होता पण मयुरी शांतच होती) 

आता पुढे ..............

हे मला सारखे सारखे विचारत होते 
व मी त्यांना टाळत होते, 

"मला थोडे लिहायचे आहे तुम्ही झोपा बर आपण उद्या बोलू " मी यांना टाळत म्हणाले 

"ये मयू 
ही काय तुझी लिहिण्याची वेळ नाही 
ते तू नंतर पण करू शकतेस 
बर नको सांगू काय झालं पण बोल तरी माझ्याशी 
तसेही किती दिवस झालेत आपण मनमोकळे पणे बोललो नाहीत एकमेकांनशी " 
ते माझा मूड ठीक करण्यासाठी म्हणाले 


"ओ .....
जशी वेळ लिहायची नाहीये ना 
तशी गप्पा मारायची पण नाहीये 
उगाच कारण नको 
झोपा " 
मी प्रतिउत्तर देत म्हणाले कारण त्यांच्या सोबत  बोलता बोलता मी कधी सत्य बोलून जाईल हे माझे मलाच कळणार नाही 
हे मला माहित होते 

"उगाच काही पण 
कित्येक रात्री त्या निरभ्र आकाशाकडे बघत आपण टेरिस वर काढल्यात इतक्या लवकर विसरली देखील 
ये मयू चल ना 
जाऊयात आज पुन्हा वरती 
थोडाच वेळ थांबू....
खुप जावेसे वाटतेय मला " 
ते हट्ट करत म्हणाले 

"बर बर 
जाऊयात 
पण लवकर खाली येऊ 
कुणी बघण्यापूर्वी 
" मी अट घालत म्हणाले 

"हो चालेल ना 
तुला बोर झाले की लगेच येऊ " 

ते माझी समजूत काढत म्हणाले पण आता खुप वेळ वरती जाणार हे फिक्स होते 
कारण मलाच रात्री ची शांतता, टेरिस, व ते निरभ्र आकाश खुप आवडायचे, हे त्यांना माहीत होते 

आम्ही दोघे ही वरती गेलो 
ती रात्री ची शांतता, दूरवर पसरलेले विजेचे दिवे, 
निरभ्र आकाश व त्यात लुकलूकनाऱ्या त्या चांदण्या 
हे सगळे बघून मीच चालू झाले 

"अहो तुम्हाला माहीत आहे मला हे असे रात्री आकाशाकडे बघत दोनी हात पसरून मोकळा स्वास घ्यायला खुप आवडते, या काळोखाचे व माझे जन्मजन्मांतरी चे काहितरी नाते आहे असे मला नेहमी वाटते नाहीतर उगाच का एखाद्या गोष्टीची आपल्याला इतकी ओढ असते, 
ते तारे दिसताय ना 
ते बोलतात माझ्याशी 
कित्येकवेळा माझी अनेक दुःख मी त्यांना सांगितलीत 
व ते समजूनही घेतात मला, 
जर कधी अचानक एखादा तारा ढगाआड गेला ना तर जीव कासावीस होतो माझा 
तो कोण असेल ??
कुठे गेला असेल ??? 
अस सतत वाटत मला 
आणि दुसऱ्या च क्षणी ते ढग जाऊन तो स्पस्ट दिसू लागला की पुन्हा आनंदित होते मी 
म्हणतात हे तारे आपले पूर्वज असतात 
ते आपल्याला बघतात व भरभरून आशीर्वाद देतात, 
जेंव्हा मी तुमच्या आयुष्यातून जाईल ना तर तुम्ही मला असे ताऱ्याच्या रुपात बघत जा मी येत जाईल तुम्हांला भेटायला " 
माझ्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले 

"तू थोडी बावळट आहे का ग 
तुझा चेहरा सुकला होता तुला बर वाटावं म्हणून मी तुला वरती घेऊन आलो आणि
तू अजून डोक्याच दही केलंस 
आणि कुठे जाणार आहेस तू 
मूर्ख कुठली  ......" 
ते रागात म्हणाले 

"सॉरी ओ गंम्मत केली 
मी कुठेही जाणार नाही 
मी जर गेले तर तुम्हांला त्रास कोण देईल " मी त्यांना बिलगत म्हणाले 

"हो का 
मी जाऊ देईल तेंव्हा ना " 
त्यांनी मिठी आणखी घट्ट केली 

"बर ऐका ना एक विचारू " मी संधी चा फायदा घेत म्हणाले 
कारण कित्येकवेळा अशी परिस्थिती आली की मी जे पाहिजे ते पटकन माघून किंवा बोलून घ्यायचे कारण 

"हम्मम्म्मम्म्मम 
बोल काय म्हणतेस " 
ते म्हणाले 


"तुम्हांला प्रिया साठी कसा मुलगा पाहिजे " 
मी घाबरत च म्हणाले 


"कसा म्हणजे " 

ते प्रश्नार्थक नजरेने म्हणाले 


"म्हणजे कसा 
तुमच्या अपेक्षा काय ?????" 

मी माहिती काढून घेण्यासाठी म्हणाले

"मला ना तिच्यासाठी राजकुमार सारखा मुलगा पाहिजे तू इतका हँडसम असावा की लोक बघूनच थक्क झाले पाहिजे 
माझी एकुलती एक बहीण आहे यार ती ...
मी तिचे लग्न रात्री चे करणार आहे 
स्वतः चे च करण्याची ईच्छा होती पण तुझ्या बाबा नि काही ऐकले नाही 
पण ते जाऊ दे 
आता आपण तिच्या लग्नात आपली ईच्छा पूर्ण करून घेऊ 
मी तिच्यासाठी नोकरिवाला नाही तर स्वतः चा बिझनेस असलेला मुलगा बघणार आहे, 
सगळी सुख तिच्या पायदळी लोळण घेत पडली पाहिजे 
आणि शेवटचं मी तिला याच शहरात देणार आहे म्हणजे मला जेव्हा पाहिजे तेव्हा तिला भांडायला जाता आले पाहिजे " 
असे म्हणून हे हसू लागले 

"हो का छान ....." 
मी फक्त एवढेच म्हणाले 
दुसरे सांगू तरी काय 
स्वतः च्या बहिणीसाठी इतके स्वप्न बघणाऱ्या व्यक्ती ला  कसे सांगू 
तुमच्या बहिणीने स्वतःसाठी मुलगा बघितला व तोही अपंग 

परिस्थिती मी लपवू शकत होते पण वास्तव कसे बदलणार ना 
त्यामुळे मी सध्या तरी गप्प 
राहणे पसंत केले, 
आज मी त्यांच्यापासून पहिल्यांदा काहीतरी लपवले होते 
व त्यातच माझ्या कुटुंबाचे हित होते ,


"बर चला 
खुप उशीर झाला जाऊयात खाली 
"असे म्हणून मी त्यांना खाली  आणले 

आम्ही रूममध्ये आलो 
आज खुप छान वाटत होते 
पण मनात कुठेतरी प्रिया अजूनही घोळत होती 
तिच्या नात्याचे भविष्य मला समजले होते पण ती समजून घेईल का???
तिला समजेल का तिच्या दादा ची माया, प्रेम ,काळजी
की करेल ती तिच्या दादा ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा 
आता हे येणारी वेळ च ठरवेल असे म्हणून मी डोळे बंद केले 

डोळे बंद केल्यावर ते चांदणे माझ्याकडे बघून हसताय असा भास मला झाला 
तेवढ्यात मी डोळे उघडून माझ्या चंद्राकडे पाहिले ते ते झोपले होते निवांत , 
कसे नाते असते ना नवरा बायको चे 
सगळा आटापिटा एकमेकांन साठी चाललेला असतो 
पण जाणवू देखील द्यायचा नसतो 
आज माझा उदास चेहरा बघून 
आवडत नसताना ही नकळत का होत नाही पण हे माझ्या आनंदात सामील झाले च की 
जसे खुप कंटाळा आलेला असताना ही मी उठून यांच्यासाठी काही बनवते तसे 

मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं 
अस बोलून कधीच दाखवायचं नाही पण मी करणार नाही, आणणार नाही असे म्हणून गुपचूप घेऊन यायचं 
प्रेम यालाच म्हणतात का ???
मग जर हे प्रेम असेल तर प्रिया ल मी चुकीचे कसे ठरवू 
व मग यांचे काय 
त्यांनी त्यांच्या बहिणीच्या सुखाची अपेक्षा करणे चुकीचे आहे का ????
या सगळ्या विचारात मी झोपी गेले, 

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 
मी माझ्या कामाला लागले, 
आज मनावरील व शरीरावरील सगळी मरगळ संपली होती , 

प्रियताई येताच मी प्रसन्न चेहऱ्याने त्यांचे स्वागत केले, 

माझ्या चेहरा बघून त्याही खुश झाल्या 
कारण गेले दोन दिवस 
आम्ही दोघी  शांतच होतो

 "मी मदत करू तुम्हांला " 
प्रिया जवळ येत म्हणाली 


"नाही नको ताई करते " 
मी सहज म्हणाले 

"हो हो अग करू दे 
जर मुलीला काही आले नाही 
तर सासरचे लोक आई चा उद्धार करतात व माझा उद्धार करावा असे मला वाटत नाही " 
आई हसत म्हणाल्या 


"आई मी तिच्यासाठी मुलगा च असा बघणार आहे की माझ्या बहिणीला काही काम च करावे लागले नाही पाहिजे " 
हे प्रिया च्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, 

अशावेळी प्रिया ने लाजने अपेक्षित होते पण तिचा चेहरा पडला 
मला देखील सगळं माहीत असूनही त्यांच्या हश्यात सामील व्हावे लागले पण प्रिया चे काय 
ती तर हिरमसून गेली होती, 
तिला सध्यातरी तिच्या प्रेमाचीच बाजू योग्य वाटत होती, 

पण ठरेल का तिची बाजू योग्य ????
की तिचा निर्णय करेल निर्माण मध्ये मोठी दरी ?????

जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
आवडल्यास लाईक करा 
क्रमशः ..................

🎭 Series Post

View all