Login

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 25)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 25) 

( माघील भागात आपण पाहिले मयुरी ने प्रिया ला कॉल वर बोलताना पाहिले होते 
व त्याच विचारात ती रूममध्ये जाऊन झोपी देखील गेली) 

आता पुढे .......................


नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठले, 
पण आज मनावर कसले तरी ओझे होते, 
माळ पटकन प्रिया ची आठवण आली 
तशी माझी पाऊले त्यांच्या रूमकडे वळली 
रूम चा दरवाजा फक्त लोटून घेतलेला होता मी आतमध्ये प्रवेश केला तर समोर प्रिया झोपलेली दिसली मनाला बर वाटल
खरच वैरी देखील इतका विचार करत नसेल इतका मी केला होता,

त्याच्या रूमचा दरवाजा हळूच बंद करून मी माझे काम आवरू लागले  

आई, बाबा, हे सगळे त्यांचे त्यांचे आवरून हे व बाबा हॉलमध्ये बसले पेपर वाचत 
आई माझ्या मदतीला आल्या 
माझे लक्ष सगळे प्रियाकडे लागले होते, 
ती अजूनही रुम च्या बाहेर आली नव्हती, 
मी सर्वांसाठी नास्ता केला, आई, बाबा व यांना हॉलमध्ये देऊन 
मी किचनमध्ये गेले, 
मी माझी व प्रिया ची प्लेट भरत होते तोच प्रिया किचनमध्ये आली 
आज ती माझ्याशी नजर चोरुनच बोलत होती, 
चेहऱ्यावर भीती पसरली होती 
नेहमी ची हसरी प्रिया आज शांत झाली होती, 

"प्रिया तुम्हांला इथे घेता की समोर देऊ" 
मी प्रिझ मधून बॉटल काढत म्हणाले 

 "नाही  नको
 मला  भूक नाहीये " 
प्रिया शांतपणे म्हणाली 

"अरे असे कसे 
कुठे गेली तुमची भूक 
ते काही नाही चला आपल्या दोघीना पण घेऊ " 
असे म्हणून मी दोघींना प्लेट घेतल्या 
प्रिया चे खाण्यात देखील लक्ष लागत नव्हते, 
तिने नास्ता केला व ती परत रूममध्ये निघून गेली, 

मी माझे काम आवरू लागले 
नास्ता, जेवण, कपडे, भांडी सगळं आवरून झाले 

हे ऑफिस ला गेले होते 
आई ना त्यांच्या बीसी चे काम होते, 
बाबा हॉलमध्ये आराम करत होते, 

मी काम आवरून रूममध्ये जाणार तोच प्रिया ने आवाज दिला, 
"वहिनी ओ  ....वहिनी 
इकडे या ना 

त्यांनी हळू च आवाज दिला 


"हो आले " 
मी जागेवरुन च आवाज दिला

मी त्यांच्या रूम मध्ये गेले अर्थात कालचा अर्धवट राहिलेला विषय असेल हे मला कळून चुकले होते, 
मी प्रिया समोर जाऊन बसले 
ती अजूनही शांत होती 
ती फक्त हात चोळत बसली माझ्या समोर 
कधी रूममधील ठेवलं कडे बघत होती तर कधी त्या फ्लॉवर पॉट कडे, 

"काय झालं सांगणार का आता " मी त्यांचा हात हातात घेत म्हणाले 

"हो वहिनी 
पण कळत नाहीये कशी सुरवात करू " 
तो अवघडल्या सारखे बसत म्हणाली

"बिनधास्त बोला 
जे खर आहे ते 
मी देईल साथ" 
मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवत म्हणाले 
आता त्यांना धीर आला व त्या बोलू लागल्या 

"आम्ही आता निशा आत्याकडे गेलो होतो ना 
तो त्यांच्या शेजारी राहतो 
आमची पेसबुक वर ओळख झाली होती , 
त्यांचे नाव रोहित 
इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला शिकतोय 
आमची ओळख झाली तेव्हा ती आत्या शेजारी राहतो हे माहीत नव्हते 
जेव्हा आम्ही आत्याकडे गेलो तेव्हा मी त्याला पहिल्यांदा समोरा समोर पाहिले 
खुप चांगला आहे तो व हुशार देखील बाबा ना व आई ला पण आवडला पण आमचे काही त्यांना माहीत नाही
पण please तुम्ही  कुणाला 
सांगू नका????
वेळ आली की बघू " 
प्रिया भावुक होऊन बोलत होती 

"जात कोणती आहे 
म्हणजे नंतर अडचण नको " 
मी चौकशी साठी म्हणाले 

"आपलीच आहे 
तो दुरून नात्यात लागतो आत्या च्या " ती शांतपणे म्हणाली 

"अरे वा मग जमतंय की 
तुम्ही नका काळजी करू 
असे योगायोग घडून आणेल की लोकांना प्रश्न पडेल प्रेमविवाह आहे की ठरवून केलेले लग्न 
तुम्ही निवांत राहा 
आता मी आहे ना 
"
मी आनंदाने म्हणाले


"हो वहिनी 
पण पुढे ऐका ना ....
तो थोडासा कमरेत लचकतो 
म्हणजे पाय आहे पण एक पाय थोडासा कमी आहे म्हणून चालताना जाणवते 

ती माझ्याकडे बघत म्हणाली 

"हो का ......." 
आता मी निःशब्द झाले होते 
पाच मिनिटं पुर्वी चा आनंद संपला होता, 
मुलगा अपंग आहे 
व घरचे कसे मान्य करतील 
व मी तरी कसे तयार करू त्यांना कारण मी केले असते का अपंग मुलांसोबत लग्न 
आई ला काय वाटेल ,
मी च विनाकारण फूस लावली असे नको व्हॉयला

पण प्रिया ला तर शब्द देऊन बसले होते आता काय करू 

"वहिनी कुठे हरवलात 
पण please दादा ला सांगू नको 
तुला शपथ आहे माझी 
मी नाही जगू शकत ग त्याच्या शिवाय व तुला सांगू असेल तो अपंग पण मला मान्य आहे 
देवाने त्याला एका गोष्टीने कमी ठेवले पण यात त्याची काय चूक 
व आपण जर त्याला असे वेगळे गृहीत धरले तर तो कसा जगेल त्या अपंगत्वा सोबत 
तो कसे करेल त्याचे स्वप्न 
पूर्ण ??
अडाणी लोकांचे ठीक आहे पण आपण तर सुशिक्षित आहोत ना 
पण आपल्याला शोभते असा भेद करायला 
सांग ना ग 
व आयुष्य जगण्यासाठी प्रेम लागत 
आपण आपल्या जोडीदारा कडून फक्त तीच अपेक्षा करतो 
मग तो माझ्यावर प्रेम करतो हे पुरेसे नाहीये का ???
तसेही प्रेम कुठे माणूस बघून केलं जातं ते तर आपोआप होत ना
माणूस बघून केलं जातं ते क्षणिक आकर्षक असत जे वयासोबत संपून जातं 
पण खरं प्रेम चिरतरुण चिरकाल टिकणार असत ग, 
मी राहील ग त्याच्या सोबत 
कधीच तुमच्याकडे कुठलीही तक्रार करणार नाही 
पण मन त्याच्यात अडकून दुसरीकडे खुश देखील राहू शकत नाही, 
माझं खुप प्रेम आहे त्याच्यावर 

प्रिया च्या डोळ्यातून पाणी वाहत होते , तिचे शब्द माझ्या काळजाला जाऊन भिडले 
या इतक्याश्या जीवाला कशाला पाहिजे इतका लोड 
तिचा शब्द न शब्द खरा होता पण 
या व्यावहारिक जगात हे कोवळं प्रेम टिकेल का ???
तिला फक्त एक बाजू दिसते तिचे प्रेम 
पण घरच्यांच्या अपेक्षा 
समाज 
त्याचे अपंगत्व 
व भविष्यात येणाऱ्या अडचणी या सगळ्यांपासून ती अनभिज्ञ च होती 
तिने हे अपंगत्व स्वीकारल होत पण जर ते आनुवंशिक असेल तर 
????
तिच्या लेकरांच्या भविष्याचे काय ??
हे कसे स्वीकारतील त्या मुलाला 
अशा विचारात मी अडकून पडले 

"वहिनी बोला ना काय झाले " 
प्रिया मला हलवत म्हणाली 

"हो ......
हे बघा प्रिया ताई 
मान्य आहे प्रेमाशिवाय आयुष्याला अर्थ नाही पण प्रेम सगळं काही असते असे नाही 
आयुष्य जगताना 
पैसा, माणुसकी, सामाजिक बांधिलकी, हे देखील जपावं लागत 
त्यामुळे आता आपण या विषयी घरात नको बोलायला 
योग्य वेळ आली की मी बोलेल फक्त तुम्ही तुमच्या मर्यादा नका ओलांडू 
" मी त्यांना धीर देत म्हणाले 

"हो चालेल फक्त दादा का काही बोलू नका " त्या माझ्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या 


"हो नाही सांगणार 
नका काळजी करू "
मी त्यांना शब्द देत म्हणाले 
पण मनात सतत धाकधूक चालू होती आज आपण काही चुकीचे तर करत नाही आहोत ना, 

दिवभरातील सगळं आवरून संध्याकाळची जेवण देखील झाली पण आज आम्ही दोघीही शांतच होतो 
काय बोलावे तेच कळेना, 
आज कधी नव्हते ती प्रिया मला भांडे घासू लागली, 
अर्थात तिलाही मनात भीती असेल वहिनी दादा सांगते की काय ?????
पण माझी खुप मोठी कोंडी झाली होती 
एक तर प्रियाला दिलेला शब्द 
कुणाला काहीच न सांगण्याचा 
व यांना दिलेलं वचन की आयुष्यात कधीच एकमेकांन पासून काही लपवणार नाही
पण आज मी लपवले होते 
व जेव्हा त्यांना कळेल मी त्यांचा विश्वास तोंडला तेव्हा त्यांना काय वाटेल ही कल्पना देखील करवत नव्हती

पण खुप वेळा घरातील माणसाच्या सुखासाठी 
काही गोष्टी लपवाव्या लागतात व आज मी तेच केले होते 
पण आता वेळच ठरवणार हे चूक आहे की बरोबर 
मी माझ्याच तंद्रीत सगळी कामे आवरून रूममध्ये आले 
हे मला खुप वेळ पासून नेहाळत आहेत हे देखील माझ्या लक्षात आले नाही 
 
"ओ 
मॅडम 
काय झाले कुठे हरवलात 
" हे माझा हात ओढत म्हणाले 

"नाही ओ 
कुठे नाही 
असेच "मी टाळत म्हणाले 

"मयू तू काही लपवत तर नाहीस ना 
कारण तुझा चेहरा बोलतो माझ्याशी मला बरोबर कळते काय झाले ते म्हणून म्हणालो 
सांग वर पटकन काय झालं "
हे हट्ट करत म्हणाले 

"बाप रे यांच्या तावडीत सापडले तर सगळं खरं काढून घेतील 
व मी ताई ला शब्द दिला आहे तो मी मोडू नाही शकत मग काय करू ???"

माझ्या समोर खुप मोठा प्रश्न उभा होता व काय करावे काहीच कळत नव्हते , 

काय असेल मयुरी चा निर्णय 
पाळील शब्द की 
जपेल वचन 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा व आवडल्यास लाईक करा 

क्रमशः  ...........

धन्यवाद

🎭 Series Post

View all