Oct 27, 2020
स्पर्धा

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 23)

Read Later
स्वप्नांच्या पलीकडले (भाग 23)

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 23) 

( माघील भागात आपण पाहिले मयुरी किचनमध्ये चहा बनवत होती व तेवढ्यात अभिमान तेथे आला व मयुरी ल बघून ओरडला ) 

आता पुढे ..................

मी चहा ओतत होते व यांच्या ओरडण्याने मी भानावर आले
 
चहा कपबशी ओलांडून ओट्यावर पसरला होता, 


"मयू 
काय केलंस हे लक्ष कुठे आहे तुझे " 

हे काळजी करत म्हणाले 

"सॉरी 
काही नाही " 

मी घाईघाईने तो सांडलेले चहा पुसून घेण्याचा प्रयत्न केला त्यात तो गरम त्याने हात पण भाजला 

"आई  आईईईईई ......ग "
मी कळवळून म्हणाले 


" अग मयू 
काय चालू आहे तुझे तू बस बर समोर " 

त्यांनी मला तसाच हात पकडून हॉलमध्ये आणले व पटकन हाताला

मलम लावला 
पटकन मलम लावला म्हणून फोड वैगरे काही आले नाही पण हात खुप लाल झाला, 

"घे बर तू एकदा आई सोबत बोल तुला बर वाटेल " 
असे म्हणून त्यांनी मोबाईल माझ्या हातात दिला 

"हॅलो 
आई 
कशा आहात तुम्ही ........." 
बस एवढे म्हणून मी शांत झाले  यापुढे काही बोलवेना 

"काय ग बाळ काय म्हणतेस " 
समोरून आवाज आला बाळ ......

हा शब्द ऐकून मी शॉक झाले अरे ही तर माझी आई आहे 
म्हणजे यांनी तिला कॉल लावला 
मला वाटलं होतं आमच्या आई ला लावतील 

"काही नाही ग आई सहज 
बर ऐक एक काम आहे नंतर बोलू 
चालेल ना " 
असे म्हणत मी घाईत कॉल कट केला 

"अहो तुम्ही 
आई ला कॉल लावला 
मला वाटले आपल्या आई ला लावताल" 

मी त्यांच्याकडे नजर रोखून म्हणाले 

"मला वाटलं तुला तुझ्या आई शी बोलून बरे वाटेल 
पण छान वाटलं तू आपली आई असे म्हणाली " 

"त्यात काय आई आहेत आपल्या म्हणून म्हणाले" 

त्यांनी फक्त प्रेमाने माझ्याकडे पाहिले व आनंदाने आई ला कॉल लावला 
पण हा अनुभव मी खुप वेळा घेतला होता 
मी त्यांच्या नात्यातील कुणाशी प्रेमाने वागले किंवा त्यांच्या माणसांना आपले म्हणाले की ते लगेच आनंदित व्हॉयचे 

"हॅलो आई कशी आहेस
हे घे तुझ्या सुनाशी बोल तिला बोलायचे आहे " 
असे बोलून त्यांनी मोबाईल दिला 


"हॅलो मयुरी बोल ग ....." 

आई नेहमीप्रमाणे म्हणाल्या 


" हॅलो 
आई ........." 

मी फक्त इतके च बोलले व रडू लागले


"अग मयुरी काय झाले 
मला नीट सांगशील का ??
तू रडणे थांबावं बर अगोदर 
ये मयुरी .....
काहीतरी बोल ......." 

आई कळवळून विचारात होत्या व मी फक्त रडत होते 
आता यांना देखील काय करावं कळेना त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला व 
" आई नंतर कॉल करतो ग ......."
असे म्हणून कॉल कट केला 

व मला समजावू लागले 
"मयू वेडी आहेस का ग थोडी 
असे कुणी रडते का ??
तू काय लहान आहेस का ??
उगाच काही पण आपले 
काय वाटेल आई ला 
तिला करमेल तरी का आता 
एक तर मी विचारतोय काय झाले तर मलाही सांगेना 
व आता फक्त रडतीस 
अवघड आहे खुप तुझे " 
ते एका दमात बोलून गेले 

"सॉरी ओ .....
पण मला नाही करमत एकटीला 
आई सोबत असल्या की काही नाही वाटत 
सतत एक धाक एक टेन्शन असते काही चुकेल का 
लवकर जाग येईल ना ??
एक तर आई पण नाही 
इथे ...." 
असे म्हणून मी पुन्हा रडायला चालू केले 


"वेडी माझी बायको 
तू ना खरच लहान आहेस अजून" 
असे म्हणून त्यांनी मला जवळ घेतले , 
पुन्हा त्यांच्या कुशीत बर वाटल्याने मी सगळं विसरून कामाला लागले 
रात्री चा स्वयंपाक, जेवण सगळे आवरून मी रूममध्ये आले 
हे पुस्तक वाचत बसले होते 
मी आपली जाऊन गुपचूप कॉटवर पडले, 
माणसाचे वर्तन हे त्याच्या मनाचा आरसा असते हे आज माझ्या बाबतीत स्पस्ट दिसत होते, 
मी कूस बदलून ते पुस्तक वाचत बसले होते त्याच्याकडे बघू लागले 

"काय मग मॅडम 
आता पुन्हा रडायचे नाही का ???
शेवटचं होऊन जाऊ दे ना एकदा 

तुला एक सांगू मयू ........." 

त्यांनी पुस्तक तसेच होताच ठेवत 
एक नजर माझ्यावर टाकली व म्हणाले 

"काही नको मला माहित आहे 

"मी रडताना व रडल्यावर दोन्ही वेळी खुप छान दिसते " 

मी नाक मुरडत, डोळे थोडे बंद करत त्यांचे बोलणे अर्धवट तोडत म्हणाले 

" बिल्कुल नाही 

तू रडताना कशीच छान दिसत नाहीस व मला आवडत देखील नाहीस त्यामुळे रडत जाऊ नको ना ग राणी  please ....." 


ते पुस्तक ठेऊन देत माझ्याकडे बघून म्हणाले, 

"झाले का ओ तुमचे चालू 
कधीतरी सेरियसली घेत जा 
नेहमी गंम्मत वाटते तुम्हांला " 
मी नाराजी व्यक्त करत म्हणाले 


"अग बायको सिरीयस लोक आय   सी यू मध्ये असतात व बाहेर नॉर्मल मग मी सिरीयस कसा असणार 
होऊ का सिरीयस सांग " 

ते माझ्या जवळ येत म्हणाले 

"काही पण काय बोलता ओ 
...." 
मी त्यांच्या तोंडावर माझी चार बोटं टेकवत म्हणाले 


"ये वेडाबाई  लगेच मनावर घेतेस मी मजाक करत होतो 
व मयू तुला आई गेली तर कर्मेना मग मला सोडून कसे करमेल ग 
आणि तुला तर जॉब करायचा आहे व तोही दूर 
मग कसे होईल तुझे ...." 
हे माझ्या डोळ्यात बघत म्हणाले 


"मला नकोय कुठला जॉब व मी दूर पण जाणार नाही " 
असे म्हणून मी त्यांना बिलगले 

"आयडिया छान आहे पण तुला घाबरवायची " 
त्यांनी दुसऱ्या हाताने मला विळखा घालत जवळ घेतले, 

त्यांच्या मायेची मिळालेली ऊब,
बंद झालेली लाईट, 
विचारांना मिळालेला पूर्णविराम,
या सगळ्या बदलामुळे नायनांना निद्रेने केव्हा कवेत घेतले कळलेच  नाही, 

 

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी लवकर उठले व कामाला लागले 
आता प्रत्येक गोष्टी ची मला हळूहळू सवय होत होती 
सुरवातीला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मी वाकड्या तीकड्या का 
होत नाही पण करत होते


नवनवीन काहीतरी रोज शिकत होते, व त्याचे प्रयोग यांच्यावर होत होते,
कधी करपलेली भाजी असो की जळालेलं धपाट
कच्ची राहिलेली पोळी असो 
की तुटलेल थालीपीठ 
सगळं हे आनंदाने खात होते 

मी माझ्या विचारात च स्वयंपाक करत होते व तेवढ्यात दारावरील बेल वाजली 

मी दार उघडले समोर बघते ते काय .........


कोण असेल दारावर 
असेल कुणी घरातील 
की बाहेरील कुणी जाणून घेण्यासाठी सोबत राहा ........
आवडल्यास लाईक करा व शेअर करायला विसरू नका 
क्रमशः ....................

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,