स्वप्नांच्या पलीकडले (भाग 22)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 22) 

( माघील भागात आपण पाहिले अभिमान व मयुरी चे प्रेमातील भांडण चालू होते व या भांडणात च रात्र झाली ) 

आता पुढे .......

नवरा बायकोचे भांडण रात्री मिटणार नाही तर मग ते नवरा बायको कसले .....

त्यांनी फेकलेल्या जाळ्यात मी अडकले होते 
"तुम्ही नेहमी असेच करता अगोदर जखमी करायचं व मग मायेने फुकर घालायचीअहो तुम्ही बोला, भांडा रागवा मला काहीच वाटणार नाही पण आज तुम्ही चक्क हात उगारलात माझ्यावर 
व तेही क्षुल्लक कारणासाठी 
मुळात तुम्ही मला अजूनही ओळखू शकले नाहीत हे माझे दुर्दैव आहे, 
अहो नवरा बायको च नात च  मुळी विश्वासावर विसावलेले असते 
तुमचा आपल्या बायकोवर इतका विश्वास हवा की कुणी काहीही बोलले किंवा काहीही सांगितले तरी तुम्ही त्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे, 

मी असे नाही म्हणत की मी कधीच चुकणार नाही पण कमीत कमी तुमचा विश्वास सोबत असेल तर होणाऱ्या चुका देखील मी टाळू शकते 

इतके ते नाते घट्ट असावे...

मी बोलत होते व ते नेहमीप्रमाणे झोपी गेले मला कुशीत घेऊन ..

माझे मलाच हसू आले 
या माणसाला सांगून काही उपयोग आहे का ???

चला .............
पण आपण बोललो नाही तर यांचा जीव कासावीस होतो 
हे काय कमी आहे का आपल्यासाठी 

तसेही कुठलीही स्त्री नवऱ्याच्या तीळभर सुखाने देखील जग जिंकल्याची अनुभूती घेते हे आज मनाला पटलं होतं. 

या विचारात च मी देखील झोपी गेले,

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे माझी  मी उठून कामाला लागले 
आता एकटी च कामे आवरत होते म्हणून घरातील कामाची पसाऱ्याची जाणीव देखील होत होती 

इतरवेळी माझे पुस्तक हॉलमध्ये विसरले की आई रागवायच्या नीट  ठेवत जा, 
केस पुसून टॉवेल तसाच ओला राहिला की ओरडायच्या वाळत घालत जा ?? 

ओले ग्लास रॅक वर नको मांडत जाऊ, 

भांड्याची साबण पाणी टाकून ओली नको करत जाऊ 

तेव्हा त्यांच्या या सूचना मला जाचक वाटायच्या
पण ज जेव्हा मी स्वतः घर सांभाळत होते तेव्हा नकळत या सूचना मी यांना देत होते, 
म्हणजे सुचनेत फरक होता पण शेवटी सूचना त्या सूचना च ना 

जसे की 
प्रिझ चा दरवाजा हजार वेळा उघडू नका???

टॉवेल कुठेही फेकत जाऊ नका 

स्वतः च्या वस्तू व्यवस्थित ठेवत
जा म्हणजे त्या तुमच्या तुम्हाला वेळेवर सापडतात, 

रिकामी बॉटल पुन्हा प्रिझ मध्ये ठेऊ नका व ठेवली तर भरून ठेवा 

मोबाईल काढला की चार्जिंग चे बटन बंद करा 

एक ना हजार सूचना 
व कधी कधी तर हे म्हणायचे 
तू माझी आई होऊ नकोस बर .....
तेव्हा खुप हसायला यायचे 

आता पूर्ण घराचा ताबा मी मिळवला होता मुळात कुणी नसल्यामुळे 
तो आला होता माझ्याकडे 
त्यामुळे सगळता गोष्टी मलाच बघाव्या लागत होत्या 
आता हे देखील ऑफिस ला जाऊ लागले 
घरी तरी किती दिवस थांबनार होते, 

घरातील प्रत्येक गोष्टी चे नियोजन करण्यात माझा वेळ कसा जात होता माझे मलाच कळत नव्हते 
आता माझी खुप ओढाताण होत होती 
आई होत्या तेंव्हा कसे कसलेच टेन्शन नसायचे फक्त आई जे सांगतील ते करायचे 
आई चे घरात असलेले बारीक लक्ष तेव्हा खटकत होते पण आज कळले खरच घर चालवणे अवघड आहे, 
आई चे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असायचे 
पण मला ते जमणे शक्य दिसेना 
मुळात मला झेपतच नव्हते हे सगळे 
सारखी आई ची आठवण येत होती, 
आज हे मोठेपण , या जबाबदाऱ्या, एकटेपण, या सगळ्याचा कंटाळा आला होता, 

सुरवातीला मस्त राजा राणी सारखे वाटत असलेले जग आता नकोसे झाले होते 
आई , प्रिया, बाबा यांची ओढ लागली होती, 
सतत मला छळणारी प्रिया, 
मयुरी मयुरी करणारे बाबा, 
सूचना करणाऱ्या आई ला मी खुप मिस करत होते, 

म्हणतात मनुष्य समाजशील प्राणी आहे, 
ते आज पटलं होत 
त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा 
या मुख्य गरजा असतात 
पण मला आज भावनिक गरज जवळची वाटत होती 
यांचे रूटीन चालू होते ऑफिस, घर , काम, पुन्हा ऑफिस 
पण मला एकटी ला हे घर खायला उठले होते, 

अगोदर नेहमी एकांत मिळावा, फक्त दोघे च असावे , मस्त फिरावं अस वाटणारी मी आज गर्दी आठवत होते, 
घराला घरपण माणसांमुळे
येते म्हणतात ते च खरे आहे नाहीतर आज त्या मानासाशिवाय मला घर म्हणजे फक्त भिंती वाटत होत्या, 

हे ऑफिस मधून आले मी आज थोडी शांतच होते 
मला बोलू च नव्हते वाटत कुणाशी 

"काय ग 
काय झालं 
बर वाटत नाहीये का ???" 
ते माझा चेहरा बघून म्हणाले 

"नाही तसे काही नाही "मी थोडे नाराजीत च बोलले 


"मग तू शांत शांत का ??
आज दरवाजा उघडल्यावर नेहमीप्रमाणे नाही वाटली तू मला "ते पुन्हा खोलवर चौकशी करत म्हणाले 

"खरच काही नाही " मी वेळ मारून नेत म्हणाले 

मी त्यांना बोलून किचनमध्ये त्यांच्यासाठी पाणी आणण्यास निघून गेले,

मी पाणी घेऊन आले व 

"घ्या " 
पाण्याचा ग्लास पुढे करत म्हणाले 

त्यांनी एका हातात ग्लास घेतला व दुसऱ्या हाताने माझा हात पकडून मला जवळ बसवले 

"मयू खर सांग काय झालंय तू अशी शांत शांत कधीच नसते व तू असा दरवाजा पण ओपन करत नाहीस खुप उत्साह असतो तुझ्या दरवाजा उघडण्यात देखील, 
पण जाऊ दे तुला नसेल सांगायचे तर नको सांगू ??
तुला जेव्हा सांगावे वाटेल तेव्हा नक्की सांग 
चालेल ना ??" 
 ते माझ्याकडे बघून म्हणाले 

आता काय बोलावे तेच मला कळेना 
कारण मला काय होतंय ते मलाच कळत नव्हते मग मी यांना काय सांगणार होते 

मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं व रडू लागले 
आता त्यांनाही परिस्थिती चे गांभीर्य कळाले होते 

"मयू खर सांग काय झाले 
हे बघ तू सांगितले नाहीस तर मला कसे कळेल "
माझ्या केसातून हात फिरवत ते म्हणाले 

"काही नाही असेच मला खुप रडायला येत होते पण आता बर वाटतंय काय माहीत काय झाले होते पण मला खुप एकटं एकटं वाटत होतं,पण नेमकं काय होतंय ते कळत नाहीये " त्यांनी जवळ घेतले म्हणून मी थोड लडिवाळ पणे म्हणाले 

मला अगोदर पेक्षा थोडं बर वाटत होतं आता 
कदाचित त्यांनी जवळ घेतले म्हणून वाटत असेल ....
कारण माणसाला स्पर्श जाणवतात म्हणतात तसे आज माझे झाले होते त्यांच्या मायेची ऊब मिळाली व कुठेतरी चाललेला माझा भावनिक शोध संपला होता.

"चला मी चहा टाकते तुमच्यासाठी " 
मी डोळे फुसत म्हणाले 

"काही नको मी घेईल नंतर अगोदर तुला बरे वाटतेय का??
व नसेल वाटत तर डॉक्टर कडे जाऊयात आपण 
किंवा तुझ्या आई ला कॉल वर बोल बर वाटेल तुला 
त्यांची आठवण आली असेल तर 
किंवा जाऊन येऊ आपण त्यांच्याकडे या रविवारी पण तू हास बघू आधी "
ते पुन्हा काळजीने म्हणाले 

"नाही ओ इतके काय टेन्शन घेता 
मी ठणठणीत आहे व मला आई ची आठवण देखील येत नाही 
फक्त घरातील सर्व लोक नाहीत ना म्हणून मला थोडे एकटे वाटले 
पण तुम्ही जवळ घेतले आणि माझं एकटेपण कुठच्या कुठे पळून गेलं 
आता छान वाटतंय मला " मी मोकळेपणाने बोलत म्हणाले 

"हो का असे आहे का 
अग मग कॉल करायचा ना मला एक 
तुमची खुप आठवण येतेय घरी या 
तुझ्यासाठी तर कधीही हजर असतो मी 
चल मग  तुला आणखी बर वाटेल" 
ते पुन्हा जवळ ओढत म्हणाले 

" सोडा बर तुम्हांला ना प्रत्येकवेळी फक्त गंम्मत सुचते " 
मी सोडवत म्हणाले, 

मी त्यांना चहा टाकण्यासाठी किचनमध्ये निघून गेले मी त्यांचे मन ठेवण्यासाठी चांगलं वाटते म्हणाले होते 

पण मला आता पुन्हा अस्वस्थ वाटत होते 
त्यांना सांगून उपयोग नाही त्यांना काही सांगितले तर ते पुन्हा मजाक करतील म्हणून मी त्यांना बोलणे च टाळले, 


मी चहा बनवत होते 
तेवढ्यात हे किचनमध्ये आले व जोरात ओरडले 

"अग ये .............

क्रमशः ...................


काय झाले असेल ??
का ओरडला असेल अभिमान 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
व आवडल्यास लाईक करा 

धन्यवाद

🎭 Series Post

View all