Login

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 21)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 21 ) 

( माघील भागात आपण पाहिले अभिमान हॉलमध्ये झोपलेला होता व आत्यानि  मयुरी ला आवाज दिला) 


आता पुढे ...................


आत्या नि आवाज दिला म्हणून मी हॉलकडे निघाले मनात हजार प्रश्न होते आता आत्या काय विचार करतील??
 व आत्या ना काय सांगू??

जाऊ दे मला काय करू दे त्यांना काय विचार करायचा ते 
व हे सांगतील काय करायचे असे म्हणून मी हॉलमध्ये आले बघते तर काय आत्या सोप्यावर पडल्या होत्या व म्हणाल्या 

"अग थोडी ऍसिडिटी झाल्यासारखे वाटत आहे तू मला कोमट पाणी देते का लिंबू घालून " 

"हो देते ना"
 मी आत्या ला म्हणाले

मी इकडे तिकडे पाहिले हे कुठेच नव्हते अरे मी आले तेव्हा तर गाढ झोपेत होते मग आता कुठे गेले,

जाऊ दे वाचलो एकदाचे 
असे म्हणून मी पाणी आणायला गेले, 

काहीवेळाने मी आत्या साठी कोमट पाणी घेऊन आले आत्या समोर ग्लास ठेवत 
"आत्या घ्या तुमचे पाणी " 
असे म्हणाले 

" Thank you so much"
आत्या त्यांच्या नेहमीच्या सवई 
प्रमाणे म्हणाल्या 


मी "welcome " 
म्हणत माघे फिरले बघते तर साहेब येत होते रूमकडून 
मनात राग तर खुप होता पण मला तो आत्या समोर दाखवायचा नव्हता, 

ते आले व सरळ अंगोळी ला गेले आज मुद्दाम गार पाण्याने अंघोळ केली कारण मला बोलायचं नव्हतं व आत्या ला पाणी माघू शकत नव्हते व आई उपलब्ध नव्हत्या, 

माझ्याही मनात राग होता मग मी का बोलू मि पण लक्ष नाही दिले त्यांच्याकडे त्यांनी त्यांचे आवरले व ते आत्या जवळ जाऊन बसले 

"मग आत्या तुला बर वाटत नाहीये का ???" 
ते आत्या च्या कपाळाला हात लावत म्हणाले 


"नाही रे तसे काही नाही 
पण तुझ्या बायकोने झोपू दिले नाही ना रात्री लवकर खुप डोकं खाल्ले त्यामुळे ऍसिडिटी झाली" 

आत्या बारीक आवाजात नाक मुरडत म्हणाल्या 

"का तिने काय केलं 
ती काही बोलली का ????" 
हे काळजीने म्हणाले 


" हो खुप डोकं खाल्लं माझं मला म्हणत होती तुम्हांला सोबत च झोपते ऐकत च नव्हती पण मी रागावले तेंव्हा तुझ्या रूममध्ये आली पण काही म्हण काल मला वहिनी ची आठवण झाली ती पण अशीच वागायची माझ्याशी तुझ्या बायकोने मला वहिनी ची उणीव भासू दिली नाही कालपासूनB बघतेय 
सगळं कसं वहिनी सारखे करतेय माझं 
खरच नशीबवान आहेस तुला अशी बायको मिळाली 
वहिनी च्या पाऊलावर पाऊल टाकत चालतेय ती " 
आत्या माझे तोंडभरून कौतुक करत होत्या 
व यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता 

यांना मनातून खुप वाईट वाटत होते की आपण काय बोलून बसलो तिला असे त्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होते 


"बर चल मी आवरते आज जाणार आहे मी " 
आत्या सोप्यावर उठून बसत म्हणाल्या

"का थांब ना आता आई येईपर्यंत
इतकी काय घाई आहे " 
हे आत्या ला म्हणाले 

कदाचित आत्या आहेत तोपर्यंत सगळं ठीक आहे नाहीतर नंतर माझं खर रूप बाहेर येईल त्याची त्यांना भीती वाटत होती 


"नाही रे खुप काम आहेत घरी मी आवरते तू मला सोड स्टॉप वर आणि मयुरी तू नाष्टा बनव " 

आत्या आम्हाला ऑर्डर देऊन निघून  गेल्या 

आत्या आई च्या रूममध्ये च तयार होत  होत्या , 

इकडे मी आत्या ना जायचे म्हणून पोहे बनवत होते, 
हे असे माझ्या जवळ किचनमध्ये येऊन उभे राहिले, 
मला माहित होतं हे सॉरी म्हणायला आले होते 
पण मी देखील त्यांच्याकडे  लक्ष
देणार नव्हते, 

मी काम आवरत होते व हे मधे मधे करत होते 
उदा : 
हातात पोह्याचा डबा देणे 
कांदा कापुन दे 

कुठे गरज नसताना पाणीच दे 
किंवा मिठाचा डबा दे असे त्यांचे चालू होते 
त्यांना माझा राग माहीत होता व मला कसे गुंडाळायचे हे देखील माहीत होते 
त्यामुळे सारखा प्रयत्न करत होते व मी तो हाणून पाडत होते, 


मी पोहे केले व प्लेट मध्ये भरले ताई  व माझ्यासाठी प्लेट स्ट्रे मध्ये ठेवली व यांची तिथेच किचन ओट्यावर मी भाव देत नाही हे कळताच यांनी गुपचूप प्लेट हातात घेतली व माझ्या मागोमाग हॉलमध्ये आले, 

ते आत्या सोबत गप्पा मारत होते 
व मुद्दाम मध्ये मध्ये हसत होते अर्थात दबरदस्ती 
मी आपली शांतच होते, 

आत्या नि नाष्टा केला व आम्ही दोघांनी त्यांना निरोप देत हे त्यांना सोडवायला गेले स्टॉप वर 


माझे आणखी खुप काम पडले होते त्यामुळे मी माझ्या कामात व्यस्त होते घर ते स्टॉप चे अंतर गाडीवर पाच मिनिटांचे होते पण यांना जाऊन जवळ जवळ एक तास होत आला होता पण स्वारी चा काही पत्ता च नव्हता, 


यांचे हे बर आहे 
अगोदर रागवायचे 
ओरडायच 
व नंतर आपली बाजू चुकली हे लक्षात आले की थोडा वेळ माघे पुढे करायचं व आपण भाव दिला नाही की असे गायप व्हायचं 
म्हणजे आपले मन हळवे आपण लगेच घाबरणार कुठे गेले असतील , मग त्यांना पुन्हा पुन्हा कॉल करणार पण ते काही कॉल उचलणार नाही वरतून घरी आले की अभिमानाने सांगणार मी कुठे गेलो नव्हतो इतके कॉल करायला 
म्हणजे आपण मूर्ख .....
पण मी ठरवले होते किती पण उशीर होतो आपण काहीच बोलायचे नाही बघू केव्हा येतात 

मी माझे काम करत बसले 
डोळे तर यांच्या वाटेकडे लागले होते पण राग आलेला होता पण माघार पण घ्यायची नव्हती 

मी कपडे धुतले व गच्चीवर सुखवण्यासाठी जात होते तेवढ्यात साहेबांनी घरात प्रवेश केला मी बघून न बघितल्या प्रमाणे केले तर ते माझ्या पाठीमागे वरती आले त्यांचे वरती येणं माझ्यासाठी अनपेक्षित च होते 


मी कपडे वाळत घालत होते व ते मुद्दाम एक एक माझ्या हातात देत होते 
एकदा ड्रेस पटकन देत होते तर एखादा तसाच हातात रोखून ठेवत होते नजरेप्रमाणे ...
पण आज कशालाच भुलायचे नाही हे ठरवलेल्या मी त्यांच्या हातातील कपडे तसेच ठेऊन खाली निघाले


"ये मयू सॉरी ना ग " 
ते कपडे वाळत घालत केविलवाण्या स्वरात म्हणाले 
मी ऐकून न ऐकल्या सारखे केले व खाली निघून आले, 

आमचा चोर पोलीस चा खेळ पूर्ण दिवस चालू होता 
मी जिथे जिथे जायचे ते मागे मागे येत होते 
प्रत्येक कामात न सांगता मदत करत होते, 
त्यांना वाईट वाटतंय हे 
मला जाणवत होतं पण मला दाखवायचं नव्हतं, 
माझं गप्प राहणं त्यांना खटकत होत नेहमी खुप बडबड करायचे व हे सगळं सोडून द्यायचे पण आज न बोलता माझे खुप काम झाले होते, 
ते मुद्दाम या ना त्या कारणाने बोलत होते, 
कुठे लाईट बिल विचार किंवा कुठे गॅस कधी संपला होता ग .....
असे 

कुठून तरी मला बोलते करायचे  पण आज मी जग जिंकले होते असा भास मला येत होता कारण त्यांच्या समोर माझा राग कधीच टिकत नव्हता, 
ते असे जवळ आले व त्यांनी दोन्ही हात पकडून डोळ्यात बघून फक्त मयू जरी म्हणलं तरी मी ढासळायचे पण यावेळी मी बऱ्यापैकी बाजी मारली होती व त्यासाठी मी माझे च कौतुक करत होते, 

मी स्वयंपाक केला त्यांचे मधे मधे करणे सहन करत व आम्ही दोघांनी जेवण देखील केलं पण आज अबोला कायम होता, 
रोज माझी वाट बघणारे हे आज स्वतःपाणी घेऊन गेले रूममध्ये, 
मी देखील आवरून पाठीमाघून गेले, 
दिवस काढला पण आता माझी कसोटी होती 
ताणून धरावे की सांगावी त्यांना चूक हा विचार करत मी भिंतीकडे तोंड करून झोपले, 
त्यांची अनावश्यक चुळबूळ चालूच होती 
ते अंतर कमी करत होते व मी वाढवत 
शेवटी त्यांनी 
"मयू फक्त माझ्याकडे तोंड कर बोलू नको पण बग फक्त" 
केविलवाण्या स्वरात विनंती केली 

"पण मी काय मूर्ख नव्हते आता फसायला "
मी ऐकून दुर्लक्ष केलं 

त्यांनी दोनी हातानी मला स्वतःकडे वळवत ते बोलू लागले 
"ये मयू सॉरी ना ग 
तुला माहीत आहे ना 
मला राग कॅट्रोल नाही होत व तू किती बोललीस मग राग आला मला व मला माहित आहे तुझ्यावर हात उगराने चुकीचं होत पण मी मुद्दाम नाही केलं ग 
खरच ........
हे बग तू बोल मला 
रागव हवं तर किंवा 

(त्यांनी माझे दोनी हात हातात घेत मार हवं तर ) 


पण अबोला नको धरू यार 
व मी चुकलो आणि मी असे कधीच वागणार नाही"  
ते तोंड बारीक करून बोलत होते 


आता काय दिवसभर भांडणाऱ्या नवरा बायकोचे भांडण रात्री मिटणार नाही तर मग ते नवरा बायको कसले .................


पण या दोघांचे भांडण 
मिटेल की घेतील वेगळे वळण 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 

क्रमशः ................

🎭 Series Post

View all