स्वप्नांच्या पलीकडले (भाग 20)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 20) 

( माघील भागात आपण पाहिले मयुरी ला निशा आत्यांनी रूममध्ये जायला सांगितले 

आता पुढे ...............


मी आत्या चा निरोप घेऊन रूममध्ये आले 
हे नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत बसले होते, 
या आमच्या दोघांच्या सवई सारख्या होत्या, 
जेव्हा मूड चांगला असेल किंवा निवांत वेळ असेल तेव्हा आपल्या आवडीचे एखादे पुस्तक असेल तर ते वाचत बसायचे, 
आणि मूड खराब असेल तर सॅड सॉंग ऐकायचे, 
कित्येकवेळा तर आधीच मूड खराब व त्यात असे गाणे मी ऐकायचे की तासभर रडल्या नंतर कळायचे की खुप वेळ झाला रडतोय आता बंद करू, 
व यांचे पण असेच होते पण ते फक्त रडत नव्हते म्हणजे रडण्याचे काँट्रॅक्ट फक्त माझ्याकडे होते, 


मी हातातील पाण्याचा जग टेबलावर ठेवला, 
व काही बोलणार तोच ते चालू झाले 

"मयू तू वेडी आहेस का ग .....
की डोक्यावर पडलीस ....
असे पाहुण्यांना सोडून कुणी येते का ???
व आई असती तर वेगळी गोस्ट होती 
पण आता त्यांना एकटे ........

कसे वाटेल, 
तू लवकर त्यांच्याकडे जा त्यांना तू इकडे आलीस हे कळण्यापूर्वी

त्यांनी घाईने माझ्या हाताला पकडले व दरवाजा पर्यंत आणून सोडले, 

"अहो माझे ऐकून तर घ्या " 
मी त्यांना सांगत होते पण ते ऐकतील तेव्हा ना 

"काही बोलू नको
तू 
माझे ऐक ....
तू जा अगोदर अग असे बरे दिसते का???
"
ते मला समजावत म्हणाले 

"का नाही दिसत अरे घर माझे नवरा माझा व मला काही स्पेस आहे की नाही ????
असे रोज पाहुणे येतील
 मग काय रोज मी त्यांना कंपनी देऊ का???
आणि तसेही

पाहुणे जरी आले तरी त्यांनी पाहुण्या सारखेच राहावे व आहे ना त्यांना आई ची रूम त्या झोपतील 
त्यांना काय डोक्यावर मिरवण्याची गरज नाही इतकी तुम्ही झोपा व मला पण झोपू द्या, 
आणि नसेल होत तुम्हाला सहन तर तुम्ही जा आत्या ना सोबत पण मी रूम सोडणार नाही, 
रूमच काय पण  मी माझा कोणताच हट्ट सोडणार नाही कुणासाठी " 

मी त्यांना दिवचण्यासाठी म्हणाले, 
मला बघायचं होत हे मला किती ओळखू शकतात, 
पण नेहमीप्रमाणे मी आजही चुकले होते त्यांच्या बाबतीत मी बोलत होते तोच त्यांनी त्यांचा हात माझ्यावर उगारला , 
मी दोन्ही हात कानावर लावत पटकन बाजूला झाले 

" वा मयू खुप छान 
मी तुला खुप छान समजत होतो पण तू तर जास्त हुशार निघालीस ग 
नात्यांचा व्यापार कसा करावा ते तुझ्याकडून शिकावं, 
मला खुप आनंद झाला तुझे हे बोलणे ऐकून, 
तुझ्या विचार खुप उच्च आहेत असेच ठेव 
व एक लक्षात ठेव तू फक्त स्वतःवर प्रेम करू शकते दुसऱ्या कुणावर नाही कारण स्वार्थी लोक फक्त तेच करतात आणि तू स्वार्थी आहेस "

ते एका दमात बोलून गेले 
त्यांचे शब्द मला इतके लागले होते की मी मजक करतेय
हे सांगण्याची माझी ईच्छा देखील झाली नाही, 

त्यांनी रागाने एक उशी उचलून हॉल गाठला 
मी देखील त्यांना अडवले नाही 
पण मी म्हणते गरज काय 
अडवायची आज इतके दिवस झाले आमच्या लग्नाला यांनी मला इतकेच ओळखले का??? 
ठीक आहे मी मजाक करत होते पण त्यांनी तरी समजून घ्यायचे ना??? 
त्यांनी थोडा विश्वास आज माझ्यावर दाखवला असता तर मला जग जिंकल्याची अनुभूती आली असती
पण त्यांना कुठे जमले ते 
नका का जमेना पण त्यांनी निदान बोलायचे तरी नसते, 
मी पडल्या पडल्या च विचार करत होते झोपेणे तर केव्हाच हुल दिली होती या नायनांना 
मी फक्त कूस बदलत होते जाऊ का हॉलमध्ये????
 म्हणू का त्यांना 
की अहो मी तुमची मजा बघत होते तुम्ही कशी प्रतिक्रिया देता म्हणून ????
व मी काय लहान आहे का 
की मला इतके कळू नये पाहुण्यांशी कसे वागावे???
मला आत्या नि च पाठवले होते रूममध्ये 

मी उठले व निघाले दरवाजा उघडणार तोच पुन्हा विचार आला 
जर आज मी माघार घेतली तर त्यांना त्यांची चूक कधीच कळणार नाही, 
व ते नेहमी नेहमी असेच गृहीत धरतील मला 
मग माझ्या मनाचे काय त्याचा तर असाच चुरा होत राहील वेळीअवेळी 
त्याचे काही नाही 
कळू दे त्यांना त्यांची चूक व स्वतःहून हॉलमध्ये झोपले ना 
मग रूममध्ये पण त्यांनी स्वतःहून यावे 
शेवटी स्वाभिमान हा प्रत्येकाला असतो व तो दुखावला ही जातो,

मी याच विचारात झोपी गेले, 
सकाळी लवकर उठून माझे काम आवरू लागले, 
यांना उठवून सांगावं वाटलं 
आत्या उठाण्यापूर्वी रूममध्ये जा पण अगोदर बोलेल कोण ना ????
त्यामुळे बघू म्हणलं 
जशी वेळ येईल तसे 
मी किचनमध्ये निघून गेले तेवढ्यात आत्या उठल्याची चाहूल लागली, 
कदाचित त्या हॉलमध्ये आल्या होत्या त्यांनी आवाज दिला 
"मयुरी.....
ये मयुरी....." 


"अरे देवा हे सापडले बहुतेक आत्या च्या तावडीत पण आता आत्या ना काय सांगु ??
जाऊ दे ना 
ते त्यांचे बघून घेतील काय सांगायचे 
मी कशाला टेन्शन घेऊ म्हणून मी हॉलकडे निघाले .......

काय असेल आत्या ची प्रतिक्रिया अभिमान ला हॉलमध्ये बघून 
त्या समजून घेतील का?
या नव्या जोडप्याचे गोडी गुलाबीचे भांडण की वाढवतील आणखी गुंता ????

जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
व आवडल्यास लाईक नक्की करा 


क्रमशः

🎭 Series Post

View all