स्वप्नांच्या पलीकडले (भाग2)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 2 ) 


( माघील भागात आपण पाहिले 
मयुरी व अभिमान देव दर्शन करून घरी आले होते, 
त्यांनी आपल्याला काय आणले असेल या प्रतीक्षेत असलेली मंडळी त्यांनी काहीच आणले नाही हे कळूनही खुश होती ) 

आता पुढे ...........

मी रूम मध्ये निघून आले होते पण हे अडकले होते त्यांच्यात.

"अरे दादा 
जे काही आणले असेल तेच दे 
फुल न फुलांची पाकळी म्हणून 
आम्ही गोड मानून घेऊ " 
प्रियाताई 
यांना चिडवत म्हणाल्या 

"आई ........"
हे आईकडे बघत म्हणाले 

मी रूम मधूनच या सगळ्याचा आनंद घेत होते.

"अरे आई आई काय करतो 
तो नारळाचा प्रसाद आहे ना तो दे सर्वाना"
आई पुन्हा षटकार मारत म्हणाल्या, 

"हो हो ...."
म्हणत यांनी सर्वाना नारळ दिले, 


"वहिनी नारळ जरा जास्तच गोड वाटतेय का ??? 
अभिमान खाऊन बग बर, 
तू खाल्ले का पण ....
नारळ .... "
निशा आत्या पुन्हा यांची खेचत म्हणाल्या, 


"खाऊन नाही भरवुन झाले असेल त्यांचे "
श्रुती ची मम्मी म्हणाल्या, 

आता हे तिथे तक धरून राहणे शक्य नव्हते, 
त्यांनी कॉल आल्याचे खोटं नाटक करत हॉल सोडला, 

मला अजूनही हसायला येत होते, 
"मयुरी जास्त हसू नको 
नाहीतर स्वारी तुझ्याकडे वळायची 
हो ना 
नको बाबा "

असे मनाशीच बोलून मी 
किचनमध्ये गेले, 

संध्याकाळ होत आली होती 
मी किचनमध्ये जाताच देवाला दिवा लावला, 

मला थोडीही कल्पना नव्हती की कॅमेऱ्या प्रमाणे माझे ऑब्झर्वेशन चालू आहे, 

मी देवाला, तसेच तुळशीत दिवा लावला 
आणि किचनमध्ये आले, 


"बघा, याला म्हणतात वळण 
म्हणून मी माझ्या माहेरची मुलगी करण्यासाठी हट्ट करत होते 
नाहीतर तुझी सासू रोज विसरायची दिवा लावायला मलाच आठवण करून द्यावी लागत होती" 
आजी सर्वाना शांत करत म्हणाल्या 


"काय ओ आई 
आल्या का माझ्यावर ??
आता मला सून आली 
आता तरी सोडत जा" 

आई आजीला म्हणाल्या 


"चला, चला सगळे या 
अभि करुक्षेत्र पे लढाई होणे वाली है।"

असे मधेच प्रियाताई ओरडल्या 

त्यांची नॉनस्टॉप कॉमेंट्री नेहमी चालूच असते घरात.

व सगळे हसू लागले 


मी गोधळले अरे या दोघी एकमेकींना रागवत होत्या,
 कौतुक करत होत्या की भांडत होत्या व हे  सगळे हसले का ???? 
मला खुप प्रश्न पडले होते, 
मी खिन्नपने फक्त बघत होते 

सगळ्यांचा हसण्याचा आवाज ऐकून हे किचनमध्ये आले, 


अरे यार 
हिची खेचली बहुतेक पुन्हा , 
असे नजरेने च बोलत तेही हसू लागले माझ्याकडे बघून 


"ओए हिरो 
तू का हसतेस , 
तुला माहीत आहे का काय झालं 
नाही ना ??  
मग का हसतोय ??? " 

निशा आत्या पुन्हा बॅटिंग करत म्हणाल्या 

आता यांचा चेहरा पुन्हा पडला, 
आणि बाकीचे सगळे हसू लागले, 

त्यांना हसताना बघून मी विचार करू लागले 
हे घर आहे की नाटक कंपनी

कोण कुणाला काय म्हणेल याचा काही नेम नाही, 
आणि कुणाला त्याचे वाईट देखील वाटत नाही, 

मी किचन ओटा पकडून तशीच उभा होते तितक्यात ताई आल्या व म्हणाल्या" ओ माहेरची साडी मधील अलका कुबल जेवण करायचे नाही का??? 
जेवायला द्या सर्वाना तुम्हांला भूक नसेल तरीही "  असे म्हणून त्यांच्या दादा कडे बघून हसत म्हणाल्या 

"हो की नाही रे दादा 
तुमचे काय बुवा पोट भरले असेल आज" 

"प्रिया जास्त आगाऊपणा करू नको " 
हे प्रिया वर ओरडत म्हणाले 


" आई बग तुझा लाल 
वहिनी आली नाही की मला म्हणतो आगाऊपणा करू नको " 
ताई प्रतिउत्तर देत म्हणाल्या 


"अहो जाऊ द्या ना तुम्ही " 
मी घाबरत च म्हणाले 


" ऐका ओ ऐका 
वहिनी साहेब 
त्यांच्या अहो ना गप्प करताय " ताई नि ही गोस्ट वाऱ्याप्रमाणे घरभर केली. 

मी व हे दोघेही बसलो डोक्याला हात लावून , 

मी सर्वाना जेवायला वाढले, घरातील मोठी माणसे जेवली की मग बाकीचे अशी पद्धत होती इकडे 
माझ्या माहेरी असे नव्हते आम्ही सगळे सोबत बसायचो, 

घरातील पुरुषाची जेवणं झाली 
व आता आम्ही सगळ्या जेवायला बसलो, 

सकाळी वाचले होते पण आता काय करणार ?? 
इथे सगळे खुप तिखट खात होते व मी अजूनही वरणभात खाणारी आता माझी मजा होती 
मी सगळ्यांना वाढून दिले व स्वतः ला फक्त साधे वरण घेतले आणि
तेच गोड मानून खाल्ले, 

सगळ्यांची जेवणं झाली 
भांडी पण घासून झाली 
आता मी रूम मध्ये जाणार तोच 

" सकाळी आम्हाला लवकर जायचे आहे व इथून जाऊन कधी मी मुलांचे डबे करू त्यापेक्षा तूच लवकर उठ व करून दे चालेल ना " श्रुती ची मम्मी म्हणाल्या 

" हो ताई देईल" मी म्हणाले 

मला कसेही करून पटकन रूम गाठायची होती, 
कारण कधीच साडी अंगाला देखील न लावलेली मी आज आयुष्यात पहिल्यांदा पूर्ण दिवस साडीत काढला होता,

"मग गवारीच्या शेंगा आहेत त्या निवडून ठेवा म्हणजे सकाळी घाई होणार नाही " 
आई म्हणाल्या 


बाप रे 
आता हे काय नवीन 
असे मनात म्हणत 
"हो 
आई निवडते" 

असे जोरात म्हणून मी कामाला लागले, 


प्रिया ताई व आत्या देखील मदत करू लागल्या 

मी सारखी सारखी घड्याळ बघत होते , 


मी रूम मधेच येत नाही असे  कळताच 
हे 
बघण्यासाठी पाणी पिण्याचे निम्मित करून किचनमध्ये आले, 

त्यांनी पाणी घेतले व लगेच ताई ओरडल्या 
" आयो आज सूर्य कुठून उगवला होता ग आई 
नाही म्हणाल रोज मला दहा वेळा आवाज देऊन पाणी मागणारी पाऊले आज चक्क किचनमध्ये आलीत" 

आणि त्या व आत्या हसू लागल्या 

"प्रिया पुरे झाले आता " 

आई पुन्हा सावरत म्हणाल्या 

मी खाली मान घालून बसले होते व हे दिसेनाशे झाले, 

मी फक्त शरीराने तिथे होते मन तर केव्हाच गेलं होतं त्यांच्या माघे, 

आम्हाला एक वेगळीच ओढ होती 
त्यांना माझी की मला त्यांची हे अजूनही अनुत्तरितच 


कधी एकदा हे आवरते व निसटते असे झाले होते मला.

माझे काम आवरत आले होते व तेवढ्यात यांनी पुन्हा दुसरी चक्कर मारली किचनकडे 

आता हे का येताय सारखे सारखे 
मी वाकड्या नजरेने त्यांना बघत मनात म्हणाले , 

एक तर बाकीच्यांना फक्त हसायला पाहिजे व हे देखील त्यांना चान्स देताय , 
मी डोक्याला हात मारून घेतला व खाली मान घालून शेंगा निवडू लागले, 


ते आले पाणी पिले व माघारी फिरले, 


"आत्या दादा ला खुप तहान लागतेय ग आज" 
ताई म्हणाल्या 


"गप ग  काही पण काय बोलते 
लागत असेल तहान व माणसाला तहान लागू नये का?? 
काय ग मयुरी ?? 
बरोबर ना ???" 

आत्या म्हणाल्या 


" हो 
हो 
मी गोधळले 
काय बोलू कळेना" 

आणि पुन्हा सगळे हसायला लागले त्यात हे देखील सामील होते. 


माझा पुन्हा पचका झाला होता, 

"पण काही म्हण अभिमान तुझी बायको 
मोठी पोस्ट ग्रॅज्युएट आहे 
पण कच्ची आहे अजून दुनियादारी मध्ये" 

पुन्हा हशा पिकला 


"ये मला आज आम्ही तुझ्या रूम मध्ये झोपणार फक्त आज आम्ही उद्या जाणार आहोत ना? 
आणि घरात फक्त दोन बेड आहेत एकावर बाबा झोपतात व दुसऱ्यावर तू आणि मला खाली झोप येत नाही म्हणून मी तुझ्यासोबत च झोपणार " श्रुती आकाशवाणी करून मोकळ्या झाल्या 


आता माझे हातपाय च गळाले एक तर ही साडी व त्यात आता आत्या सोबत झोपावं लागणार होतं, 


माझा पडलेला चेहरा बघून यांचा चेहरा अजूनच पडला 

श्रुती ला घेऊन ते गुपचुप रूम मध्ये गेले, 


आम्ही देखील सगळे आवरून आई बाबा च्या रूम मध्ये झोपलो, 


पडले तर होते पण आता खरी कसोटी होती 
साडीवर झोप लागेल का???
आता काय करू ?? 
बोलू का कुणाशी 
पण नको सकाळीच ताई ने घरातील अलिखित नियम सांगितले, 
उदा साडी घालावी च लागेल, 
मोठी माणसे आली की पदर घ्यायचा , दर्शन घेणे, कमी आवाजात बोलणे , जास्त हसू नये, बाहेरचे काही खाऊ नये, अन्न वाया घालवू नये, वायफळ खर्च करू नये, 

असे 


आणि मी नेमकी उलट होते या सर्वांच्या, 

आई बाबा कडे सगळे सुशिक्षित व मॉर्डन होते त्यामुळे असे नियम वैगरे न लावता स्वतः चे  निर्णय स्वतः घेतले जात होते, 

पण आता काय करू 
माझी कोंडी झाली होती 
अगोदर ची सवय की सासरचे नियम 
आता मला कोणत्यातरी एक स्वीकारायचे होते, 

मी विचारच करत होते तितक्यात आत्या बाहेर गेल्या व हातात काहीतरी घेऊन आल्या, 
काय आणले असेल त्यांनी 
मी अशाचार्यचकीत होऊन बघत होते, 

"घे तुला सवय नाही ना साडी ची 
तर तर ड्रेस घालून घे" 
आत्या माझ्याकडे ड्रेस करत म्हणाल्या 

मी ड्रेस हातात घेतला व बघते तर काय तो माझाच ड्रेस होता, 

माझा ड्रेस आत्या कडे कसा, 
मी ड्रेस कडे बघून विचार करत होते  तितक्यात आत्या म्हणाल्या 
"तुझा लाडका नवरा आला होता ड्रेस घेऊन व म्हणाला आत्या तिला झोप येणार नाही साडीत  तिला ड्रेस घालू दे" 

मग मी पण म्हणल जाऊ द्या 
घाल तू 

त्या म्हणाल्या 


मी आनंदाने ड्रेस घातला व गुपचुप झोपी गेले 
पण झोप कुठे येत होती 

अरे यार म्हणजे मी इकडे त्यांची आठवण करतेय व ते तिकडं माझी , 
किती काळजी करतात ना ते माझी 

त्यांना माझी काळजी 
वाटते या विचारानेच मी वेडी झाले 
पुन्हा पुन्हा नव्याने त्यांच्या 
प्रेमात न्हाले 

कधी मिळेल या हृदयाला 
तुमच्या मिटीचा विसावा 
कधी संपेल हा  वनवास 
आणि दोघांचा दुरावा 


आज मनाने मनाशी आणखी 
घट्ट बंध जोडले 
मी अनुभवत होते एक 
गाव स्वप्नांच्या पलीकडले 

या विचारताच मी गुंतले होते

कथा कशी वाटली नक्की कळवा 
आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका

पुढील भाग लवकर मिळवण्यासाठी मला फॉलो करा,

आणि हो शेअर करा तुमचे अनुभव शब्दबंधात 
बांधण्यासाठी 

धन्यवाद 
  
क्रमशः ........

🎭 Series Post

View all