स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 18 )
( माघील भागात आपण पाहिले
मयुरी ला स्वयंपाकाचे टेन्शन आले होते )
आता पुढे ............
आज आम्ही दोघे च होतो म्हणून स्वयंपाक पण थोडाच करायचा होता, मी कणिक मळून घेईल पोळ्या चे ठीक होते पण भाजी चे काय ???
मी कणिक मळायाला घेतली
परातीत पाणी घेतले पीठ टाकले व हाताने मळू लागले तेवढ्यात हे किचनमध्ये आले,
मला वाटलं पाणी प्यायचे असेल ते आले असतील म्हणून मी जास्त लक्ष न देतात काम करू लागले
तेवढ्यात मुद्दाम जवळून जात त्यांनी केसांचे क्लचर काढून घेतले,
"ओ ....
झाले का तुमचे चालू द्या बर "
मी त्यांच्यावर ओरडत होते
"हे घे तू पण ना
कधी नव्हे एकांत मिळाला म्हणलं तर तू लगेच झाली चालू "
त्यांनी क्लचर ओट्यावर ठेवलं व दूर जाऊन उभा राहीले
जर केस बांधायचे म्हणलं तर हात धुवावे लागेल व यांची मदत घेतली तर ती मला परवडणार नाही मग करू काय या विचारात च मी कशीतरी कणिक मळली व हात धुन केस बांधून घेतले,
मी पोळ्या लाटायला घेतल्या
"मी भाजू"
का हे दुरूनच म्हणाले
"काही नको फक्त आहे तिथेच थांबा उपकार होतील "
मी रागात म्हणाले
"हे असं आहे तुझं मदत करतो तर तेही जमत नाही जाऊ दे मी जेवणारच नाही" हे तोंड फुगवून म्हणाले
"अहो असे काय करता लहान लेकरा प्रमाणे मी कुठे काय म्हणते "
मी हसत म्हणाले
" मयू तुला एक सांगू "
हे जवळ येऊन म्हणाले
"मला माहित आहे मी हसल्यावर खुप छान दिसते"
मी त्यांच्या खांद्यावर बेळण्याचा हात ठेवत म्हणाले
"बिल्कुल नाही
तू हसताना खुप छान दिसते"
माझ्या खांद्यावर ठेवलेला हात आपल्या हनुवटी ने दाबून दुसऱ्या हाताने कमरेला विळखा घालून जवळ ओढत ते म्हणाले
"ओ ....
सोडा झाले का तुम्ही चालू
दुसरे काही उधोग आहेत की नाही"
मी दोन मिनिटं त्याच पोझिशन मध्ये राहून तिसऱ्या मिनिटाला म्हणाले,
"तू च तर म्हणाली होती ना एकांत , प्रेम, एकमेकांना समजून घेणं विसरली का ???
ते हातातील बेलन ओढत म्हणाले
"हो का ???
पण साहेब त्याला काही वेळ काळ असते व सध्या कामाची वेळ आहे सरका बरं "
मी दुसऱ्या हाताने त्यांना बाजूला करत म्हणाले
"प्यार का कोई वक्त नही होता जानेमन प्यार तो बस वक्त बेवक्त हो जाता है। "
ते प्रियाताई च्या फिल्मी स्टाईल मध्ये म्हणाले
"हो का व्हा बाजूला नाहीतर उपाशी राहावे लागेल व प्रेमाचे पोट भरत नाही त्यासाठी अन्न च लागते" मी उपदेश करत म्हणाले
"हो का बरं ......पण मग दुसरी काही मदत करू का "ते जिद्दीने म्हणाले
आता यांना कसे सांगू दुसरी म्हणजे भाजी बनवायची आहे व ती मला व त्यांना दोघांना देखील येत नाही,
यांना विचारू का कोणती भाजी करू
नाही नको उगाच अवघड भाजी सांगितली तर माझी पंचायत होईल, असे म्हणून मी कामाला लागले
हे राहिले उभा नेहमीप्रमाणे प्रिझ चा आधार घेत,
प्रिझ उघडून पाहिले तर भरपूर भाज्या होत्या
मस्त लाल टोमॅटो, हिरवीगार पालक, भेंडी, कोबी, मेथी
अरे वा मेथी सोपी आहे तीच बनवू म्हणून मी बाहेर काढली,
आई नेहमी निवडून ठेवतात पण मी तर काल यांनी आणल्या व तशाच ठेवल्या होत्या ,
आता तिला निवडणार कोण??
मी भाजी हातात घेऊन यांच्याकडे पाहिले,
त्यांची व माझी नजरेला नजर झाली,
"कधी निवडली नाही पण तुला मदत करू शकतो तू सांग फक्त "
ते उत्साहाने म्हणाले,
मला नवल वाटले याना किती कळते ना मी व माझी नजर
मी सहज लाजून गॅस कडे निघाले
"आता यात लाजण्यासारखे काय होते तुझे गाल असे गुलाबी गुलाबी का झाले"
हे पाठीमाघून डोकावत म्हणाले
त्यांनी भाजी निवडून दिली
तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी केली,
जसे आठवेल तसे कृती करत मी भाजी बनवली,
"जेवायला हॉलमध्ये च बसूयात" यांनी फर्मान सोडले
"मी आलेच फ्रेश होऊन "
असे सांगून मी रूममध्ये गेले
फ्रेश होऊन हॉलमध्ये येताच
बघते तर यांनी जेवायला सगळं हॉलमध्ये घेतलं होतं
मला अपेक्षित च नव्हतं अस काही पण नजरेला एक गोस्ट खटकली सगळं आणले पण ताट फक्त स्वतःपुरते वाढून घेतले,
मनात विचार आला शेवटी नवराच तो बायकोसाठी काही करणे त्याला कमीपणाचेच वाटेल,
मी त्यांना काहीच न बोलता किचनमध्ये गेले व स्वतःसाठी दुसरे ताट घेऊन आले, माझ्या चेहर्यावरील राग त्यांना दिसत होता पण ते काहीच बोलले नाही,
मी जेवण घेण्यासाठी ताट समोर ठेवले तसे त्यांनी ते उचलून घेतले,
"मला वाटले होते एकच ताट बघून तू समजून घेशील पण नाही तुला अव्यक्त भावना कुठे कळतात ना तुला प्रत्येक भावना ही शब्दात असावी लागते "
ते एका दमात बोलून गेले व त्यांनी एक घास मला भरवला व म्हणाले
"घ्या मॅडम पहिला नंबर तुमचा"
त्यांनी घातलेला घास व त्यांचा चेहरा बघून मला
माझीच लाच वाटू लागली खरच आपण समोरच्याला कधी समजूनच घेऊ शकत नाही का ??
समोरच्याबद्दल मत व्यक्त करायची इतकी घाई का असते
मी थोडे थांबून वाट बघू शकत होते काय घडतंय याची पण मी तसे केले नाही,
भाजी तशी बेचव च झाली होती पण त्यांनी भरवली म्हणून आज तीही चविष्ट लागत होती,
आम्ही जेवण करून पुन्हा दोघांनी आवरून ठेवले,
आज माझ्यासाठी सर्व स्वप्नावत च चालू होते,
घरातील सर्व असताना चे हे व आजचे हे यात खुप बदल होत,
वातावरणाचा माणसावर परिणाम होतो हे ऐकलं होतं पण माणसाचा माणसावर परिणाम होत हे मी आज अनुभवलं होत,
याच विचारात मी झोपी गेले
क्रमशः .........
आवडल्यास लाईक नक्की करा,