स्वप्नांच्या पलीकडले (भाग 14)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले ( 14)

( माघील भागात आपण पाहिले मयुरी अभिमान चे कपाट आवरत होती व त्याची डायरी वाचून ती कोसळली 

आता पुढे ...............

त्या डायरीतील शब्द न शब्द माझ्या काळजाचे पाणी करत होता, 
त्या माजकुरावरून तरी हेच कळले की यांचे अगोदर कुणावर तरी प्रेम होते व लिहिलेले अर्धवट होते मग पुढे काय झाले असेल याची मला उत्सुकता लागली, 
अर्थात लग्न माझ्यासोबत झाले म्हणजे यांचे प्रेम अर्धवट राहिले काही पान कोरे सोडून पुढे काहीतरी लिहिलेले दिसत होते पण माझी हिम्मत नाही झाली ते वाचण्याची, 
मी कपाटातील पसारा तर आवरला होता पण मनाच्या पसाऱ्याचे काय तो तर मी आणखी वाढवून ठेवला होता, 
या सगळ्यात इतका वेळ निघून गेला की हे कधी ऑफिसमधून आले व माझ्या समोर येऊन उभा राहीले माझे मलाच कळले नाही, 
माझे असे त्यांचे सामान उचकने त्यांना आवडले नसेल बहुतेक 
ते जोरात ओरडले 
"आई .......
आई तुला माहीत आहे ना मला माझ्या वस्तू ला कुणी हात लावलेला आवडत नाही मग तू का आवरू दिले हिला, 
आणि मयुरी तुला काही कॉमनसेन्स आहे की नाही 
असे कुणी हात लावते का न विचारता" 


"अहो मी कपाट आवरत होते" 
मी हळूच म्हणाले 

"ते दिसतंय मला 
पण तुला गरज काय होती 
एकदाही मला विचारावं वाटलं नाही माझ्या वस्तू ला हात लावताना " 
ते रागात म्हणाले 

आता माझा संयम सुटला मी रडू लागले, एक तर हे मला पहिल्यांदा मयुरी म्हणाले होते 
व सारखे सारखे माझ्या वस्तू माझ्या वस्तू म्हणत होते 
म्हणजे माझे काही अस्तित्व च नव्हते त्यांच्या आयुष्यात
 पण कदाचित त्या डायरी मुळे असे वागत असतील असे मला वाटले, 
तरीही आज हे चुकले च होते 
घरातील सर्व म्हणतात अभिमान खुप हुशार आहे तो कधीच चुकत नाही पण आज हे चुकले होते माझ्या बाबतीत,

माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, 
मी तसाच पसारा सोडून डोळे पुसत थोडी बाजूला झाले , 

तेवढ्यात आई म्हणाल्या 
"राहू दे मयुरी त्याच्या वस्तू आहेत ना तर त्यालाच आवरू दे तू चल माझ्या बरोबर , 
आणि अभिमान बायको ही अर्धांगिनी फक्त म्हणायला नसते तुझ्या प्रत्येक गोष्टीवर आता तिचा अधिकार आहे अगदी तुझ्यावर देखील, तू तिला असे तोडून नाही बोलू शकत तू हुशार आहेस, तुझे नेहमी बरोबर असत पण आज तू मयुरी च्या बाबतीत चुकलास जेव्हा तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल तेव्हा च तिच्याशी बोल" 

असे बोलून आई मला हाताला पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या, 

असे करताना आई ला खुप आनंद वाटत होता असे नाही पण आज मला आई चा खुप मोठा आधार वाटला, 
आज जर आई नि मध्यस्ती केली नसती तर कदाचित आमच्या वादाने वेगळं वळण घेतलं असत 
पण अनुभवाने शहाणपण येत म्हणतात ते आज मला जाणवलं, 
मी आई सोबत किचनमध्ये काम करू लागले, 
मी काम तर करत होते पण मन  अजूनही रूमकडे लागले होते, 

त्यांचा राग तर खुप आला होता पण वाईटही वाटत होते , 

हे माझ्यावर अजून तरी इतके कधीच चिडले नव्हते, 

मी सर्व स्वयंपाक आवरून घेतला, हे अजूनही बाहेर आले नव्हते, 
 शेवटी रात्र झाली व आई नि सर्वाना जेवायला घ्यायला सांगितले , 
प्रियाताई नि यांना आवाज देऊन जेवायला बोलावले आज सर्वजण  शांत च होते प्रियाताई  मध्ये मध्ये बोलत होत्या पण हे फक्त त्यांना हसून प्रतिसाद देत होते, 
आज त्यांचे सर्वात पहिले जेवण झाले मुळात त्यांचे लक्ष च नव्हते व ते रूममध्ये निघून गेले, 

मी देखील माझे किचनमधील सगळी कामे आवरून रूममध्ये आले, 


ते अगोदरच झोपलेले होते
मी जाऊन शेजारी झोपी गेले, माझी चाहूल लागताच त्यांनी कूस बदलली व माझ्याकडे चेहरा केला, 
आमची नजरेला नजर झाली व माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, 
आता त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता, 
माझ्या डोळ्यातील अश्रू पुसत ते म्हणाले, 
"ये मयू सॉरी ना 
खरच सॉरी अग माझं चुकलं, 
मी तुझ्यावर ओरडायला नको होतं, 
पण मला नाही कळले कसे व्यक्त  व्हावे आणि मी राग तुझ्यावर काढला" 
त्यांचा चेहरा खुप निरागस वाटत होता, 
मी फक्त हम्मम्म्म म्हणून त्यांच्या हाताची उशी करून डोकं ठेवलं , 
पण त्यांच्या मनातील सल ते अजूनही बोलून  दाखवत होते, 

"मी खरच चुकलो ग मुळात जे माझे आहे ते सर्व तुझे च आहे तुझा माझ्यावर हक्क देखील आहे, तरी मी चिडलो त्यासाठी सॉरी" 

ते बोलत होते पण त्याकडे माझे लक्ष कुठे होते,
 माझे मन तर सगळे त्या डायरीत अडकले होते 
त्यांचे बोलणे बंद झाले व मी हळूच म्हणाले 
"एक विचारू का ????" 

"बोल ना " 
त्यांनी प्रतिउत्तर दिले 


"तुमच्या आयुष्यात एखादी मुलगी होती का ???" 
मी थोडी जवळ जात म्हणाले म्हणजे चिडनार नाही इतकी 


"म्हणजे डायरी वाचून झालीये बहुतेक पण पूर्ण नाही वाचालीस" 
ते मला जवळ घेत म्हणाले 

अरे यार यांना कसे माहीत मी अर्धी च डायरी वाचली, 
यांनी बघितले असेल का मला वाचताना की पानावरुन कळले की माझ्याकडून  चुकून काही राहून गेले  त्यामध्ये ????

काय झाले असेल ????
क्रमशः .............

कथा आवडल्यास लाईक जरूर करा,

🎭 Series Post

View all