स्वप्नांच्या पलीकडले (भाग 13)

Completion

स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 13 ) 

( माघील भागात आपण पाहिले अभिमान च्या बोलण्यात अडकून मयुरी ला डोळा लागला होता ) 

आता पुढे ................


नेहमीप्रमाणे लवकर उठून मी माझे काम आवरू लागले, 
आज एक वेगळीच ऊर्जा मला जाणवत होती, 
तो आई सोबत वाद मिटल्याचा असर होता की यांच्या प्रेमाचा ते अजून अनुत्तरित होतं,


मी माझ्या खुशीत च सगळी कामे आवरून घेतली व मग आई स्वयंपाकात मदतीला आल्या, 
मी स्वयंपाक करत होते पण लक्ष रूमकडे लागले होते 
अजून साहेब उठले कसे नाहीत 
ऑफिस ला जायचे नसेल का ??
की विसरले आज ऑफिस आहे,
मी जाऊन बघू का ? 
नाही नको 
आई ला काय कारण देणार ....
मी काम आवरता आवरता माझ्या विचारात गुंतले होते, 

आई ने दोन आवाज देऊन 
तिसऱ्या वेळेस 
हाताला हलवले व म्हणाल्या 
"अग काय झालं 
तुझं लक्ष कुठं आहे" 
अभिमान उठला नाही का अजून " 

"माहीत नाही आई 
मी बघून येऊ का 
मी भानावर येत म्हणाले " 


"बघून येऊ का ?? 
काय विचारते ये बघून 
व फक्त बघू नको उठव 
त्याला 
माझे नाव सांग " 
आई खडसावत म्हणाल्या 


"हो सांगते "
म्हणून मी रूमकडे गेले ,


बघा साहेब अजून झोपेत आहेत तर 
त्यांना उठवण्यासाठी मी हात पुढे केला पण पुन्हा विचार केला हे किती छळतात मला आता माझी बारी 
म्हणून मी जवळ पडलेली झाडू ची काडी त्यांच्या कानात टाकली 
ते हलले व कूस बदलून झोपले , 
मी माझ्या केसांचे पडणारे थेंब मुद्दाम चेहऱ्यावर पडतील असे केस पकडले 
त्यानी पांघरून अंगावर घेतले ते इतके झोपेत होते की हे सगळं आपोआपच होतंय अस त्यांना वाटत होतं, 
मी पुन्हा चेहर्यावरील पांघरून काढले व केस समोर घेणार तोच त्यांना जाग आली 
"तू आहेस का 
आता बग 

असे म्हणून त्यांनी माझे दोनी हात पकडले व जवळ असलेला पाण्याचा जग पूर्ण माझ्या अंगावर रिकामा केला , 
सगळीकडे पाणीच पाणी झाले होते , बेड, फरशी व मी देखील भिजले होते, 
त्यांच्या हाताला जोरात झटकत मी बाजूला झाले आता आई ला काय सांगावं, 
म्हणून मी घाईत आवरू लागले, 
उगाच यांच्या नादी लागले यांना काही भान असते का?? 

तेवढ्यात 
"मयूरी ..........." 
म्हणून आई नि आवाज दिला 
"आता मेले मी 
हा विचार करत पटकन साडी बदलून आवरू लागले तोपर्यंत साहेब स्वतः रेडी होऊन ऑफिस ला जाण्याची तयारी करत होते माझी मात्र फजिती झाली होती, 
पण घेईल मी याचा बदला कधी ना कधी असा विचार करून मी कामाला लागले, 

आई नि पुन्हा आवाज दिला 
व मी धावत आई जवळ पोहोचले, 
पण आता साडी का बदलली याचे काय कारण देऊ, 

माझा घाबरलेला चेहरा बघून की काय पण माहीत नाही 
आई नि साडी का बदलली म्हणून
विचारले च नाही 
किंवा इतका वेळ का लागला हे देखील विचारले नाही , 

"आवरले का त्याचे त्याचा डबा दे व नास्ता दे " जसे काही झालेच नाही अशा आई वावरत होत्या 

"मी फक्त हो म्हणाले" 
व डबा देऊन आले, 

कमाल आहे ना 
आई ने काहीच कसे विचारले नाही,  
जाऊ दे ना तसेही विचारले असते तर माझ्याकडे कुठे काय होते सांगायला, 
मी मनाशी च म्हणाले

मी यांचा डबा भरून ठेवला 
आता रूममध्ये जाणार तरी कशी पुन्हा त्यांच्या तावडीत सापडले मग 
मी मुद्दाम आई जवळ घुटमळत होते, 
तितक्यात ते आले, 

"आई डबा दे ग........" 

मुद्दाम जोरात आई ना आवाज दिला रोज मीच डबा देते तरी देखील, 
मी डबा देण्यासाठी हातपुढे केला, 
डबा न घेता मुद्दाम हाताला स्पर्श केला व काहिक्षण थांबून मग डबा घेतला, 
वरतून जाताना धक्का देत 
"आई येतो ग ....." 
पुन्हा आकाशवाणी करून गेले 
"हो का बघते नंतर या घरी मग सांगते" 
मी मनाशीच म्हणाले, 
ते गाडी काढून गेट बाहेर गेले होते व मी हॉलमधून अजून त्यांनाच नेहाळत होते, 

"आई ग ....
हा रोग कधी बरा होणार आहे 
माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात" 
प्रिया ताई जोरात ओरडत म्हणाल्या 
त्यांच्या व आई च्या हसण्याने मी भानावर आले व काहीतरी बोलायचे म्हणून बोलले 
"अरे ताई तुम्ही कधी आलात"

" आपली समाधी लागली होती दादा पाठीमागे तेव्हा " 
त्या मला चिडवत म्हणाल्या 


मी लाजून रूमचा रस्ता धरला, 
खरच मूर्ख आहे मी 
काय होत काय माहीत मला यांनी स्पर्श केला की कुठले भानच राहत नाही, 
मी स्वतः शी च बोलत रूम  मध्ये जाऊन बसले , 
खरच बघाताक्षणी एखाद्याच्या प्रेमात पडन 
मग हळूहळू त्याच्या स्वभावामुळे त्या व्यक्तीकडे ओढलं जाणं, 
आणि मग हे रुसत फुगत
बहरात जाणार प्रेम सगळंच खुप विलक्षण होतं,

माझे किचनमधील काम आवरून  व  मग मी रूममधील काम हातात घेतले 
यांचे कपाट आवरणे, त्यांची पुस्तके नीट ठेवणे, इकडे तिकडे पडलेले पेन, कागद नीट ठेवणे हे असे उधोग माझे चालायचे, 
आज वेळ होत म्हणून त्यांचे कपाट आवरायला घेतले, 
मी कागदपत्रांची फाईल नीट ठेवत असताना तिथे डायरी सारखे काहीतरी दिसले, 
म्हणून मी उघडून पाहिले तर हो डायरी च होती, 
मनात खुप विचार येत होते असे त्यांना न विचारता हात लावणे योग्य आहे का ? 
पण मनाला मोह देखील झाला होता त्यात काय आहे बघण्याचा, 
मग काय करू ???
काय करू काय नको असा विचार करत च मी पाहिले पान उघडले तर बघून माझा स्वतःवर विश्वास बसत नव्हता .....
मी दोन मिनिटं डोळे बंद केले 
पण बंद केलेल्या डोळ्यांना देखील अश्रू लपवता आले नाही व ते वाहू लागले वाऱ्याच्या वेगाने, 
आज मी आतून तुटले होते, 
कोसळले होते, 
खरच स्वप्नांच्या पलीकडले अनुभवत होते कारण मी कधी या बाजूने विचारच केला नव्हता.....


काय असेल बर त्या डायरीत असे की ज्यामुळे मयुरी कोसळली 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
क्रमशः ....... 

🎭 Series Post

View all